बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Thursday, 9 January 2014

युनिकोड ते साऊंडकोड - 6

आजवर मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून मराठीपुरताच विचार करून मराठी व्याकरणाची निर्मिती केली गेली नाही. भाषेत काय, कसे, किती, कुठे आहे ते सांगणे म्हणजे व्याकरण होय. मराठीला बदलण्याचा अधिकार मराठीने कोणालाही दिलेला नसताना आजवर व्याकरणकारांनी मराठीला संस्कृतसारखे बनवायचा निरर्थक प्रयत्न केला. त्यामुळे मराठी आबाळ, मानहानी आणि कुचंबणा झाली. आता मराठीचे उपजत मूलभूत व्याकरण शाळांतून शिकवणे गरजेचे आहे. त्यामुळे केवळ मराठीलाच नव्हे तर सर्व मानवी भाषांना अत्याधुनिक उच्चार-शास्त्र मराठीकडून मिळणार आहे.

मराठीने स्वर उच्चारासाठी जिभेची हालचाल तोंडातील गाभार्‍यात केवळ आठ ठिकाणी नेमून दिली आहे. बासरीच्या भोकांवर बोटे ठेवून त्यातून श्चास टिकेपर्यंत सूर जसे वाजवता येतात तसेच निसर्गाने मानवाला स्वर उच्चाराचे वरदान दिले आहे. योग्य ठिकाणी जिभ स्थीर ठेवल्यास श्वास टिकेपर्यंत स्वराचा उच्चार करता येतो. त्याबाबतचे पुढील चित्र पहा. त्यातून जिभेच्या केवळ आठ स्थितीतून मराठीतील सर्व बारा स्वर कसे निर्माण केले जातात ते लक्षात येईल. यातील स्वरांबाबतची माहिती पुढील लेखांतून येणार आहे. येथे केवळ जिभेच्या स्थितीची नक्की व शास्त्रीय माहिती देत आहे.


No comments:

Post a Comment