मानवाला संदेशवहनातून असंख्य गोष्टी सांगाव्याशा वाटणे आपण स्वाभाविक मानतो. भावनांच्या अनंत छटा व विचारांचे अगणित स्रोत मानवाच्या मनात येतात. संवादातील संदेशातून अगदी कमीतकमी
कालावधीत व आटोपशीरपणे आपण प्रदर्शित करू इच्छिणार्या भावना आणि विचारांच्या अचूक
छटा दूसर्यापर्यंत सहजपणे पोचवता आल्या पाहिजेत. प्रक्षेपण करण्यासाठी मानवाला भाषाकर्मेंद्रिये
निसर्गाने दिलेली आहेत. ‘मुख, त्वचा, डोळे, चेहरा, मान, हात, पाय, धड’ या आठ
इंद्रियांना भाषा-कर्मेंद्रिये म्हणता येते. दोन व्यक्तींमध्ये समोरासमोर संवाद
घडत असताना या आठ इंद्रियांचा वापर कळत नकळत केला जातो, याला आपण इंग्रजीत
बॉडी-लँग्वेज असे म्हणतो.
मग अनेक प्रश्न समोर उभे ठाकतात.
1)
या आठ इंद्रियांपैकी केवळ मुखातून निर्माण केलेल्या ध्वनीचाच
वापर मानवी भाषांसाठी का केला जातो?
2)
जरी ध्वनी या माध्यमाचाच वापर करायचा म्हटले तर या आठ
इंद्रियांचा उपयोग करणे त्यासाठी किती योग्य ठरते?
3)
या आठ इंद्रियांद्वारे काही उपकरणे वापरली जाऊन जरी संवाद
साधला गेला तर ते कितपत योग्य ठरते?
4)
भाषेचे मूलभूत स्वरूप ध्वनी माध्यम वा कागदी माध्यम असणे
गरजेचे ठरते का?
5)
भाषेसाठीची उपकरणे वापरण्याची क्षमता, ध्वनीवर की कागदावर आधारलेल्या
भाषेकडे जास्त असते?
6)
मानवी भाषेची स्वयंभूत निर्मिती केवळ व्यंजन-स्वर यावरच
आधारलेली असणे का योग्य ठरते?
7)
संवादातील प्रक्षेपणाचे सातत्य टिकवून, स्त्री-पुरूष,
आजारी-धडधाकट, आबाल-वृद्ध, अशा कोणालाही वापरता येणारे महत्त्वाचे ठरते का?
8)
त्याच प्रक्षेपणाची पुरावृत्ती अचूकपणे गाठता येण्याची
शक्यता, उपकरणांची आवश्यकता, शक्तीचा कमीतकमी वापर कोणात होतो?
अशा अनेक प्रश्नांचे आटोपशीर स्पष्टीकरण पुढील
तक्यातल्या विवेचनाला दिलेल्या ‘होय’ वा ‘नाही’ या उत्तरातून पूर्ण होते. ज्या इंद्रियाचा दिलेल्या विवेचनाशी सुतराम संबंध येत नाही अशा ठिकाणी ‘x' ही खुण दिली आहे.
भाषाकर्मेंद्रियातील ‘मुख' या इंद्रियातून ध्वनी-माध्यमात बरेच उच्चार करता येतात. त्यातील भिन्न प्रकार व मानवी भाषांतील त्यांच्या उपयोगांची शक्यता, यात बराच फरक आहे. काही गोष्टी मानवासाठी अगदी
नैसर्गिक ठरतात. उदाहरण – रडणे, हसणे, अशा क्रिया जरी भाषांनी मुखावर केलेल्या
संस्कारातूनच सादर होत असल्या तरी ‘तो इंग्रजीतून रडला’ वा ‘तो संस्कृतमधून हसला’
असे घडत नाही! ‘उचकी, खोकला, शिंक’ मात्र अगदी नैसर्गिक असतात. ‘मानवी भाषांनी
याचा स्विकार उच्चार म्हणून केला आणि त्याला खास अर्थ प्रदान केला तर निव्वळ ‘रडणे,
हसणे, उचकी, खोकला, शिंक’ यांच्या केवळ नैसर्गिक प्रक्षेपणालाही भाषीक अर्थ मिळेल!
म्हणजेच अशा ध्वनी-उच्चारांना भाषेतून स्विकारणे अयोग्य ठरते. तुलनेत यांचा समावेश
‘स्वाभाविक’ अशा शब्दात केला आहे. कोणत्या ध्वनी-उच्चारांचा समावेश भाषांतून करणे
योग्य ठरते?, याबाबतचा तक्ता पुढे दिला आहे.
क्रम
|
ध्वनीची ओळख
|
उच्चाराबाबतचे विवेचन
|
भाषेतील उपयुक्तता
|
भाषांची तुलना
|
1
|
खोकला,शिंक,
उचकी,वगैरे.
|
‘नैसर्गिक' व ‘ताबा रहीत'
उच्चार.
|
नकलेतून साधलेला वा चिडविण्यातून सुचविलेला अर्थ.
|
स्वाभाविक
|
2
|
व्यंजनांसारखा क्षणभर टिकणारा ‘निव्वळ स्फोटध्वनी’
|
‘झालेली चुक' दर्शविणारा पालीसारखा आवाज, तान्हुल्याचे रडणे थांबविण्यासाठी केलेले चित्रविचित्र आवाज, घोड्याच्या टापांसारखा आवाज, वगैरे.
|
नकलेतून साधलेला भावनिक व वैचारिक विशेषणात्मक अर्थ, चराचरातील वैयक्तिक गुणदर्शन, इत्यादी.
|
स्वाभाविक
|
3
|
शिट्टी व तत्सम ध्वनी.
|
विविध प्रकारची शीळ घालत म्हटलेले गाणे; आकर्षक सुंदरता
दिसल्यास हळुवार, जोरात, लांबलचक, कर्कश अथवा दणाणून मारलेली शिट्टी! तसेच इतर ध्वनी ज्यात उद्गारवाचकता
व उत्स्फुरता दिसून येते.
|
भावना व विचारांचे वैयक्तिक पातळीवरील प्रदर्शन
|
स्वाभाविक
|
4
|
सूर, श्रृती, स्वर-सप्तके, संगीतात वापरलेल्या ध्वनी
फ्रिक्वेन्सी.
|
शास्त्रीय संगीतातील गायकाची तान,
कोणत्याही श्रुतीतील
आळवलेली धून, विकारांच्या आविष्कारातील
वैयक्तीक स्वभावाची धारणा व्यक्त करणारे ध्वनींच्या प्रक्षेपणातील स्वाभाविक फ्रिक्वेन्सी,
वगैरे.
|
अर्थाविना निव्वळ ध्वनीतून साधले जाणारे आविष्कार, षडरिपुंच्या विकारांचे आदानप्रदान. काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर
यांच्या आचरण क्रियेतील स्वाभाविकता दर्शविणारे आवाज.
|
आधुनिक भाषांनी ध्वनीच्या फ्रिक्वेन्सीला भाषीक अर्थाची जोड दिलेली नाही.
तशी जोड देणे योग्य नाही कारण मग संगीतातील नैसर्गिक श्रृतींच्या गटातून निर्माण
होणार्या रागदारीलाच बाधा पोचते. संस्कृतने मात्र उदात्त (High pitch), अनुदात्त (Low pitch), स्वरीत (Falling pitch) यांचा स्विकार
भाषीक अर्थ स्वरूपात केला आहे!
|
5
|
व्यंजन.
|
‘क्', ‘च्', ‘प्', वगैरे.
|
कमी उर्जा खर्च करणारा, सातत्य बाळगता येईल असा, नियमितपणातून साधलेला,
एकाच कालमापनातील, विचारपूर्वक केलेला,
मुखनिर्मीत, स्फोटध्वनी.
|
निसर्गातील घंटेचा टोल हा स्फोट-ध्वनी जसा क्षणभर टिकतो तसाच भाषेतील ‘व्यंजन’
हा ध्वनी उच्चारात केवळ क्षणभरच टिकू शकतो. ‘ऐकणे’ आणि ‘उच्चारणे’ यातील सुक्ष्म
ध्वनीला मराठी व्यंजन मानते. संस्कृतला हे धोरण अवलंबिता आले नाही.
|
6
|
स्वर.
|
‘अ', ‘इ', ‘उ', वगैरे.
|
कमी उर्जा खर्च करणारा, सातत्य बाळगता येईल असा, नियमितपणातून साधलेला,
कमीतकमी ते श्वास-टिकेपर्यंतच्या कालमापनात उच्चारता
येणारा, विचारपूर्वक केलेला, मुखनिर्मीत, कंपध्वनी.
|
निसर्गातील घंटेचा टोल वाजल्यानंतर त्यापाठोपाठचा घुमणारा कंप-ध्वनी हा जसा बराच
वेळ टिकतो तसाच भाषेतील ‘स्वर’ हा ध्वनी उच्चारात श्वास टिकेपर्यंत टिकू शकतो. मराठीने
श्चास टिकेपर्यंत लांबलचकपणे उच्चारता येणार्या स्वराला स्विकारले आहे. संस्कृतला
हे जमले नाही.
|
7
|
वरती वर्णन केलेल्या प्रकारांपेक्षा वेगळे असे ध्वनी.
|
भयावह स्वप्नातील किंचाळणे, विचारांच्या तंद्रित
केलेली अगम्य स्वगते, अपघातात सापडलेल्या व्यक्तीच्या
वेदना व्यक्त करण्याचे ध्वनीत प्रकार,
वगैरे.
|
भावना व विचारांचे वैयक्तिक पातळीवरील अतिरेकी प्रदर्शन. यात भाषेतील
ध्वनीसुद्धा शब्द-स्वरूप सोडून वावरतात. नक्की निश्चित भाषीक अर्थ त्यात नसतो.
|
स्वाभाविक
|
वर दिलेल्या तक्त्यात ध्वनीबाबतची ‘भाषेतील उपयुक्तता' याखाली दिलेली माहिती अतिशय त्रोटक आहे. ती तशीच व तेवढीच आहे असे समजून चालू नये ही विनंती. त्या ध्वनीबाबतचे सर्व विवेचन मांडण्याची ही जागा नव्हे. या तक्त्यातून एका दृष्टिक्षेपात बर्याच ध्वनिंचा सापेक्ष अभ्यास करता यावा अशी इच्छा आहे. यातून मराठीची सुक्ष्मतेकडून भव्यतेकडे झेपावणारी
शास्त्रीयता पुन्हा एकदा सामोरी येते. मानवी भाषेसाठीची सर्वात नैसर्गिक आणि
शास्त्रीयता मराठीने स्विकारली असल्याने ती सर्वसमावेशक ठरते याचा पुनरुच्चार करणे
योग्य ठरते.
कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या
फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण
विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी सामिल व्हा.
No comments:
Post a Comment