निसर्गाने मानवाला उच्चार-शास्त्राच्या अनुषंगाने जे दिले आहे त्याचे व्यंजन
आणि स्वर यासाठी ‘मूलभूत’ आणि ‘ओघवते’ असे दोन भाग करणे क्रमपात्र ठरते. त्यातून मराठी
भाषेला उपजत मूलभूत स्वरूप प्राप्त होऊन, मराठी भाषा मानवी भाषांतील
उच्चार-शास्त्राला नवी दिशा देणार आहे. ज्या व्यंजनांच्या ‘क्षणभर’ आणि स्वरांच्या
‘श्वास टिकेपर्यंत’ च्या उच्चार-कालावधीसाठी ते सुरवातीपासून शेवटपर्यंत अखंडीतपणे
पूर्णवेळ ऐकू येतात त्यांना ‘मूलभूत’ या नावाने ओळखणे नैसर्गिक ठरते.
मराठीतील ‘अ, आ, इ, उ, ए, ओ, अॅ, ऑ’ हे आठ स्वर दोन, पाच, दहा अथवा श्वास
टिकेपर्यंत उच्चारून बघा. त्यांचा सुरवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येकी एकच अखंडीत
उच्चार पूर्णवेळ ऐकू येईल. संस्कृतने ‘ए’ स्वराला मूलभूत मानले नाही. कोणत्याही
मानवाने ‘ए’ स्वराचा उच्चार करून त्यातून एकच अखंडीत उच्चार पूर्णवेळ ऐकू येतो हे
तपासून घ्यावे. मराठी भाषा पूर्ण नैसर्गिक आणि शास्त्रीय असल्याचा हा आणखी एक
दाखला मिळतो. तसेच मराठीतील ‘क, ग, ङ, ट, ड, ण, च, ज, ञ, त, द, न, प, ब, म, य, र,
ल, व, स, श, ष, ह, ळ’ ही चोवीस व्यंजने कोणत्याही स्वरासोबत उच्चारा त्यांचा
क्षणभर टिकणार्या उच्चारात केवळ एकच अखंडीत ध्वनी ऐकू येईल. मराठीत ‘चमचा’ मधला
‘च’, ‘जहाज’ मधला ‘ज’ आहे हे विसरू नका.
उच्चारातील हवेचा बाहेर जाणारा प्रवाह न थांबवता अखंड ठेऊन मूलभूत स्वर आणि
मूलभूत व्यंजन यात दुसरा उच्चार मिसळून त्याचे ओघवते-स्वर आणि ओघवती-व्यंजने
बनतात. निसर्गाने मानवाला दिलेल्या उच्चार शास्त्राशी अचूकतेने पाठपुरवणी करून
मराठीने ओघवते-स्वर आणि ओघवती-व्यंजने स्विकारली आहेत. कोणत्याही मानवी भाषेतील
स्वर आणि व्यंजनांना हा नियम लागू होतो.
मराठीत ‘क्, ग्, ट्, ड्, च्, ज्, त्, द्, प्, ब्’ ही मूलभूत व्यंजने आहेत.
यांच्या उच्चारात गुंतलेली जिभ सोडवून मग त्यात स्वर मिसळून मराठीतील ‘क, गा, टि,
डी, चु, जू, ते, दो, पो, बौ’ अशी बरीच अक्षरे बनतात. ‘क्, ग्, ट्, ड्, च्, ज्, त्,
द्, प्, ब्’ या व्यंजनांच्या उच्चारात गुंतलेली जिभ सोडवून त्यात स्वर
मिसळण्यापुर्वी ‘ह-सदृष्य ध्वनी’ (महाप्राण) मिसळता येतो. जिभेला चपळतेने ही
हालचाल जमते. त्यातून अशी ‘ख्, घ्, ठ्, ढ्, छ्, झ्, थ्, ध्, फ्, भ्’ अशी दहा
व्यंजने उच्चारता व भाषेत वापरता येतात. यांना ओघवती-व्यंजने म्हणतात. यातील ‘क्+ह्=ख्’, ‘ग्+ह्=घ्, ट्+ह्=ठ्, ड्+ह्=ढ्, च्+ह्=छ्, ज्+ह्=झ्, त्+ह्=थ्, द्+ह्=ध्, प्+ह्=फ्, ब्+ह्=भ्’ अशा रितीने झालेल्या एकत्रीकरणात कोणताही विराम
आलेला मानवाच्या लक्षात येत नाही. ‘क्+अ’, ‘क्+आ’ असे जेव्हा व्यंजनाला स्वर जोडून अक्षर बनते तेव्हा व्यंजन आणि स्वर
यामध्ये विराम जाणवत नाही तसेच येथे घडते.
‘अ’ स्वराचा उच्चार जिभेच्या आरामदायी सामान्य स्थितीतून होतो. ‘अ’ नंतर
जिभेने चपळतेने ‘इ’ उच्चाराचे स्थान गाठले की त्या ‘अ’ आणि ‘इ’ स्वरांच्या
उच्चारात विराम आलेला नसतो. त्यामुळे त्यातून ‘ऐ’ स्वर साकारतो. इतर
स्वरांप्रमाणेच तो भाषेतून मुक्तपणे वापरता येतो. ‘ऐ=अ+इ’ हे समिकरण अत्यंत नैसर्गिक ठरते. ‘कैलास’
शब्दातील ‘कै’चा उच्चार ‘क्+अ+इ’ असाच होतो हे लक्षात येईल. ‘कैलास’चा उच्चार ‘क्+आ+इ’ असा होत नाही हे प्रत्येकाला कळेल. कोणत्याही
पुस्तकाचा आधार न घेता, निसर्गाने मानवाला दिलेल्या ‘स्वरयंत्र ते ओठ’ या
उच्चाराच्या नैसर्गिक प्रयोगशाळेचा वापर करून जगातील कोणीही हे तपासून बघू शकता.
तसेच ‘अ’ नंतर जिभेने चपळतेने ‘उ’ उच्चाराचे स्थान गाठले की त्या ‘अ’ आणि ‘उ’
स्वरांच्या उच्चारात विराम आलेला नसतो. त्यामुळे त्यातून ‘औ’ स्वर साकारतो. इतर
स्वरांप्रमाणेच तो भाषेतून मुक्तपणे वापरता येतो. ‘औ=अ+उ’ हे समिकरण अत्यंत नैसर्गिक ठरते. ‘कौलारु’
शब्दातील ‘कौ’चा उच्चार ‘क्+अ+उ’ असाच होतो हे लक्षात येईल. ‘कौलारु’चा उच्चार ‘क्+आ+उ’ असा होत नाही हे प्रत्येकाला कळेल. कोणत्याही
पुस्तकाचा आधार न घेता, निसर्गाने मानवाला दिलेल्या ‘स्वरयंत्र ते ओठ’ या
उच्चाराच्या नैसर्गिक प्रयोगशाळेचा वापर करून जगातील कोणीही हे तपासून बघू शकता.
very nice information, thank u sir
ReplyDelete