बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Wednesday, 5 March 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 28 – संगीतासाठीचा मराठी युनिकोड फॉण्ट



युनिकोड ते साऊंडकोड लेख 28 – संगीतासाठीचा मराठी युनिकोड फॉण्ट
मराठीच्या आधुनिक युगातील सर्वांगीण विकासासाठीच्या विविध उपक्रमात 'संगीताचे शिक्षण' हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. मराठी भाषेच्या उपजत मूलभूत अंतरंगाला साजेलशा मराठमोळ्या विचारांतून हा प्रबंध साकारला आहे. भाषांच्या जागतिकीकरणात संगीताबाबतची सर्वसमावेशकाची भूमिका बजावण्याची क्षमता यातून मराठीला प्राप्त होईल असा विश्वास वाटतो. या प्रबंधाचे पाच भाग केले आहेत.
भाग 1 – मराठी भाषा आणि संगीत शिक्षणाचा आजवरचा प्रवास
लहानपण आणि शिक्षण
अंगाई गीतापासून घराघरातील मुलांना बाल्यावस्थेतून संगीताचे बाळकडू मिळते. मुलायम हळुवार सूरावटीतून शांत सुखमय आधार व विश्वास मिळाल्याचे मनावर ठसल्याने त्यांना गाढ झोप लागते. निसर्गाने मानवाला दिलेले हे वरदान आहे. छोट्या छोट्या शब्दांच्या उच्चारातून दिले जाणारे भाषेचे शिक्षण हे मानव निर्मित असते तर संगीताच्या सुरावटींतून कळत नकळत भावभावना मनात निर्माण होण्याची क्षमता ही नैसर्गिक असते. भाषेचे शिक्षण म्हणजे उच्चाराला अर्थाची जोड देणे होय. भाषेतील शब्दाला अर्थ जोडला जातो. उच्चारीत ध्वनीचा एकक म्हणजे 'अक्षर' होय. 'अक्षर' या संकल्पनेतून शब्द साकारतात. अक्षरात व्यंजन स्वर असतात. व्यंजनाचा उच्चार स्वराशिवाय मानवाला करता येत नाही म्हणून भाषेला 'अक्षर' ही संकल्पना राबवावी लागते. अंगाईगीत असो वा सामान्य बोलणे असो त्यात अक्षर असतेच. म्हणजेच गद्य, पद्य आणि संगीत यांतून वावरणारा ध्वनीचा एकक म्हणजे 'अक्षर' असतो.
मराठी अक्षराची जडणघडण
प्रत्येक उच्चाराला सुरवात, शेवट आणि त्यामधला ध्वनीचा प्रवास असतो. 'अक्षर' ही संकल्पना 'ध्वनी-एकक' ठरते कारण अक्षर उच्चाराची 'सुरवात' होण्याआधीचा आणि 'शेवट' झाल्यानंतर येणारा विराम मानवाला जाणवतो. म्हणजेच विरामाच्या कोंदणातल्या एकजीवी संलग्न ध्वनीला 'अक्षर' म्हणता येते.
मराठीतील प्रत्येक अक्षराचा शेवट स्वराने होतो. ', , , , , , , , , , अॅ, ' ही बारा स्वर-अक्षरे मराठीत आहेत. मराठीत ', , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ' अशी चौतीस व्यंजने आहेत.
व्यंजनाच्या उच्चारानंतर त्याला स्वर जोडून मराठीतील बाराखडी बनतात. ', पा, पि, पी, पु, पू, पे, पै, पो, पौ, पॅ, पॉ' ही 'प्' व्यंजनाची बाराखडी आहे. सर्व चौतीस व्यंजनांना अशाच रितीने स्वर-चिन्हे लावून मराठी बाराखडी साकारतात. स्वर-बाराखडी आणि व्यंजन-बाराखडी यातून मराठीतील सर्व अक्षरे साकारतात.
जोडाक्षरांनाही स्वर-चिन्हे लावून बाराखडी बनतात. 'प्य, प्या, प्यि, प्यी, प्यु, प्यू, प्ये, प्यै, प्यो, प्यौ, प्यॅ, प्यॉ' ही 'प्य' जोडाक्षराची बाराखडी आहे. व्यंजनाला व्यंजन जोडून त्यानंतर त्याला स्वर जोडून जोडाक्षरांच्या बाराखडी साकारतात.
जगातील कोणत्याही भाषेचा उच्चार समजण्याएवढी क्षमता मराठीच्या अक्षरात आहे, हे इथे महत्त्वाचे सुत्र ठरते.
उदाहरण - 'फादर' मधल्या 'फ'चा उच्चार आणि 'फणस' मधल्या 'फ'चा उच्चार भिन्न असला तरी तो 'फ'च ठरतो.
मराठी अक्षर आणि संगीत
आरोळी, आलाप आणि तान घेण्यासाठी ध्वनीचा उच्चार श्वास टिकेपर्यंत लांबवता येणे गरजेचे ठरते. गद्यातील आरोळी, पद्यातील आलाप आणि संगीतातील तान यातून भाषेतील 'अक्षर' वहात असते. म्हणजेच भाषेतील अक्षराचा श्वास टिकेपर्यंत लांबडा उच्चार करता येणे गरजेचे असते. मराठीतील प्रत्येक अक्षराचा शेवट स्वराने होत असल्याने प्रत्येक मराठी अक्षराचा उच्चार श्वास टिकेपर्यंत करता येतो.
अक्षरातील प्रत्येक व्यंजनाचा उच्चार केवळ क्षणभर टिकतो. अक्षरात शेवटी येणार्‍या केवळ स्वराचाच उच्चार श्वास टिकेपर्यंत वाढवता येतो. ज्या स्वरांचा उच्चार श्वास टिकेपर्यंत लांबडा करता येतो त्यांनाच केवळ मराठीने स्वर म्हणून स्विकारले आहे. बाराखडीतील सर्व बारा स्वरांचा उच्चार श्वास टिकेपर्यंत लांबडा करता येतो. संगीतासाठी अक्षराचा हा गुणधर्म महत्त्वाचा ठरतो.
ध्वनी आणि विराम यांची गद्य-पद्य-संगीतातील एकरूपता
ध्वनीतून आपल्याला होणारी गद्य-पद्य-संगीताची जाणीव केवळ उच्चारापुरतीच मर्यादित नसते. समजा एखादी संगीताची मैफील सुरू आहे. गायक सुंदर तान घेऊन समेवर येतो. तबल्याचा वाद्यांचा ठेकाही थांबतो. एक दिग्मुढ आनंददायी शांतता जाणवते. ह्या शांततेतील विरामात संगीत असते. 'नियमित अंतरावर पडणार्‍या पद्याच्या तुकड्यांतील' विरामात काव्य असते. व्यंजनांच्या स्वरांच्या मधील अत्यल्प अवधीत, अक्षरांच्या मधील विभक्तपणात, शब्दांमधील अंतरात, वाक्यांतील विरामात गद्य असते. ध्वनीचे हे विरामातील, अवधीतील, विभक्तपणातील, अंतरातील आणि शांततेतील रूप आपल्याला गद्य, पद्य, संगीत यातील फरक अवगत करण्यास मदत करते.
निसर्गाने मानवाला गद्य ऐकायला एक कान, पद्य ऐकायला दूसरा आणि संगीत ऐकायला तिसरा कान दिलेला नाही. एकाच कानाने ध्वनी ऐकून त्यातील गद्य, पद्य, संगीत आपणास उमगते. ध्वनीतील विविध गुणधर्म त्यांच्या विभक्तपणातून आणि अदलाबदल क्रमसंचातून जाणून घेण्याची क्षमता मानवात असते, त्यामुळे एकाच कानाने ऐकून गद्य, पद्य, संगीतातील फरक उमगतो. म्हणजेच अक्षर आणि विराम यांच्या निश्चित होणार्‍या ओळखीतून आपणास गद्य, पद्य, संगीत जाणता येते.
ध्वनी फ्रिक्वेन्सी आणि संगीत
ध्वनीतील फ्रिक्वेन्सी या गुणधर्मावर संगीत आधारलेले असते. फ्रिक्वेन्सीतून जाणीवांना उमगणारा नाद म्हणजे श्रृती होय. उच्चाराची आज्ञा मुखातील स्वरयंत्र ते ओठ या अवयवांना मिळते व उच्चार साध्य होतो. मेंदुत प्रस्थापीत झालेल्या श्रृतींचा उच्चार केला की त्याला सूर म्हणतात. ऐकलेल्या ध्वनीची फ्रिक्वेन्सी दुप्पट झाली की जणू तोच सूर पुन्हा ऐकल्याचा आभास होतो. ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.
मानवाला 85 ते 1100 फ्रिक्वेन्सीचा ध्वनी उच्चारता येतो. 100 फ्रिक्वेन्सीचा ध्वनी ऐकला तर 200 फ्रिक्वेन्सीच्या आणि 400 फ्रिक्वेन्सीच्या ध्वनीची नादरूपी पोत समान असते. म्हणजेच पहिल्या ध्वनीतील सूर पुन्हा दुसर्‍यांदा तिसर्‍यांदा उच्चारून ऐकण्याची क्षमता मानवात असते. त्यामुळे मानवाला उच्चारून गाण्यासाठीची केवळ तीन स्वर-सप्तके प्राप्त होतात. त्यांना आपण मंद्र, मध्यम तार अशा तीन नावांनी ओळखतो.
मानवाला 20 ते 20000 फ्रिक्वेन्सी ऐकू येण्याची क्षमता असते. त्यामूळे पियानोसारख्या वाद्यातून सात सप्तके असतात. गाण्यासाठी केवळ तीन सप्तके आणि वाद्यांसाठी सात सप्तकांचा उपयोग संगीतासाठी मानव करू शकतो.
संगीताची नोटेशन्स आणि युनिकोडने उपलब्ध केलेली चिन्हे
संगीतातील नोटेशन बघीतली तर त्याची वेगळी भाषाच असते असे म्हणावे लागते. आपल्याला लहानपणापासून संगीतात 'सा, रे, , , , , नि' असे सात सूर असतात हे ऐकून माहित झालेले असते. त्यानंतर 'रे, , , नि' या कोमल आणि '' या तीव्र स्वराची ओळख झाली की बारा सूरांची ओळख पूर्ण होते. मराठीतून संगीताच्या स्वर-सप्तकांना सुद्धा मराठी 'अक्षरांची' नावे दिलेली असल्याने ती परीचयाची वाटतात.
मंद्र सप्तकातील बारा, मध्य सप्तकातील बारा आणि तार सप्तकातील बारा अशी एकूण 36 चिन्हांसाठीची बटणे पेटीवर (हार्मोनियम) दिलेली असतात. गायकाला गाताना वा सुरावटीतून गाणे सादर करताना पेटीवरील 36 बटणे पुरेशी ठरतात.
तिन्ही सप्तकातील प्रत्येकी 22 श्रृतींची ओळख करून घेण्यापेक्षा केवळ 12 सूरांची ओळख करून घेणे हे संगीताच्या प्राथमिक माध्यमिक शिक्षणासाठी पुरेसे ठरते. संगीतातील बारकावे ओळखून त्यासाठीची सुक्ष्म चिन्हे जाणणे हे संगीताच्या उच्च-शिक्षणाचा भाग ठरतो. पारंपारीक भारतीय पद्धतीत याबाबतची बरीच चिन्हे आहेत. युनिकोड मधूनही साठीची वेगळी सोय उपलब्ध आहे.
 
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, A, B, C, D, E, F अशा सोळा रकान्यातील 1D10, 1D11, 1D12, 1D13, 1D14, 1D15, 1D16, 1D17, 1D18, 1D19, 1D1A, 1D1B, 1D1C, 1D1D, 1D1E, 1D1F अशा सोळा ओळींतून एकूण 256 स्लॉटस् संगीताच्या चिन्हांसाठी राखीव ठेण्यात आलेले आहेत. त्यातल्या 220 स्लॉटस् मधून चिन्हे देण्यात आलेली आहेत.
या चिन्हांचा वापर करून संगीताच्या सूरांच्या सुरावटींचा तक्ता तयार होतो. यातील चिन्हे सामान्य व्यक्तिसाठी चिनी, जपानी, कोरीयन भाषेतील चिन्हांसाठी अगम्य भासतात. उदाहरणार्थ पुढे इंटरनेटवरील विकीपिडीयावर प्रसिद्ध झालेला हस्तलिखीत तक्ता पहा.
मराठीच काय पण कोणत्याही भाषेचे शिक्षण घेतलेल्या सामान्य व्यक्तिला हे अनाकलनीय, क्लिष्ट व अबोध वाटेल.
परंपरागत संगीताचे गावागावातील शिक्षण –
पूर्वी जेव्हा शाळा नव्हत्या त्यावेळी गावागावात सकाळच्या जात्यावरच्या ओव्यांपासून ते सायंकाळच्या भजनांपर्यंत संगीताचे सूर कानावर पडत आणि भारतीय संगीताचे शिक्षण घराघरातून मिळे. घराघरात पेटी-तबला असत. त्यांचा उपयोगही वारंवार होत असे. रामदास, तुकाराम, बहीणाबाई अशा असंख्य संतांना काव्याचे आणि संगीताचे ज्ञान घराघरानीच दिले. त्यावेळी यासाठीच्या शाळा नव्हत्या. ही संगीत-संस्कृती आता लोप पावत आहे.
परदेशी संगीत आणि भारतीय संगीत यातील फरक जाणण्याची कुवतही नष्ट होत आहे. परदेशी संगीतातील सुरांना निश्चित आखीवरेखीव फ्रिक्वेन्सी प्रदान केलेली असते तर भारतीय संगीतात आधार-स्वर निश्चित करून त्यानुसार सुरांची योजना आखता येते. 'तु जरा वरचा सूर पकडलास', 'मध्य-सप्तक थोडा चढेल होता', 'थोड्या खालच्या सुरात गायले असतेस तर वरचा तीव्र-सूर सहज पकडता आला असता' अशी विधाने आपण ऐकतो. जर आधार स्वर बदलला तर त्या गीतातील सर्वच स्वर त्या अनुषंगाने 'चढेल' वा 'पडेल' ठरतात. आधार-स्वर बदलला तरी गीतातल्या सुरावटीतील सूरांच्या परस्पर संबंधातील आलेख तसाच राहतो. वैयक्तीक आवाजातील धारणा आणि क्षमता अजमावून, झेपेल अशा आधार-स्वराचा वापर करून, गीताचे गायन केल्याने त्यातील संगीत विस्कळीत होण्याचे टळते. 'स्वतःच्या गायकीतील 'सा' कोणता असावा?, हे ठरविण्याचे स्वातंत्र्य गायकाला मिळते आणि एकदा 'सा' कोणता ते निश्चीत केला की बाकीची सुरावट त्याच्या अनुषंगाने योग्यपणे वापरता येते', हे भारतीय संगीताचे महत्त्वाचे धोरण म्हणता येते.
भारतीय संगीत आणि युरोपीयन संगीतातील महत्त्वाचा फरक –
मानवाच्या ऐकू येण्याच्या क्षमतेत बसतील अशी आठ सप्तके आणि त्यातील प्रत्येकी बारा स्वर युरोपीयन संगीतात निश्चीत केलेले आहेत.
आता आधुनिक युगात कोणत्याही वाद्याचा उपयोग संगणकामार्फत करता येतो. खरोखर मानवाने एखादे वाद्य न वाजवता, त्या वाद्याच्या आवाजाची तंतोतंत नक्कल, संगणकीय उपकरणांमार्फत करून संगीताची साथ देणे शक्य आहे.
त्यामुळे भारतीय संगीतातील पद्धतीने गायकाने स्वतःचा 'सा' निवडला आणि गाणे म्हटले तर त्याच्या गायकीतील सप्तकांची फ्रिक्वेन्सी आणि त्याला साथ दिल्या जाणार्‍या संगणकीय माध्यमांच्या उपकरणांची फ्रिक्वेन्सी यात फरक पडतो.
गिटारच्या सहा तारा अनुक्रमे 82.41, 110, 146.8, 196, 246.9, 329.6 या फ्रिक्वेन्सीच्या तर पियानोच्या स्वरांची व्याप्ती 27.50 ते 4186 या फ्रिक्वेन्सीची असते. 
मानवाला केवळ 85 ते 1100 फ्रिक्वेन्सीच्या ध्वनीचा उच्चार करता येतो. भारतीय संगीताला गायकीसाठी मान्य असलेलल्या सप्तकांची फ्रिक्वेन्सी पुढीलप्रमाणे आहे.
भाग 2 – भारतीय आणि अभारतीय संगीतातील साम्य व फरक
भारतीय परंपरेतल्या संगीतातील तीन सप्तकांतील 66 श्रृतींची नावे व फ्रिक्वेन्सी –
श्रृती या केवळ 22 असतात. त्यांचा आभास तिन्ही सप्तकातून होतो. त्यामुळे एकूण श्रृती 22 की 66 असा वाद निर्माण होतो. प्रत्येक सूराचा आभास तिन्ही सप्तकातून म्हणजेच तीन वेळा होतो. त्या प्रत्येक आभासाला आपण ज्या ज्या एकाच सूराने ओळखतो त्याला श्रृती म्हणतात. त्यामुळे संगीतासाठीच्या ध्वनीच्या फ्रिक्वेन्सीचे 66 भाग पडतात. यांना 66 'आवर्तनीय-श्रृती' असे आपण या लेखापुरते नाव देऊ. याबाबतीत सखोल माहिती देण्याची वा त्याबाबत चर्चा करण्याची ही जागा नव्हे. आपण येथे केवळ संगीत शास्त्राच्या माननीय अभ्यासकांनी मांडलेली भिन्न मतांचा आढावा घेणार आहोत. त्यासाठी महत्त्वाचे ठरणारे असे चार भाग विचारात घेऊ.
1) पारंपारीक पूरातन मांडणी –
भारतीय परंपरेने आणि भारतीय संगीत शास्त्रकारांनी 'भरताने' केलेली तीन सप्तकांतील प्रत्येकी 22 श्रृतींची मांडणी मान्य केली आहे. '''निश्चीत तटस्थपणे ऐकू येणार्‍या दोन नादांमधील अंतर लक्षात घेऊन''' भरताने श्रृतींची व्याख्या केली आहे''', असे म्हणता येते. सुधाकर टीकेत पार्श्वदेवाच्या 'संगीतसमयसार' या ग्रंथातून तीन स्थानातील 66 श्रृतिंची मांडणी पुढीलप्रमाणे नावासह दिली आहे.
मंद्र सप्तक – 1. मंद्रा, 2. अतिमंद्रा, 3. घोरा, 4. घोरतरा, 5. मंडना, 6. सौम्या, 7. सुमना, 8. पुष्करा, 9. शंखिनी, 10. नीला, 11. उत्पला, 12. अनुनासिका, 13. घोषावती, 14. लीननादा, 15. आवर्तनी, 16. रणदा, 17. गंभीरा, 18. दीर्घतारा, 19. नादिनी, 20. मंद्रजा, 21. सुप्रसन्ना.
मध्य सप्तक – 1. नादांता, 2. निष्कला, 3. गूढा, 4. सकला, 5. मधुरा, 6. गली, 7. एकाक्षरा, 8. भृंगजाती, 9. रसगीती, 10. सुरंजिका, 11. पूर्णा, 12. अलंकारिणी, 13. वांशिका, 14. वैणिका, 15. त्रिस्थाना, 16. सुस्वरा, 17. सौम्या, 18. भाषांगी, 19. वर्तिका, 20. संपूर्णा, 21. प्रसन्ना, 22. सर्वव्यापनिका.
तार सप्तक – 1. ईश्वरी, 2. कौमारी, 3. सवराली, 4. भोगवीर्या, 5. मनोरमा, 6. सुस्निग्धा, 7. दिव्यांगा, 8. सुललिता, 9. विद्रुमा, 10. महार्का, 11. शंकिनी, 12. राका, 13. लज्जा, 14. काली, 15. सुक्ष्मा, 16. अतिसूक्ष्मा, 17. पुष्टा, 18. सुपुष्टिका, 19. विस्पष्टा, 21. कराली, 22. विस्फोटांतर्भेदिनी
वरील श्रृतींच्या स्थापनेची संकल्पना, '''सप्तकात ऐकू येणार्‍या नादांची संख्या, 'ऐकण्यास योग्य असणे' या लक्षणावरून, मानवी कानांनी जेवढी ग्रहण करता येते, निश्चितपणे तटस्थ व स्वतंत्र अशी ओळख करून देते''' यावर आधारलेली आहे.
2) मध्यकालीन मांडणी –
माननीय श्रीनिवास आणि भातखंडे या संगीत तज्ञांनी मान्य केलेली आणि संगीत महाविद्यालयांतून भारतभर शिकवली जाणारी संगीत विषयातील माहिती पुढीलप्रमाणे आहे.
श्रृतींची नावे –
1. तीव्रा, 2. कुमुद्वती, 3. मंदा, 4. छंदोक्ती, 5. दयावती, 6. रंजनी, 7. रक्तिका, 8. रौद्री, 9. क्रोधी, 10. वज्रिका, 11. प्रसारिणी, 12. प्रीति, 13. मार्जनी, 14. क्षिती, 15. रक्ता, 16. संदीपिनी, 17. आलापिनी, 18. मदन्ती, 19. रोहिणी, 20. रम्या, 21. उग्रा, 22. क्षोभिणी.
सात स्वरांची नावे – 1. षड्ज, 2. ऋषभ, 3. गांधार, 4. मध्यम, 5. पंचम, 6. धैवत, 7. निषाद.
बारा स्वरांची नावे – 1. षड्ज, 2. कोमल ऋषभ, 3. शुद्ध ऋषभ, 4. कोमल गांधार, 5. शुद्ध गांधार, 6. मध्यम, 7. तीव्र मध्यम, 8. पंचम, 9. कोमल धैवत, 10. शुद्ध धैवत, 11. कोमल निषाद, 12. शुद्ध निषाद.
यात कर्नाटकी व उत्तरी संगीत असे उपभाग मोडतात.
3) अत्याधुनिक मांडणी – आजवर 'संगीतासाठीच्या श्रृती' या विषयावर जगभरच्या असंख्य अभ्यासकांनी अथक परिश्रम घेऊन विविध विचार मांडले. ऐकू येणार्‍या ध्वनीच्या नादाला संगीतात स्थान देण्यासाठी त्याची फ्रिक्वेन्सी माहीत असणे, वाद्यासाठीच्या तारेची कंपन संख्या कळणे, वगैरे गोष्टी गणिती पद्धतींचा वापर करून मांडता व वैचारीकपणे उलगडता येतात. जगभरच्या संगीत संस्कृतीला वैज्ञानिक पद्धतीतून एकत्रीत आणणे हा यामागचा उद्देश आहे. जणू काही शास्त्रीयतेने संगीताचे जागतिकीकरण घडू शकेल का? संगीताबाबतच्या विविध पातळीवरील मतभेद विरून संगीताचे जागतिकीकरण साधण्याचा हा एक प्रयत्न ठरू शकतो. भौतिक विज्ञानातील मूलभूत सिद्धांतानुसार वस्तुमानातील कंपने आणि संस्पंदन यांचा संबंध संगीताशी गणिती पद्धतीतून जोडून आजवरच्या संगीत-ज्ञानाला सायन्स म्हणून शिकवता येण्याचा उपक्रम ठरू शकतो. याला प्रयोगाचे जगभरचे आजचे तात्पुरते नाव 'The Perfect Third' असे देण्यात आले आहे. यातून भारतीय परंपरेने शोधलेल्या 22 श्रृतींच्या 3 सप्तकांनाच दुजोरा मिळतो.
भाग 3 – श्रृती, सप्तके, बारा स्वरांची मांडणी आणि मराठी
श्रृती, सप्तके व बारा स्वर यांची ओळख –
श्रृतींची फ्रिक्वेन्सी, सप्तकातील स्वरांची फ्रिक्वेन्सी आणि बारा स्वरांची फ्रिक्वेन्सी हा वादाचा विषय आहे. बाबतची माननीय व्यक्तींनी केलेली मांडणी हा काही संगीत जाणकारांनी स्विकारलेला भाग आहे, एवढेच म्हणून थांबणे योग्य ठरेल. या लेखात देऊन आपण ''श्रृती, सप्तके आणि बारा स्वर यांची सामान्यांना होणारी ओळख आणि तज्ञ संगीत जाणकारांना झालेली ओळख'' यातील फरक आटोपशीरपणे जाणून घेऊ.
मानवाला उमगणार्‍या ध्वनीच्या उच्च-नीचतेत एक महत्त्वाचा गुणधर्म असतो. ध्वनीची वारंवारीता (Frequency) दुप्पट झाली की तो मूळ-ध्वनीसारखा भासतो. म्हणजेच दोन ध्वनीतल्या उच्च-नीचतेतले गुणोत्तर जर 1 :2 असले तर तो सूर सारखाच भासतो.
त्यामुळेच संगीतात मंद्र, मध्य व तार अशी तीन सप्तके निर्माण होतात. उच्चारीत ध्वनीच्या 85 ते 1100 वारंवारीतेच्या (Frequency) मर्यादेत ही सप्तके बसवावी लागतात. मंद्र सप्तक 120 ते 240, मध्य सप्तक 240 ते 480 आणि तार सप्तक 280 ते 960 अशा वारंवारीतेतील (Frequency) असतात.
सर्वसाधारणपणे 'मध्य सप्तक' यालाच स्वर-सप्तक म्हणून ओळखले जाते कारण गायकाच्या सामान्य आवाजाला यात सहजता प्राप्त होते. सामान्यपणे स्वर-सप्तकातील 'सा' ची वारंवारीता (Frequency) 240 असते असे मानता येते.
'श्रृती या 22 असून त्या मंद्र, मध्य व तार सप्तकातील स्थानात आवृत्त होतात', हे स्विकारले नाही तर 'सा, रे, ग, म, प, ध, नि' या स्वरांची पुनरावृत्ती होत नाही, असे मानावे लागेल आणि सर्व 66 श्रृतींना भिन्न नावे द्यावी लागतील. पण संगीतात आपण तिन्ही सप्तकातील श्रृतींना सारख्याच नावांनी ओळखतो आणि त्यामुळे मानवाला 'संगीत' निर्माण करता येते.
म्हणजेच 'फ्रिक्वेन्सी रहीत ध्वनीचा असा गुणधर्म जो तिन्ही सप्तकात अवतरतो, त्यावर मानवी संगीत आधारलेले असते', असे म्हणता येते आणि त्याची ओळख मानवाला 'श्रृती' या नावाने करून घ्यावी लागते.
फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात होणारी ध्वनी आंदोलने होत. 'श्रृती' म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या 'वेळ विरहीतपणातुन' मानवाला उमगणारे ज्ञान होय. 'श्रृती' हा संगीताच्या ज्ञानाचा जाणीवांना उमगणारा 'सुक्ष्मक' आहे आणि त्याची मानवाला होणारी ओळख ही 'काल-विरहीत' म्हणजेच 'उच्चार-विरहीत' असते.
जाणीवा, ज्ञात होणारे ज्ञान, संगीत आणि भाषांच्या मर्यादा –
पंचेद्रियांतून प्राप्त झालेले आणि अनुभवाच्या भांडारात संग्रह करता येणारे जे ज्ञान असते ते 'काल-विरहीत' असते. 'लाल, हिरवा, पिवळा' असे रंग, 'खारट, तुरट, गोड' अशा चवी, 'गुलाब, मोगरा, रातराणी' असे गंध, 'गद्यातील दोन व्यंजनातील वा स्वरातील' ऐकून उमगणारा फरक', 'गरम, गार, कोमट' असे जाणवणारे स्पर्श, असे ज्ञान 'वेळेशी संबंध न ठेवता' आत्मसात करून स्मृतीत संग्रह करता येते.
हे सारे अनुभवातून स्मृतीत गोठवलेले, कोरलेले ज्ञान 'काल-विरहीत' असते.
श्रृती ही 'नादाची ओळख' आहे व तिचा उच्चार म्हणजे सूर होय. 'श्रृतीचा सूर' किती कालमापनातल्या लांबीचा उच्चारायचा यावर बंधन नसते. 'श्रृतीचा सूर' हा 'आलाप, तान' या स्वरूपातही येतो. कमी कालमापनातील 'श्रृतीचा सूर' आणि 'जास्त कालमापनातील 'श्रृतीचा सूर' यांचा 'श्रृती' म्हणून कळणारा, जाणवणारा अर्थ एकच असतो आणि केवळ हाच अर्थ आपण संगीतात वापरतो.
त्याचप्रमाणे मराठी भाषेतल्या स्वराचा उच्चार कितीही कालमापनाचा केला तरी त्या स्वराचा, गद्यामधला अर्थ एकच असतो. मराठी भाषेत आपण प्रत्येक स्वराचा उपयोग भिन्न कालमापनातून करतो पण तरीही त्याचा गद्यातील अर्थ केवळ त्याच्या 'ओळखीशी' संबंधीत राहतो. अक्षरातील स्वराच्या उच्चारातील कालमापनामुळे त्यातून बनलेल्या शब्दांचा अर्थ मराठीत बदलत नाही, हे मराठीचे मूलभूत व उपजत धोरण आहे.
यासाठीच शेकडो वर्षे मराठीने गद्यातील प्रवास एक-वेलांटी व एक-उकार असलेल्या मोडी-लिपीतून आणि पद्यातील प्रवास दोन-वेलांट्या दोन-उकार असलेल्या बाळबोध-लिपीतून केला. आता जरी मराठीने देवनागरी-लिपीचा स्विकार केलेला असला तरी मराठीचे उपजत व मूलभूत स्थिरतत्त्वातील अस्तित्व अबाधीत राहीलेले आहे. हे अस्तित्व टिकवण्यासाठी यापुढे मराठीने देवनागरी चिन्हांचाच वापर करून, मराठीच्या लिपीला 'मराठमोळी' नाव देणे योग्य ठरणार आहे. संगीतातल्या श्रृतींसारखेच आणि श्रृतींप्रमाणेच, मराठीला गद्यातील स्वराची 'ओळख व उच्चारातील कालमापन' जपता आणि भाषेतून वापरता आले आहे.
संस्कृतला 'संगीत रत्नाकर' सारख्या ग्रंथातून संगीत क्षेत्रातील उत्तम विचारसरणी मांडता आली. त्यातून श्रृतींची अचूक ओळख कालविरहीत असल्याचे निश्चित मांडता आले. पण संस्कृतला भाषेतील स्वराशी त्याच अनुषंगाने कालविरहीतपणे मांडणी करता आणि भाषेतून वापरता आली नाही. 'इ' व 'ई', 'उ' व 'ऊ' यातील नाद, आवाज, ध्वनी एकच असतो पण तरीही शब्दातील अर्थात यातील कालमापनामुळे फरक करणे हे संस्कृतने स्विकारले आहे.
संस्कृत मध्ये 'वारिणी' (प्रथमेचे द्विवचन), 'वारिणि' (प्रथमेचे बहूवचन), 'वारीणि' (सप्तमीचे एकवचन), 'वारिणी' (संबोधनाचे बहूवचन) ठरते. म्हणजेच जर र्‍हस्व-वेलांटीची (इ-स्वराची) तान घेतली तर त्या शब्दांचा संगीतात नक्की कोणता अर्थ घ्यायचा ते संस्कृतला सांगता येईल का? असे असंख्य शब्द संस्कृतमध्ये आहेत.
त्यामुळे संगीतात भाषीक अर्थ बदलला तरी चालेल का? म्हणजेच मानवाच्या गद्यातील स्वरांचा संबंध संगीतातल्या श्रृती प्रमाणेच केवळ ध्वनीची ओळख याच्याशी मर्यादित ठेवणे सर्वाधिक शास्त्रीय व नैसर्गिक ठरते, हे सिद्ध होते ना? म्हणजेच भाषा म्हणून मराठी संस्कृतपेक्षा क्षेष्ठ ठरते ना? संगीतातून मराठीला संस्कृतपेक्षा अधिक सहजतेने वावरणे शक्य आहे.
मराठीची उपजत मूलभूत संगीताभिमुख ओळख –
मराठीतील प्रत्येक स्वराचा उच्चार 'अपुरा, नियमीत व लांबट' होतो. हे कोणीही मुद्दाम ठरवून करत नाही. उदाहरण – 'गवत' शब्द कोणीही उच्चारला तरी 'ग' मधला 'अ' स्वर नियमीत उच्चाराचा, 'व' मधला 'अ' स्वर लांबट उच्चाराचा आणि 'त' मधला 'अ' स्वर आखुड उच्चाराचा ठरतो. हे उच्चार मराठीत कोणी कोणाला मुद्दाम शिकवत नाहीत. अगदी नैसर्गिकपणे सर्वांकडून हे घडते.
मराठीने गद्यातील स्वरांना उच्चारात पूर्ण नैसर्गिकता दिलेली आहे. त्यामुळे शब्दाच्या उच्चाराची आज्ञा मेंदूतून निघाल्यावर 'मुखातील स्वरयंत्र, पडजिभ, जिभ, जबडा, ओठ, बाहेर पडणारा हवेचा ओघ' अशा उच्चारकर्त्या अवयवांना मिळते आणि कमीतकमी वेळेत ते त्या शब्दातील अक्षरांचा उच्चार करतात.
अशा उच्चारातील व्यंजनांची व्याप्ती केवळ क्षणभरच असते. त्यात मुळीच बदल करता येत नाही. पण मराठी अक्षरातील स्वरांचा उच्चार मात्र थोडा कमी-जास्त करता येतो. स्वरांच्या उच्चारातील कालमापनात झालेल्या अशा फरकामुळे शब्दातील अर्थात मुळीच फरक पडत नाही. त्यासाठीचा पुढील तक्ता पहा.
मराठी भाषेतल्या 12 स्वरांची केवळ 'ओळख' गद्यातल्या शब्दातील अर्थासाठी मराठीने मोडी लिपीतून हजारो वर्षे वापरली. तेव्हा मराठी गद्यात केवळ एक-वेलांटी व एक-उकार होता. हाच मराठीचा उपजत मूलभूत स्वभाव ठरतो. मोडीचा त्याग करून देवनागरी चिन्हांचा स्विकार करताना या उपजत मूलभूत स्वभावाचा स्विकार करून, एक-वेलांटी व एक-उकार हे तत्त्व गद्यासाठी स्विकारले असते तर शुद्धलेखन नियमावलीची आवश्यकताच भासली नसती. मराठीचे स्वतंत्र, स्वावलंबी, स्वाभिमानी, स्वाभाविक अस्तित्व जपले गेले असते. आता तरी मराठीने मराठीने मराठी लिपीला 'मराठमोळी' नाव देऊन हे साकारले पाहीजे. यातून जागतिक पातळीवर मराठीचा आत्मसन्मान वाढणार आहे.
संगीतातून कमी वा जास्त उच्चारवेळेतून वावरत असताना भाषीक अर्थ सांभाळणे मराठीला सहज शक्य असलेले यातून कळते. संगीतातील सूरावटींतून अक्षरांचा होणारा वावर मराठी भाषेला मुक्तपणे कोणतीही बंधन वा मर्यादा न ठेवता करता येतो. यामुळे भाषांच्या जागतिकीकरणात मराठी भाषा सर्वसमावेशकाची भुमिका सहजतेने निभावू शकेल.
भाग 4 – अभ्यासक्रमातून गद्य-पद्यासोबत संगीत शिकवणारा युनिकोडचा फॉण्ट
शालेय अभ्यासक्रमातून संगीताचा शिरकाव न झाल्याने नष्ट होणारी परंपरा –
भारतीय व अभारतीय, कर्नाटकी व हिन्दुस्थानी, गीत व शास्त्रीय संगीत, गायकी व वाद्यवृंद असे संगीतातील फरक जाणण्याची गरज सामान्यांना आणि विशेष करून प्राथमिक व माध्यमिक शाळांना नसते. पूर्वी घराघरात भारतीय काव्य आणि संगीताचे वास्तव्य होते. आता शिक्षण हे शाळा व कॉलेजांतून दिले घेतले जाते. आजच्या शालेय अभ्यासक्रमात संगीताचा शिरकाव झाला नसल्याने बर्‍याच गोष्टी कळत नकळत समाजात घडल्या आहेत.
सकाळी जात्यावरील ओव्यांपासून ते सायंकाळच्या भजनांपर्यंत गावोगावी सर्वांच्या कानावर संगीताचे सूर येत. पूर्वी घराघरात पेटी व तबला असे आणि वेळोवेळी त्यांचा बर्‍याचदा वापर होत असे. रामदास, तुकाराम, बहीणाबाई अशा असंख्य संतांचे काव्य-शिक्षण घराघरांतूनच घडले. आता शिक्षकांच्या बीएड-डीएड अभ्यासक्रमातही वृत्त-जाती-छंद यांची योग्य ओळख करून दिली जात नाही. त्यामुळे शाळाशाळांतील विद्यार्थ्यांपर्यंत ते ज्ञान पोचत नाही. गद्यातील अक्षरांचा संचार पद्यातून लयतालविचारांच्या अनुषंगाने होऊन उत्तम मराठी गाणी, गीते, भावगीते व संगीत निर्माण होत होते. भारतीय संगीतातील श्रृती, सप्तके व रागदारी यांची पारंपारीक शास्त्रीयता परकी वाटू लागली आहे. ही नष्ट होत जाणारी परंपरा थांबवून पुन्हा जागृत करण्यासाठीची उपाययोजना आखणे गरजेचे ठरते.
शालेय शिक्षणाच्या मर्यादा आणि संगीताची आजची गरज –
वैयक्तीक आवड आणि छंद यातून संगीताचा क्लास लावून आता गायन वा वादन शिकावे लागते. शाळांतून भाषेच्या शिक्षणात गद्य आणि पद्य एवढेच दोन भाग असतात. इंग्रजी शिक्षणाच्या पद्धतीच्या स्विकारातून हे घडले आहे. भाषेच्या शिक्षणात शाळाशाळातून संगीत शिकवले जात नाही. भाषेच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गद्यातील धडे व पद्यातील कविता यांचा समावेश असतो.
गद्य आणि पद्य अभ्यासक्रमातून शिकलेली सर्व मुले काही लेखक वा कवी बनत नाहीत. पण त्यांना लेखनातील आणि काव्यातील आस्वाद घेण्याची सवय लागते. अशा शिक्षणातून विद्यार्थ्यांचा गद्य आणि पद्य यासाठीचा आपण केवळ 'कान' तयार करत असतो. यातील 'कान तयार करणे' या शब्दप्रयोगाचा अर्थ महत्त्वाचा ठरतो.
लहानमुलांचा मेळावा वा स्नेहसम्मेलन यातून लहान मुलांची भाषणे वा वक्तृत्व स्पर्धा आयोजीत करणे हे त्या वयोमानासाठी अयोग्य ठरते, हे सर्वजण आपोआप जाणतो. त्या बालवयात त्यांना गाणी म्हणायला लावून कार्यक्रम साजरे होतात. या गाण्यातील अचूक सूरावट कळण्याची सोय म्हणून, त्या गाण्यांची रेकॉर्ड वा टेप वाजवून, शिक्षक आणि पालक अशी गाणी मुलांना शिकवतात. स्टेजवर जाऊन गाताना त्यावेळी त्यांना जर त्या सुरावटीचा आधार पेटीच्या माध्यमातून मिळाला तर गाणे बरेचसे योग्य सुरावटीतून मुलांकडून सादर होते आणि गाण्याची रंगत वाढते.
भाषेच्या शिक्षणातून गद्य व पद्य यांच्याबरोबरच जर संगीताचा शिरकाव करता आला तर पुढच्या पिढीला संगीताचा आस्वाद घेण्याचा संस्कार करणे शक्य होईल. गद्य व पद्य यांचा अभ्यासक्रम पुस्तक रूपातून विद्यार्थ्यांच्या समोर येतो. यातील पद्य विभागात त्या त्या वयोगटातील विद्यार्थ्यांना साजेलशा कविता असतात. याच कवितांना गाणी स्वरूपातून छान सूरावटीतून गाता आले तर त्यांच्या संगीताच्या शिक्षणाची सुरवात झाली असे म्हणता येते. यातून अभ्यासक्रम वाढणार नसून असलेल्या अभ्यासक्रमालाच संगीताची जोड दिल्यासारखे होईल.
सामान्यपणे सर्व शिक्षकांना संगीताचे यथोचीत ज्ञान असते असे म्हणता येणार नाही. त्यांना त्यांच्या मर्यादेतूनच वावरता येऊन विद्यार्थ्यांना संगीत शिकवता येण्याची उपाययोजना राबवता आली पाहीजे. शिकताना आणि शिकवताना संगीताचा आस्वाद घेता आला तर त्यात गोडी निर्माण होईल.
मराठी शिक्षकांच्या संगीत शिकविण्यासाठीच्या प्राथमिक गरजा
प्रत्येक व्यक्तीला गाणे ऐकायला आवडते. रेडीओवरील भावगीते, सिनेमातील गाणी, नाट्यसंगीत ऐकून मागील पिढी मोठी झाली. आजची पिढी कानाला मोबाईलचा माईक लावून गाण्यांच्या दुनियेत हरवलेली दिसते. टीव्हीवरून गाण्याचे अनोखे देखणेपण दृष्य व श्राव्यपणातून सादर होते. अशा अनुभवलेल्या कोणत्याही संगीताची सुरावट हार्मोनियम, पेटी, कॅसिओ मधून कोणालाही फारसे श्रम न घेता वाजवता आली तर? संगीत ऐकून त्याचा आस्वाद घेणे प्रत्येकाला जमते पण प्रत्येकाला गाता येतेच असे नाही.
जर आवडलेले गाणे सामान्य व्यक्तीला स्वतःच हार्मोनियम, पेटी वा कॅसिओ मधून वाजवता आले तर त्याला मिळणारा आनंद द्विगुणीत होईल.
हार्मोनियम, पेटी वा कॅसिओ मधून गाणे वाजवण्यासाठी ते गाणे गाता आलेच पाहीजे असा नियम नाही. पण व्यक्तीला स्वतःच ते गाणे वाजवता आले तर त्या गाण्याशी जवळकी साधली जाते. संगीतातील सुरावटींचा आस्वाद केवळ ऐकून घेण्याऐवजी त्या सुराची निर्मिती स्वतःच्या बोटांच्या स्पर्शातून करून आपुलकीचे नाते निर्माण होईल. स्वतःला गाणे वाजवता आले की ते जसे आपण शिकलो तसेच ते विद्यार्थ्यांना शिकवणे शक्य होणार आहे. 'संगीत शिकवण्यासाठी गाता आलेच पाहीजे' हा विचार आता त्याज्य ठरतो.
होय हे सारे घडणे आणि घडवणे आता शक्य आहे. त्यासाठीच संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट आणला आहे.
पद्य विभागातील कवितांनाच संगीतबद्ध केल्याने अभ्यासक्रमात बदल होत नाही –
शालेय अभ्यासक्रमांची आखणी करताना दिवसाकाठी घेता येणारे शिक्षणाचे वर्ग, विविध विषयांचा अभ्यासक्रम ठरलेल्या वेळेत पूर्ण होण्यासाठीचे विषयवार तासांचे वेळापत्रक, मुलांना त्यांच्या घरी त्या त्या विषयाचा अभ्यास करता येण्याची सोय, त्या त्या विषयांची परिक्षा घेण्यासाठी शिक्षकांनी प्रश्न-पत्रिका काढण्यासाठीची सोय, मुलांना त्या प्रश्नपत्रिका सोडवता येण्यासाठीची केलेली सोय, अशा अनेक गोष्टींचा उहापोह लक्षात घ्यावा लागतो.
भाषा हा विषय शालेय अभ्यासक्रमातून शिकवताना त्यात गद्यासाठीचे काही धडे आणि पद्यासाठीच्या काही कविता असतात. या आखून दिलेल्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्याची मुळीच गरज नाही. त्यातील पद्य विभागाचे शिक्षण काहीशा संगीताच्या वळणातून देता येईल. त्यामुळे पद्य विभागाला संगीतबद्धतेतून शिकवल्याने कवितेतल्या शब्दांतील भाषीक अर्थ, लयतालविचारांचा टाळी-ठेका-ताल आणि सप्तसूरांच्या दुनियेतील नादरम्यता यांचा अनोखा संगम साधता येईल.
सरकारी खात्यांना असे शिक्षण शाळाशाळांतून देण्यासाठी आजच्या प्रस्थापीत शिक्षणक्षेत्रात फारसा बदल करावा लागणार नाही. शिक्षकांना या नव्या संकल्पनेचे शिक्षण देण्याची गरज नाही. अभ्यासक्रमात नव्याने घातलेले वा बदललेले गद्य विभागातील धडे आणि पद्य विभागातील कविता कशा शिकवाव्यात?, हे जसे शिक्षकांना नव्याने शिकवावे लागत नाही अगदी तसेच 'पद्य विभागातील कविता संगीताच्या आधारातून कशा शिकवाव्यात?' याचे शिक्षण 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' यातून परस्पर पूर्ण होण्याइतके हे तंत्रज्ञान आम्ही सहजसुलभ व सोपे केले आहे.
भाषेच्या शिक्षणातून गद्य व पद्य यांच्यासोबतच संगीताचा 'कान' तयार करणे साधले जाईल –
शालेय शिक्षणातून गद्य व पद्य शिकल्याने ती सर्व मुले पुढे आयुष्यात लेखक व कवी होतातच असे नाही. म्हणजेच शालेय शिक्षणातून गद्य व पद्य शिकवल्याने आपण केवळ मुलांचा 'गद्य व पद्य' या विभागांसाठीचा कान तयार करतो. बस्स, अगदी तसेच शालेय शिक्षणातून संगीत शिकवून पण पुढील पिढीचा संगीतासाठीचा 'कान' तयार करणार आहोत. संगीताचा 'कान' तयार करणे म्हणजे त्यांना गायक बनवणे नव्हे. यातून संगीताचा आस्वाद घेणे एवढे मात्र नक्की साधले जाणार आहे. यातून भारतीय संगीताचा, शास्त्रीय संगीताचा, मराठी भावगीतांचा बाळबोध संस्कार शाळांतूनच नव्हे तर घराघरातून पुढच्या पिढीला बालपणापासून देता येईल. आपल्या वयस्कर पिढीच्या आयुष्यात आपल्यावर जो मराठी संगीताचा संस्कार कळत नकळत झाला त्याला आत्ताची नवी पिढी पारखी झाली आहे. आता यापुढे तो संस्कार पुढील पिढीला देण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' ठरणार आहे.
विविध संगीत विद्यालयातून आणि संगीताच्या क्लासेस मधून संगीत शिकवले जाते. येथे सुद्धा याचा वापर संगीताचे उच्च शिक्षण देण्यासाठी करता येणार आहे. संगीताचे क्षेत्र केवळ गायकी एवढ्याचपुरते मर्यादित नसते. वाद्यवृंद हा फार महत्त्वाचा आधार संगीतासाठी असतो. गायक एक असला तरी वाद्यवृंदात त्याहून जास्त व्यक्ती असतात. आता नवीन युगात संगणकातून वाद्यांचा आभास निर्माण करता येतो, पण त्यासाठी तरी गायकाशिवाय इतर व्यक्तींची साथ लागतेच. गायक आणि वादक यांना त्या गाण्यातील संगीतबद्ध सुरावट कळणे गरजेचे असते. वादकाच्या समोर लिखीतपणात पाच ओळींच्या चिन्हमय आलेखातून संगीतबद्ध केलेली सुरावट कागदबद्ध केलेली असते. वादकाला ही कागदबद्ध केलेल्या सुरावटीतील चिन्हांची ओळख करून घेणे गरजेचे ठरते. प्रत्येक वादकासाठी ही नोटेशन वाचून कळण्याचे शिक्षण घ्यावेच लागते. म्हणजे तुम्हाला संगीतकाराचे वादक बनायचे असेल तर आधी वाद्य उत्तमपणे वाजवता यावेच लागेल आणि त्याचवेळी कागदावरील चिन्हातून सामोरी आलेली त्या संगीताची धुन जाणण्याची क्षमताही हवी.
समजा शाळेतील मुलांचा ऑर्केस्ट्रा निर्माण करायचा आहे तर त्यातील प्रत्येकाला त्या गीताची धुन पाठ झाली पाहीजे. मुलांच्या ऑर्केस्ट्रात समजा पेटी, बासरी, गिटार वगैरे असल्या तर त्यांना ही धुन त्या त्या वाद्यावर कशी वाजवायची ते वेगवेगळ्या प्रकारे शिकवावे लागेल. पण समजा त्या गाण्याची सरगम, पेटीवरील बटणांवर, बासरीच्या भोकांवर, गिटारीच्या तारांवरील नेमके स्थान मुलांना परस्पर कळले तर? होय, हेच 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' यातून घडणार आहे. वाद्य कोणतेही असो गाण्यातील सरगम समानच असणार आहे. त्या सरगम मध्ये त्या त्या वाद्याची भूमिका केव्हा, कशी व कोठे सादर करायची आहे याची माहीती कागदावरून सहजपणे कळणार्‍या चिन्हांतून 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' मधून सामोरी येणार आहे. यातून गायकाचा आणि त्याला साथ देणार्‍या वाद्यवृंदाला संगीतातील सुरावटींच्या एका समान पातळीवर आणण्याचे काम 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' साधणार आहे.
गायक व वादक यांना सुरावटींच्या एकाच समान पातळीवर आणण्याची भूमिका –
गाणे हिन्दुस्थानी वा कर्नाटकी असो, सुरावटीतील आखणी जुन्या वा नव्या परंपरेची असो त्यात सामान्यांच्या आकलनाला कळतील असे तीन सप्तकातून वावरणारे प्रत्येकी बारा स्वर असतात. गद्यातील वाक्यात, पद्यातील ओळीत व संगीतातील गाण्यांत या सर्वांतून अक्षर असतेच. 'अक्षर' म्हणजे उच्चारीत ध्वनीचा सर्वात सुक्ष्म एकक होय. म्हणजेच संगीताच्या सूरांना पेलणारे व वाहून नेणारे साधन म्हणजे 'अक्षर' ठरते. त्यामुळे प्रत्येक अक्षराला लावली जाणारी सुरावट त्या त्या अक्षरालाच चिन्ह म्हणून जोडता येण्याची सोय 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' मध्ये मिळते. हा फॉण्ट 'जलद सोप्पी मराठी' या मुक्त मोफत सॉफ्टवेअरमधून संगणकातून मनसोक्तपणे वापरता येतो. कोणालाही हे सारे तंत्रज्ञान विनामुल्य उपलब्ध करत आहोत.
संगीतातील सप्त-सुरांना आपण 'सा, रे, ग, म, प, ध, नि' या नावांनी जाणतो. अगदी लहानमुलांपासून वयस्करांपर्यंत अशा प्रकारे संगीतातील सूरांची ओळख समाजापर्यंत पोचली आहे. आम्ही 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' यातून 'सा, रे, ग, म, प, ध, नि' याच चिन्हांतून संगीताच्या सुरावटीची ओळख प्रत्येक अक्षराला जोडता येण्याची सोय दिली आहे.
गाणे कोणतेही असो त्यातील सुरावट 'सा, रे, ग, म, प, ध, नि' या सात सूरातून साकारलेल्या बारा सुरांतून आपणास उमगते. त्यासाठी 'सा, रे, ग, म, प, ध, नि' बरोबरच 'कोमल रे, ग, ध, नि' आणि 'तीव्र प' अक्षराला जोडता येण्याची सोय 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' यामध्ये दिली आहे.
तसेच बारा स्वरांची मालीका मंद्र, मध्यम वा तार सप्तकातून सुद्धा वावरते. त्यासाठी अक्षराला जोडलेला सूर कोणत्या सप्तकातील आहे हे ओळखता येण्याची सोयही 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' यामध्ये दिली आहे.
यातून काय घडवत आहोत? गायक व वादक यांना संगीतासाठीच्या आपापल्या भूमिका सादर करण्याची सोय, शिक्षण व मार्गदर्शन देऊन त्यांना संगीताच्या समान व्यासपीठावर एकत्र आणण्याचे आम्ही साधत आहोत.
'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' वापरण्याचे सर्वसमावेशक ठरणारे अभिनव तंत्रज्ञान –
आम्ही देत असलेल्या 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' मधून बर्‍याच गोष्टी सहजपणे घडणार आहेत.
1) तुमच्याकडे जर गाणे युनिकोडच्या फॉण्टमध्ये आधीच टाईप केलेले असेल तर ते 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट'मध्ये पुन्हा टाईप करण्याची गरज नाही. तुम्ही ते टाईप केलेले गाणे 'सिलेक्ट ऑल' करा आणि केवळ आम्ही दिलेला 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' निवडा. तुमचे आधी टाईप केलेले गाणे या फॉण्टमध्ये आपोआप रुपांतरीत होईल.
2) 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' हा 'जलद सोप्पी मराठी' या मोफत सॉफ्टवेअरचा भाग ठरतो. त्यामुळे तो सर्वांना मुक्तपणे मोफत उपलब्ध होतो. आम्ही 'जलद सोप्पी मराठी' या सॉफ्टवेअर वरील आणि 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' यावरील मालकी हक्क मराठीला दान केला आहे.
3) या फॉण्टचा वापर मायक्रोसॉफ्टच्या वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, पेन्ट, . . .' वगैरे सर्व ठिकाणी टाईप करून वापरता येतो. त्यामुळे कोणालाही संगीताबाबतचे तुमचे प्रात्यक्षिक दाखवणे व त्यातून शिक्षण देणे सहज शक्य होणार आहे.
4) इंग्रजी सिनेमातील डायलॉग मराठी भाषेत दर्शवले जातात. मराठी सिनेमातील संभाषण इंग्रजीतून टाईप करून दर्शवले जातात. असे कोणत्याही भाषेतील सिनेमा मराठीत आल्यावर घडते. तसेच कोणत्याही भाषेतल्या सिनेमातील गाण्यातील सुरावट त्यातील अक्षरांसकट प्रगट करून चित्रमय माध्यमाला वेगळीच लिज्जत मिळू शकेल.
5) जुन्या गाण्यांच्या रिमिक्स रचनांतील नवी सुरावट वाद्यवृंदांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत यातून पोचवता येईल.
6) गाण्यातील ओळींच्या अक्षरांत वापरलेली सुरावट तर यातून कळतेच पण गायक गात नसताना येणार्‍या बॅकग्राऊंड म्युझिक मधल्या संगीतातील सुरावटींचाही परामर्श यातून घेता येणार आहे. समजा जर गायकाच्या सुरावटींसाठीच्या अक्षरांना काळा रंग दिला आणि बॅकग्राऊंड म्युझिक मधल्या संगीतातील सुरावटींच्या अक्षरांना निळा रंग दिला आणि त्या दोन्ही ओळी एकाखाली एक गाण्याच्या ओघाला अनुसरून प्रदर्शित केल्या तर गायक आणि वादन यातील संगीतमय ध्वनी आलेखन सर्वांपर्यंत पोचेल.
7) जगातील कोणत्याही भाषेतील संगीताचा आस्वाद मराठमोळ्या कागदीपणातून यातून साकार होऊ शकतो. म्हणजेच जागतिकीकरणात संगीताबाबतचा सखोल अभ्यास करण्याची प्रवृत्ती यातून मराठीला मिळून मराठीची क्षमता भव्यदिव्य क्षितीजापर्यंत व्यापक होते.
8) केवळ 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट'चा वापर करून मराठीतील सर्व व्यंजने, स्वर, बाराखडी, जोडाक्षरे, खास-जोडाक्षरे, . . वगैरे म्हणजेच सर्व मराठी यातून टाईप करता येते. शिवाय अक्षरांना सुरावट जोडण्याची क्षमताही याच फॉन्टमध्ये आहे. मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही हे सारे तंत्रज्ञान समाजाला म्हणजेच मायमराठीला दान करत आहोत.
9) पेटी, हार्मोनियम, कॉसिओ शिकताना यांच्या बटणांवर, गिटार शिकताना त्यातील तारांच्या नेमक्या अंतरावर, बासरी शिकताना त्यातील भोकांच्या वापरांमुळे, कोणते सूर उमटतात याची माहिती त्या त्या गाण्याच्या लिखीत अक्षरांबरोबरच 'सरगम' सह 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट' मधून कळते. त्यामुळे वाद्याचे शिक्षण सुलभ होते.
'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट'चा वापर पुढील चित्रात दाखवल्याप्रमाणे विविधतेतून करता येतो.

गाण्याची धुन अक्षरांना सुरावट देत कशी टाईप करता येते याचे प्रात्यक्षिक देणारे चित्र पहा. यात आपल्या राष्ट्रगीताच्या धुनचा वापर कसा टाईप करता येतो ते दाखवले आहे. कोणत्याही गाण्याच्या अक्षरांना अशा प्रकारे सुरावट जोडता येते.
भाग 5 – 'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट'चा प्रसार-प्रचार –
'संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट'चा निर्माण करून आणि हे सारे तंत्रज्ञान मायमराठीला दान करून, संशोधक या नात्याने आम्ही आमचे कार्य पूर्ण केले आहे. आता याचा प्रसार-प्रचार आणि मोफत वितरण यासाठी याला लोकाश्रय आणि राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. ज्या व्यक्ती प्रसार-प्रचाराचे दायीत्व स्विकारण्यास तयार असतील त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
ज्या शाळा, कॉलेज, संगीत विद्यालये, संगीत क्लासेस यांना हा फॉण्ट, याची माहिती आणि याच्या वापराचे मोबाईलवरून मार्गदर्शन हवे असेल तर मुद्याम वेळ काढून मोबाईलवर संपर्क साधावा.
जी वर्तमानपत्रे याच्या प्रसार-प्रचारासाठी अभियान सुरू करणार असतील वा त्याबाबत लेख प्रसिद्ध करणार असतील त्यांच्या पत्रकारांसाठी त्यांच्या वेळेनुसार माहिती देण्याची खास वेगळी सोय केली आहे.
ज्या संगीत प्रेमी व्यक्तींना याचे शिक्षण हवे असेल त्यांच्यासाठी माझ्या घरी याचा खास क्लास सुरू करत आहे. क्लासच्या बुकिंगसाठी संपर्क साधा.
आपला, शुभानन गांगल
संपर्क – 9833102727

2 comments:

  1. असा काही font काढा कि आपोआप सरगम ओळख होईल

    ReplyDelete
  2. असा काही font काढा कि आपोआप सरगम ओळख होईल

    ReplyDelete