युनिकोड ते साऊंडकोड
– लेख 24 –
भाषेतील जोडाक्षरांचे उच्चार आणि मराठीची शास्त्रीय
अद्वितीय आश्चर्यकारक अचूकता
मराठीत ‘र’ व्यंजनाचा वापर जोडाक्षरासाठी उत्तमप्रकारे केला जातो.
मराठीत ‘सुर्या’ आणि ‘सुर्य’
असे ‘र’चे दोन जोडाक्षरी उच्चार होतात.
जोडाक्षरांच्या दृष्टीकोनातून हे कसे व किती महत्त्वाचे ठरते?, हे बघू.
आधी ‘पप्या’ आणि नंतर ‘पप्प्या’ उच्चारा.
यातील ‘प्या’ मधल्या ‘प’च्या
उच्चारात ओठ ‘क्षणभर’च स्पर्श करतात.
यातील ‘क्षणभर’ या वेळेला आपण ‘क्ष’ असे
नाव देऊ.
‘प्प्या’ उच्चारात ‘प’ नंतर
पुन्हा ‘प’
असा ओठांचा स्पर्श
दोनदा होत नाही.
‘प’साठी
स्पर्श झालेले ओठ तेथे तसेच जास्तवेळ गुंतून राहतात.
‘प’ने
घेतलेल्या जास्त उच्चार-वेळेने त्याचा उच्चार जणू ‘प्प्’ झाला असे वाटते.
यात ‘प’चा उच्चार दोनदा केला
जात नाही फक्त त्याचा उच्चार वेळ वाढतो.
‘पप्या’ या उच्चारातील ‘प्या’ उच्चार पुढीलप्रमाणे होतो..
यातील ‘प्’ व्यंजन-उच्चारात
गुंतलेल्या ओठांच्या ‘वेळेचा चौकोन’ लक्षात घ्या.
‘प्या’ या उच्चारातील व्यंजन व स्वर यांनी घेतलेला वेळ वरीलप्रमाणे असतो.
‘पप्प्या’ या उच्चारातील ‘प्प्या’ उच्चार पुढीलप्रमाणे होतो..
यातील ‘प्’ व्यंजन-उच्चारात
गुंतलेल्या ओठांच्या वेळेचा चौकोन लक्षात घ्या.
‘प्प्या’ या उच्चारातील व्यंजन व स्वर यांनी घेतलेला वेळ वरीलप्रमाणे असतो.
‘प्’ दोनदा
उच्चारले जात नाही केवळ त्यासाठीचा वेळ दुप्पट घेतला जातो.
‘सुर्या’ या उच्चारातील ‘र्या’ उच्चार पुढीलप्रमाणे होतो.
यातील ‘र्’ व्यंजन-उच्चारात
गुंतलेल्या ओठांच्या ‘वेळेचा चौकोन’ लक्षात घ्या.
‘र्या’ या उच्चारातील व्यंजन व स्वर यांनी घेतलेला वेळ वरीलप्रमाणे असतो.
‘सुर्या’ या उच्चारातील ‘र्या’ उच्चार पुढीलप्रमाणे होतो..
यातील ‘र्’ व्यंजन-उच्चारात
गुंतलेल्या ओठांच्या वेळेचा चौकोन लक्षात घ्या.
‘र्य’ या
उच्चारातील व्यंजन व स्वर यांनी घेतलेला वेळ वरीलप्रमाणे असतो.
‘र्’ दोनदा
उच्चारले जात नाही केवळ त्यासाठीचा वेळ दुप्पट घेतला जातो.
देवनागरी चिन्हे वापरणार्या संस्कृत, हिन्दी भाषांना हे उच्चार येत नाहीत.
देवनागरी चिन्हे वापरणार्या मराठी भाषेला हे उच्चार येतात.
जोडाक्षरांच्या उच्चारातील अचूकता मराठीने अशी ओळखली आणि भाषेतून वापरली.
ही मराठीची अनोखी अद्वितीयता ठरते.
भाषांच्या जागतिकीकरणात मराठीला कोणताही जोडाक्षरी उच्चार शक्य आहे.
सुक्ष्मतेतून भव्यतेकडे असे हे मराठीचे अलौकीक रूप ओळखणे गरजेचे आहे.
बदकांच्या कळपापासून दूर जाऊन मराठीच्या राजहंसाने दिमाखाने
मिरवावे.
कावळ्याच्या घरट्यातून मुक्त होत मराठी कोकीळेने स्वच्छंदी
व्हावे.
जागतीक मराठी दिनापासून मराठीने लिपीचे नाव ‘मराठमोळी’ जाहीर करावे.
‘युनिकोड ते साऊंडकोड’
याबाबतचे लेख चित्रांसकट
दिलेल्या स्पष्टीकरणासह http://soundcode.blogspot.in/ या ब्लॉगवर वाचा. कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या
फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण
विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी सामिल व्हा.
No comments:
Post a Comment