बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Thursday, 9 January 2014

युनिकोड ते साऊंडकोड - 3


भाषेत शब्द, शब्दात अक्षरे आणि अक्षरात व्यंजन व स्वर असतात. मानवाला व्यंजनाचा उच्चार स्वराशिवाय करता येत नसल्याने कोणत्याही मानवी भाषेला ‘व्यंजन’ या ध्वनी स्वरूपाला ‘अक्षर’ बनवून भाषेत वापरता येत नाही. स्वराचा उच्चार तटस्थपणे करता येत असल्याने स्वर मात्र अक्षर ठरतात. उच्चाराचा ध्वनी-एकक जरी अक्षर ठरत असले तरी मानवाच्या जाणीवांना जाणवणारा भाषा-ध्वनी-एकक ‘व्यंजन’ आणि ‘स्वर’ ठरतात. म्हणजेच ‘अक्षर’ या संकल्पनेची सुद्धा फोड करता येते आणि अक्षरात ‘व्यंजन’ आणि ‘स्वर’ असे दोन महत्त्वाचे भाग असतात. आता या ज्ञानामुळे आपल्याला ‘अक्षर म्हणजे उच्चार-एकक’ अशी अचूक व्याख्या करता येते. तसेच ‘भाषा-ध्वनी-एकक म्हणजे व्यंजन आणि स्वर’ अशी व्याख्या बनते. मौखिक-व्यंजने आणि मौखिक-स्वर यांना लिखीत-व्यंजने आणि लिखित-स्वर असे पुन्हा एकास-एक स्वरूप देणे शास्त्रीय ठरते. म्हणजेच एका ध्वनी-व्यंजनाला एकच कागदी-व्यंजनाचे चिन्ह आणि एका ध्वनी-स्वराला एकच कागदी-स्वराचे चिन्ह प्रदान करणे शास्त्रीय ठरते.


No comments:

Post a Comment