बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Thursday, 9 January 2014

युनिकोड ते साऊंडकोड - 1




भाषा म्हणजे विचार आणि भावनांचे आदानप्रदान. यासाठी भाषेशिवाय दुसरे कोणतेही सक्षम साधन मानवाकडे नाही. जग बैलगाडीचे असो वा संगणकाचे मानवाला भाषा हे साधन वापरावेच लागते. निसर्गाने मानवाला भाषा दिली नाही. मानवाला भाषा निर्माण करता येतात वा शिकता येतात कारण निसर्गाने मानवाला भाषा बनविण्याची केंद्रे मेंदुत दिली आहेत. प्रत्येक भाषेत शब्द असतात. भाषा तीन माध्यमातून वावरते. ध्वनी, कागद आणि संगणक. या तिन्ही माध्यमातून शब्दाला वावर करता येतो. केवळ शब्द या संकल्पनेला अर्थ जोडलेला असतो. शब्द हीच संकल्पना गद्य, पद्य आणि संगीत या तिन्ही विभागातून वावरते. गद्य म्हणजे वाक्यातून प्रदर्शित होणारा अर्थ. पद्य म्हणजे लयतालविचारातून प्रदर्शित होणारा अर्थ. संगीत म्हणजे ध्वनीच्या फ्रिक्वेन्सी या गुणधर्मामुळे 66 श्रृतींच्या सहाय्याने  ‘मंद्र, मध्यम, तार’ सप्तकातल्या सूरांतून प्रदर्शित होणारा नादमय अर्थ.

भाषा प्रथम मौखिक असते. ध्वनी माध्यमातून भाषेचा जन्म होतो. जन्मलेली भाषा कुटूंबातून वावरते. नव्या जन्मलेल्या बाळाला आपल्या कुटूंबाची भाषा शिकण्याची सुरवात ध्वनी माध्यमातूनच करावी लागते. म्हणजेच भाषेची निर्मिती वा भाषेचे प्राथमिक शिक्षण यासाठी मानवाला केवळ ध्वनी माध्यम वापरावे लागते. ध्वनीच्या ज्या उच्चारीत अविष्काराला अर्थ जोडता येतो त्याला शब्द म्हणतात. ध्वनीच्या शब्द रूपाची फोड करून त्यातील सुक्ष्म भाग ‘ध्वनी एकक’ ठरतो. ‘ध्वनी एकक’ म्हणजे उच्चारता येणारा ध्वनीचा सर्वात छोटा तुकडा. यातील ‘उच्चारता येणारा’ या क्रियेचा नीट व शास्त्रीय अर्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. ध्वनीच्या उच्चाराची सुरवात होण्या अगोदर विराम असतो आणि ध्वनी उच्चाराच्या शेवटी विराम येतो. याचाच अर्थ ध्वनीच्या ‘विराम-ध्वनी-विराम’ अशा सर्वात छोट्या स्वरूपाला ‘ध्वनी एकक’ म्हणतात.


No comments:

Post a Comment