बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Thursday, 9 January 2014

युनिकोड ते साऊंडकोड - 4


उच्चारणे आणि ऐकणे या क्रियांतून संवादाचे प्रक्षेपण आणि ग्रहण होते. भाषेतील स्वर-व्यंजने-अक्षर मानवाला उच्चारता आणि ऐकू येतात. ‘अक्षर’ याची सर्वात सुक्ष्म ध्वनीची व्याप्ती ‘उच्चारून ऐकता येणार्‍या ध्वनीवर’ अवलंबून असते. भाषा-उच्चार-ध्वनी याचा सुक्ष्मक म्हणजे उच्चारता येणारे अक्षर होय. भाषा-श्राव्य-ध्वनी याचा सुक्ष्मक म्हणजे ऐकून जाणवणारे अक्षर होय. श्राव्य-व्यंजन आणि श्राव्य-स्वर यातून मानवाला ध्वनी-व्यंजन आणि ध्वनी-स्वर यातील सर्वात सुक्ष्म भाग निवडता आणि भाषेतून वापरता येतो. 






सुक्ष्मतेतून भव्यतेकडे असा अत्यंत नैसर्गिक प्रवाह अबाधीत राखल्यामुळे मराठीला ‘जोडाक्षरे’ यांची व्याख्या अधिक चांगल्या स्वरूपात हाताळता आणि भाषेतून वापरता आलेली आहे.

No comments:

Post a Comment