संस्कृतच्या दृष्टीने जे व्यंजन ठरते असे ‘चाणक्य’ शब्दातील ‘च्’ मराठीसाठी
‘च्यायला’ शब्दातील ‘च्य्’ असे जोडाक्षर ठरते. ‘चाणक्य’ मधला ‘चा’ अक्षराचा उच्चार
मराठीतील ‘च्या’ जोडाक्षरासारखाच असतो. जगातील इतर भाषांतील अनेक जोडाक्षरांना
हाताळणे मराठीला तिच्यातील नैसर्गिक सुक्ष्म ठेवणीमुळे सहज शक्य झाले आहे.
ऐकू येणार्या ध्वनीशी अतूट संबंध ठेऊन, भाषेच्या गद्य, पद्य व संगीत या
विभागात मनसोक्तपणे वावरता येण्याची सोय उपलब्ध करणार्या स्वरांनाच केवळ मराठीने
स्विकारले आहे. आरोळी, तान आणि आलाप यांचा वापर प्रत्येक भाषेला करावाच लागतो.
त्यात केवळ त्या भाषेतील स्वर भाग घेतात.
उदाहरण – ‘रामाऽऽऽ‘ अशी आरोळी, तान वा आलाप घ्या. त्यातील केवळ ‘आ’ हा स्वरच
श्वास टिकेपर्यंत लांबवता येतो.
No comments:
Post a Comment