युनिकोड ते साऊंडकोड – लेख 32 – IPA च्या मर्यादा, अज्ञान, दोष व अयोग्यता आणी मराठीचे
सार्वभौमिकत्व
(लेखनात एक-वेलांटी एक-उकार
वापरले आहेत)
IPA चा अभ्यास करून त्यातील
वैचारीक भुमीका, व्यवहारात्मक दृष्टीकोन आणी भाषांच्या जागतीकीकरणातील
सर्वसमावेशकता यांच्या वीचारातुन खुप तृटी मला दीसल्या आहेत. या लेखातुन या
वीषयाला केवळ वाच्यता द्यावी एवढेच घडवत आहे, यातुन हा वीषय खुप वीस्तुत असला तरी
त्याची पुर्णता करण्याची नीश्चीत दीशा यातुन स्पष्ट होते.
जगभर अनेक
व्यक्तींनी IPA चा अभ्यास करून त्यातील दोष
प्रगट केले आहेत. पण यातील बहुतेक लेखामागचे धोरण, शब्दांकन आणी आखणी अशा सर्व
गोष्टी 'इंग्रजी भाषेचा' आधार घेऊन वावरते. ज्या भाषेतील ध्वनीबाबतच्या अज्ञानाचे
वर्णन केवळ 'चीत्र लीपीपेक्षा थोडी वरचढ भाषा' एवढेच करता येते त्या इंग्रजी भाषेतुनच
केलेल्या शब्दांकनाची पोच जास्तीतजास्त ज्या कुंपणापर्यंत जाऊ शकते, तेथपर्यंत पोचण्याची
धडपड यातुन दीसते. जगभरच्या अनेक भाषांतील अभ्यासु व्यक्तींनी IPA च्या दोषांची कारणमीमांसा
मांडताना पुन्हा इंग्रजीचाच वापर केल्याचे दीसते कारण केवळ इंग्रजीतुनच IPA व्यक्त झालेले आहे.
जगभरातील वीवीध भाषांना मानवाच्या जागतीकीकरणातील सर्वोच्च शास्त्रीय व नैसर्गीक
भाषेच्या शोधाचे डोहाळे लागले आहेत. आपापल्या भाषांतील अतृप्तता व दोष सांभाळत
वाहणार्या त्या त्या प्रदेशातील त्या जणु नद्या ठरतात! गढुळ पाण्यातुन वाहणार्या
नदीने, डोगरकपारी कातळातुन पाझरणार्या झर्याच्या नीतळ, स्वच्छ व शुद्ध
पाण्याबाबत सांगावे असे काहीसे यातुन घडते!
भाषांच्या अशा नद्या एकत्र येऊन IPA नावाच्या महासागरात जरी मीळाल्या आणी त्या मोठ्या
जलाशयात नद्यांची गढुळता नीवळल्यासारखे वाटले तरी त्या महासागराला येणारा खारटपणा 'कधीही
न नीस्तरता' येणारा ठरतो. तसेच 125 वर्षे पुर्ण केलेल्या IPA चे झाले आहे.
जगातील सर्व भाषा एकत्र येऊन शोध कशाचा घेत आहेत तर मानवासाठीच्या नैसर्गीक भाषेच्या
झर्याच्या नीतळ, स्वच्छ व शुद्ध पाण्याचा!, आणी त्याची सुरवात करत आहेत IPA नावाच्या महासागरापासुन! सर्व
जागतीक भाषांनी एकत्र येवुन केलेला हा प्रयत्न कीतीही स्तुत्य असला तरी तो फोल
ठरला आहे, हे कळायला, मानवाला IPA च्या 125 वर्षाच्या कालावधीची आहुती द्यावी लागली आहे. आपण
आपल्या मनात एक मांडणी नक्की करुया की, 'मानवाला जे साध्य करायचे आहे ते नक्की
करता येणार आहे'. IPA च्या महासागरातील नौकानयनातुन,
वीचारांचा प्रवास, दर्याडोंगरातील झर्याच्या नीतळ, स्वच्छ व शुद्ध पाण्यापर्यंत,
कसा पोचणार? मग यासाठीचा मार्ग कोणता? यासाठीचे मार्गदर्शन कसे मिळेल?
जो झरा डोंगरातील तळ्यात पोचतो, त्या तळातल्या पाण्याला नीतळ, स्वच्छ व शुद्धतेबाबत
बोलण्याचा सर्वाधीक, प्रांजळ व प्रामाणीक हक्क असतो. आज मराठी भाषेच्या तळ्यावरील पाण्याच्या
पृष्ठभागावर जरी '''अयोग्य चुकीच्या व्याकरणीय पुस्तकांच्या वनस्पती आणी शुद्धलेखन
नियमावलीची भरमसाठ वेगाने वाढत जाणारी बांडगुळे फोफावली असली''' तरी त्याखालील
'मराठमोळी' मराठी अजुनही आपले नीतळ, स्वच्छ व कधीही अशुद्ध न होणारे स्वयंभु, उपजत
व मुलभुत स्वरुप जपुन आहे.
यासाठी मराठीच्या राजहंसाने बदकांच्या घोळक्यातुन वावरणे सोडले पाहीजे, मराठीच्या
कोकीळेने कावळ्याचे घरटे सोडुन भव्यद्वीव्य उत्तुंग क्षीतीजाच्या परीसरात नीळ्या
नभीचा पंचम गायला लागले पाहीजे. जागतीक पातळीवर IPA ला जे घडवुन आणायचे आहे, त्यासाठीचा
मार्ग मराठी भाषेच्या नैसर्गीकपणातुन व शास्त्रीयतेतुनच सापडणार आहे.
मराठीसाठीच्या मी घेत असलेल्या 'सर्वसमावेशक' भुमीकेतुन, 'मराठीच्या कुटुंबात'च
काय घडते आहे?, ते एका उदाहरणातुन व्यक्त करतो. समजा आपल्याला 'श्रद्धा व
अंधश्रद्धा' याबाबतची 'सर्वसमावेशक' भुमीका घ्यायची आहे. तर याच्या
व्युत्त्पत्तीचे जन्मस्थान ठरणार्या 'अस्तीक व नास्तीक'पणापासुन सुरवात होणे
गरजेचे ठरते. 'अस्तीक व नास्तीक'पणाचा उगम 'धर्म' या संकल्पनेतुन जोपासला जातो.
प्रत्येक व्यक्ती त्या त्या धर्म-वीचारतुन प्रभावीत झालेली असते. त्यामुळे समाजातील
'श्रद्धा व अंधश्रद्धा' याबाबतची 'सर्वसमावेशक' भुमीका कोणालाही पटणार नाही, कारण
देवळातील व्यक्तींना ती मुसलमानी वा ख्रीस्ती, मसजीदीतील व्यक्तींना ती हिन्दु वा ख्रीस्ती,
आणी चर्च मधील व्यक्तींना मुसलमानी वा हिन्दु वाटेल. 'कृपया यात कोणालाही दुखवायचा
कोणताही प्रयत्न नाही' हे लक्षात घ्यावे. खरे म्हटले म्हणजे असे वाक्य लीहीण्याची
गरज पडते, यातुनच समाजातील प्रत्येकाच्या वीचारांची बैठक स्पष्ट होते, होय ना?.
अगदी हेच 'सर्वसमावेशक मराठी' या माझ्या भुमीकेतुन घडत आहे. समाजातील प्रत्येकाने
आपापल्या मनात जपलेल्या, आत्तापर्यंत केलेल्या आयुष्यातील प्रवासाला आणी अनेक वर्ष
सत्य म्हणुन मानलेल्या गृहीताला यातुन तडा जातो व म्हणुन जरी वैचारीक पातळीवर 'सर्वसमावेशक
मराठी' कीतीही योग्य असली, तरी समाज-रुपी मांजराच्या गळ्यात घंटा कशी बांधणार? हा
प्रश्न पडतो. प्रत्येक गट आपापल्या वीचारसरणीचा गुलाम असतो आणी म्हणुन 'सर्वसमावेशक'
भुमीका पटली तरी मान्य करण्याची क्षमता व धमक कोणातच नसते, हे मी अनेक वर्षे
अनुभवले आहे, अनुभवत आहे. एक संशोधक म्हणुन ही 'सर्वसमावेशक' भुमीका मांडत राहणे,
एवढेच मला जमेल तेवढे, करायचा प्रामाणीक प्रयत्न मात्र करत आहे.
'उच्चार, अक्षर, चीन्ह, लेखन व अर्थ' यांची अनोखी एकजुट घडवुन आणण्याचे
सामर्थ्य केवळ मराठीत आहे. मराठीने देवनागरी चिन्हांचाच वापर करुन, स्वतःच्या
लीपीला 'मराठमोळी' नाव दीले की मराठीचा मराठीपणातुन मराठीसाठीचे मराठमोळेपण आपोआप
सीद्ध होणार आहे. आत्ता देवनागरी नावाच्या स्क्रीप्टच्या एकाच ताटात संस्कृत, हीन्दी
व मराठी भाषेला उष्टेखरकटे खायला घातले जात आहे. हे सारे इंग्रजी भाषेच्या
वीचारसरणीतुन घडले आहे. स्क्रीप्ट म्हणजे लीपी नव्हे हे ज्या भाषेला कळत नाही त्या
भाषेच्या आधाराने मानव IPA घडवीण्याची पराकाष्टा करत
आहे. हा वीरोधाभास लक्षात घेणे गरजेचे आहे 'मराठमोळी' या नावाने स्वतःचे भीन्न ताट
मांडुन त्यात देवनागरीची मराठीला आवश्यक तेवढीच चिन्हे, आपल्या चवीपरीने वाढुन
घेण्याची संधी, मराठीला मीळणार आहे आणी यामुळे जागतीकपातळीवर मानवाला सर्वोच्च
शास्त्रीय व नैसर्गीक भाषेचा शोध घेण्याची संधी मीळणार आहे.
कोणती तरी 'टींबकटु' नावाची भाषा शोधुन त्यावर प्रयोग करण्यापेक्षा, जी भाषा
आजही जगात अधीक बोलणार्या भाषेत पंधरावे स्थान पटकावुन आहे त्यावर हे प्रयोग झाले
तर? जगभरच्या 'भाषा वैज्ञानीक डॉक्टरांना' (!) मराठी
भाषेतील सत्तर कोटी व्यक्तींचे जीते-जागते सजीव नमुने Out Patient Department (OPD) म्हणून वापरता येतील! मराठीतील बोली भाषा, आजवरचे मराठी साहीत्य,
वीवीध मराठी लेखनाचे नमुने, काय काय आणी कीती कीती गोष्टी हाताळताना, येणार्या
अडचणीचा उलगडा यातुन होणार आहे. तसेच मराठीचे आजमीतीस असणारे सर्व प्रश्न पुर्णपणे
सोडवायचे श्रेयही आजच्या पीढीला यातुन लाभेल.
खुद्द
IPA ने 'सामान्यपणे वीचारले
जाणारे प्रश्न' (FAQ) यासाठी दिलेल्या http://www.ipasource.com/faq या लिंकवर IPA बाबतच्या तुमच्या मनातल्या बर्याच
प्रश्नांना, IPA ने दीलेली उत्तरे मीळतील. पण
जगभरच्या वीवीध अभ्यासु समीक्षक, चीकीत्सक आणि टीकाकारांनी मांडलेले जवळजवळ दहा
लाख नीबंध, लेख व प्रबंध यातुन IPA च्या मर्यादा, अज्ञान, दोष व अयोग्यता लक्षात येते. अर्थात
मानवाने मानवासाठी मानवाकरता घेतलेले हे सारे उपक्रम आहेत, याची सामंजस्याने दखल
घेणे गरजेचे आहे. IPA ने ठरवलेली उद्दीष्ट्ये साध्य
करता यावीत हाच सर्वांचा एकमेव उद्देश आहे.
संशोधनातुन
पुर्ण केलेल्या वीचारांना शब्दांकन देत काही लेख, फेसबुकवरील मर्यादा लक्षात घेऊन
पोस्ट करत आहे. ज्यांना याबाबत अधीक माहीती हवी असेल त्यांनी जरुर मोबाइलवर संपर्क
साधावा.
‘युनीकोड ते साउंडकोड’
याबाबतचे लेख
http://soundcode.blogspot.in/ या ब्लॉगवर वाचा. कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या
फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण वीकासात
वीवीधतेने सहभाग घेण्यासाठी सामील व्हा.
आपला, शुभानन गांगल
No comments:
Post a Comment