युनिकोड ते साऊंडकोड
– लेख 43 – मोडी ते
देवनागरी लीप्यंतरणाचा अत्याधुनीक मार्ग - Modeeleepee-Gangal-001 युनीकोड फॉण्ट
(नावे सोडुन लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरले
आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयमावली झीडकारली आहे)
मोडीलीपी शीकवण्याचे पारंपारीक शीक्षण याचा उल्लेख ''कागदावर
अक्षरे गीरवत मोडी शीकणे'' असा करता येतो. आता मी विकसीत केलेली ''फॉण्टच्या
माध्यमातुन मोडी शिकणे'' ही अत्याधुनीक पद्धत आणी पारंपारीक ''कागदावर अक्षरे
गिरवत मोडी शीकणे'' यांची तुलना करत दोघांची उपयोग क्षमता आणी मर्यादा सांगणे हा
या लेखाचा वीषय आहे. अत्याधुनीक संगणकीय पद्धतींचा मराठीला मुक्त स्वच्छंद
मनसोक्तपणे मोफत वापर करता यावा हा माझा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याचा इतीहास, जो आजवर करोडो-करोडो मोडीच्या पानापानांतुन दडुन बसला आहे,
तो आपल्याच पीढीने प्रकाशात आणावा, यासाठीचा हा माझा खारीचा वाटा आहे. आपल्या सर्वांच्या
सहयोगाने हे सहज शक्य होइल. त्यासाठी 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर 'अवघा मराठी तीतुका मेळवावा, मराठमोळा इतीहास जगाला
कळवावा' यासाठी सामील व्हा.
क्रम
|
कागदावर अक्षरे गीरवत मोडी शीकणे
|
फॉण्टच्या माध्यमातुन मोडी शिकणे
|
|
मुद्या क्रमांक - 1
|
धोरणात्मक वीचारसरणी
|
||
1
|
वही व पेन घेउन कागदावर मोडीलीपीतील अक्षरे गीरवत
मोडीलीपी शीकणे. यातुन मोडीलीपीतील अक्षरांचे वळण हातांना लागुन त्याबरोबर
डोळ्यांनाही ती अक्षरे बघायची सवय लागते.
|
कागदाला स्पर्शही न करता, म्हणजेच 'हाताला मोडीलीपीतील
अक्षरांच्या हस्त-लीखीताची काडीमात्र सवय न लावता', केवळ डोळ्यांना मोडीलीपीची
अक्षरे ओळखण्याचे शीक्षण देणे.
|
|
2
|
क्लासेसमधुन मोडीच्या जाणकारांकडुन मोडीलीपीचे शीक्षण
देणे
|
घराघरातील संगणका द्वारे मोडीचे शीक्षण स्वतःच घेणे.
|
|
मुद्या क्रमांक - 2
|
साधनसामुग्रीची आवश्यकता
|
||
1
|
मोडीलीपीच्या क्लासची सोय तुमच्या राहत्या घराच्या
परीसरात वा सहजपणे जाता-येता येण्याच्या आवाक्यात असणे.
|
तुमच्याकडे संगणक असणे. त्यात इंटरनेटची सोय असलीच पाहीजे
असे बंधन नाही, पण असल्यास अधीक चांगले.
|
|
2
|
वही, पेन्सील आणी मोडीलीपीबाबतची पुस्तके विकत घ्यावी
लागतात. योग्य ठरणारी मोडीबाबतची पुस्तके मीळवणे साधावे लागते. इतर शहरातुन ती
मागवावी लागतात.
|
'जलद सोप्पी मराठी' हे सॉफ्टवेअर आणी त्यातुन चालणारा Modeeleepee-Gangal-001 हा फॉण्ट मोफत उपलब्ध आहे. इंटरनेटवरुन सॉफ्टवेअर व
फॉण्ट मीळण्याची सोय केली आहे.
|
|
मुद्या क्रमांक - 3
|
मोडीलीपीच्या क्लास मधल्या शीक्षणात व्यतीत होणारा वेळ व परीश्रम
|
||
1
|
क्लाससाठी घरातुन तयारी करुन नीघणे व प्रवास करुन क्लासला
पोचणे (अंदाजे एक तास), क्लास मधील शीक्षणाचा वेळ (अंदाजे दोन तास), क्लास
संपल्यावर आवराआवरी करुन, गप्पा टप्पा करुन, नीघणे व प्रवास करुन घरी पोचणे
(अंदाजे एक तास). म्हणजे एका दीवसाच्या क्लाससाठी अंदाजे चार तास घालवावे
लागतात. एकुण बराच अनावश्यक वेळ जातो, प्रवास खर्च येतो आणी परीश्रम घ्यावे
लागतात.
|
घर बसल्या संगणक ऑन केला की इमेल द्वारे दीलेला
अभ्यासक्रमातील पुढील धडा शिकायला लगेच सुरवात होऊ शकते. इमेल द्वारे याबाबत
योग्य मार्गदर्शन मीळत असल्याने टप्प्या टप्प्याने मोडीलीपीच्या अक्षरांची ओळख
डोळ्यांना होउ लागते. 'क्लासला जाण्यासाठी तयारी करुन नीघणे व क्लास संपल्यावर
प्रवास करुन घरी पोचणे' यातील वेळ व परीश्रम दोन्ही वाचतात. वीजेचे संगणकासाठीचे
बील एवढाच खर्च येतो.
|
|
मुद्या क्रमांक - 4
|
काही कारणांनी ठरावीक दीवस क्लासला जाता न आल्याने होणारा परीणाम
|
||
1
|
क्लास मधील अभ्यासक्रम पुढे गेलेला असल्याने महत्त्वाचे
वीषय कळायचे राहुन जाते. बुडलेला अभ्यासक्रम व त्यावेळी वीद्यार्थ्यांनी
विचारलेल्या अडचणींची उत्तरे शीक्षकांकडुन मीळताना होणारे खरे शिक्षण यांना
मुकावे लागते.
|
स्वतःच्या तब्येतीनुसार व रीकाम्या वेळेचा उपयोग
'फॉण्टच्या माध्यमातुन मोडी शिकणे' यासाठी करता येतो. दीवसातुन हवे तेव्हा,
कमी-अधीक असलेला उपलब्ध वेळ सोइनुसार व मर्जीने वापरुन आनंदाने घरबसल्या शिक्षण
मीळते.
|
|
2
|
वीद्यार्थ्यांच्या नोकरी, धंदा, कामकाज, शालेय वा कॉलेजचा
अभ्यास, घरगुती अडचणी व कामे यातुन क्लासच्या ठरावीक वेळीच उपस्थीत राहणे
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अशक्य होउन बसले आहे. मोडीलीपीचे क्लासेस घेणारे
शिक्षक त्यातुन आर्थीक मीळकत न घेता, केवळ मराठीवरच्या प्रेमापोटी क्लासेस
चालवताना दीसतात. पण जर वीद्यार्थ्यांची उपस्थीतीच कीरकोळ असेल तर त्यांच्या
उत्साहाला वीरजण लागते.
|
कौटुंबीक गरजा, सणवार व सुट्टीच्या दीवशी अचानक हजर
होणारे नातेवाइक व मीत्र-मैत्रीणी. शारीरीक स्वास्थ व आजारपण, अशा अनेक
गोष्टींतुन जेव्हा वेळ मीळेत तेव्हा त्या वेळेचा उपयोग मोडीलीपीच्या शीक्षणासाठी
देणे 'फॉण्टच्या माध्यमातुन मोडी शिकणे' या उपक्रमातुन शक्य होते. कुटुंब,
नातेवाइक, मीत्र-मैत्रीणी, शेजारपाजार यांच्यासाठी सुरळीतपणे वेळ काढता येतो व
मोडीलीपी शीकणे हा व्याप वाटत नाही.
|
|
मुद्या क्रमांक - 5
|
मोडीलीपी शीकण्यात भाग घेउ शकणार्या वयस्कर व महीला व्यक्तींच्या गरजा
|
||
1
|
'आम्हाला
मोडीलीपी शीकायची इच्छा आहे, पण लांबचा प्रवास करुन जाता येत नाही', अशा
मर्यादांमुळे मोडीलीपीच्या क्लासेस मधली हजेरी तुटपुंजी असते.
|
'आम्हाला मोडीलीपी शीकायची इच्छा आहे, पण लांबचा प्रवास
करुन जाता येत नाही', अशा मर्यादांना सहजपणे ओलांडुन मोडीलीपी शीकण्याची सुरवात
घरोघरी होउ शकते.
|
|
2
|
'मी
गृहीणी आहे. घरातील कामे व आवराआवर झाली की मला केवळ दुपारी वेळ मीळतो, पण
त्यावेळी आमच्या आजुबाजुला जवळपास कोठेही मोडीलीपीच्या शीक्षणाचा क्लास नाही',
यावर महाराष्ट्रात जागोजागी वीद्यार्थ्यांच्या वेळेत घेतले जाणारे मोडीलीपीचे
क्लासे घेणे अशक्य आहे.
|
'मी गृहीणी आहे. घरातील कामे व आवराआवर झाली की मला केवळ
दुपारी वेळ मीळतो, पण त्यावेळी आमच्या आजुबाजुला जवळपास कोठेही मोडीलीपीच्या
शीक्षणाचा क्लास नाही', यावर 'फॉण्टच्या माध्यमातुन मोडी शिकणे' हाच एकमेव उपाय
ठरतो. यातुन वीद्यार्थ्यांच्या घरीच जणु 'मोडीलीपीचा क्लास' पोचतो!
|
|
मुद्या क्रमांक - 6
|
मोडीलीपी शीकण्यात भाग घेतलेल्या बहुतेक वीद्यार्थ्यांचे मनोगत
|
||
1
|
'क्लासमध्ये
मी वेळेवर व नीयमीत जातो पण बरेच वीद्यार्थी आधीच्या क्लासला आलेले नसतात व
त्यांना तो झालेला वीषय कळण्यासाठी तो वीषय पुन्हा घेण्यात येतो. त्यातुन आमचीही
पुन्हा उजळणी होइल असे सांगीतले जाते. आम्हाला यात गप्प राहणे एवढेच करावे
लागते. खरे म्हटले तर आमचा त्या दीवशीचा वेळ फुकट जातो कारण आमचे ते शीक्षण
झालेले असते. पण ठरलेला अभ्यासक्रम सर्व वीद्यार्थ्यांसाठी पुर्ण करणे हे
शिक्षकांची जबाबदारी असते. यावर उपाय नसतो.
|
एकदा कळलेला वीषय खरच नक्की कळला आहे का? याची जाण मी
नीर्माण केलेल्या स्वाध्यायातुन वीद्यार्थ्यांना स्वतःलाच कळते. डोळ्यांना
मोडीलीपीची किती सवय झाली आहे ते स्वाध्यायातुन वीद्यार्थ्यांनाच त्यांचे त्यांना
कळते. त्यांनी सोडवलेला स्वाध्याय त्यांना दीलेल्या इमेल द्वारे मला पाठवावा
लागतो. त्यातील सुयोग्यता पटली तरच त्यानंतरचा स्वाध्याय दीला जातो. यातुन
आवश्यक ती उजळणी होणे व वीद्यार्थ्याची जाणुन घेण्याच्या क्षमतेप्रमाणे शिक्षण
देणे साधता येते.
|
|
2
|
एकच वीषय काही वीद्यार्थ्यांना बरेच वेळा सांगुनही लक्षात
रहात नाही व ज्यांची आकलन शक्ती जास्त आहे त्यांच्या शीक्षण घेण्याच्या वेगाला
अडचण येते. 'कासव' व 'ससा' यांना एकाच वेगाने मोडीलीपीच्या शीक्षणाचा प्रवास
करावा लागतो. यातुन एकुणच मोडीलीपी शीक्षणाचा कंटाळा येउ लागतो. कळले व आत्मसात
झाले असले तरी तेच ते पुन्हा पुन्हा शीकावे लागते.
|
'व्यक्ती तीतक्या प्रकृती' यातुन वीद्यार्थ्याला 'शीक्षक
व आपण' असा जणु वैयक्तीक क्लास घेतल्यासारखा वाटतो. अर्थात यातील संवाद केवळ
इमेलनेच आणी दीवसातुन एका वीद्यार्थ्यासाठी एकदाच साधावा लागणार असल्याने
मर्यादा येणार आहेत. पण स्वाध्यायाची उजळणी न करताच 'चला पुढचे शिकवा' म्हणणार्यांना
योग्य दीशा यातुन देता येते.
|
|
मुद्या क्रमांक - 7
|
मोडीलीपी शीकणार्या वीद्यार्थ्यांच्या शिक्षकांकडुन असलेल्या अपेक्षा
|
||
1
|
'आमच्या क्लास मध्ये 'क्ष' हे शीक्षक छान शिकवतात. 'ज्ञ'
या शीक्षकाला मोडीची जरी जास्त माहीती असली तरी शिकवण्याची धाटणी व मनमीळावुपणा
'क्ष' शीक्षकात चांगला आहे. 'क्ष' शिक्षक असले की क्लासमध्ये नीट शीकवले जाते.
|
'क्लास मध्ये वीषय बोलुन शीकवणे' व 'वीषय संगणकातुन
मांडुन शीकवणे' या दोन भीन्न गोष्टी आहेत. Modeeleepee-Gangal-001 केवळ फॉण्ट नसुन त्याच्या माध्यमातुन 'मोडीचीन्हांची
डोळ्यांना लावायच्या सवयीचा' अवीष्कार आहे.
|
|
2
|
'मी पुर्वी मोडीलीपी शीकायचा क्लास लावला होता. पण काही
कारणाने मला तो पुरा करता आला नाही. मग जाउ, मग जाउ, असे करत आता बराच कालावधी
लोटला आहे. शीकलेले सर्व जणु मी वीसरलो आहे. आता अडलेले फोनवर वीचारले तर
क्लासला आलात तर बरे होइल, असे सरांकडुन सांगीतले जाते. अर्थात त्यांचे बरोबर
आहे पण पुन्हा नव्याने पहील्यापासुन शीकायला मन तयार होत नाही. एकदा आलेल्या
व्यत्ययामुळे आता यापुढे पुन्हा कधी मोडी शीकणे आयुष्यात होइल असे वाटत नाही.
|
आजच्या युगातील धकाधकीच्या आयुष्यात छंद म्हणुन वा
मायमराठीच्या प्रेमापोटी मोडी शिकायला सुरवात करताना असणारा उत्साह नंतर पुन्हा
आणता येतोच असे नाही. पुन्हा तशीच अडचण आली तर? अशा वीचारामुळे क्लासला न जाता
घर बसल्याच संगणकातुन मोडी शीकणे हा उत्तम पर्याय ठरतो व जो आजच्या आधुनीक
युगाशी जुळवुन घेणारा ठरतो. मोडीलीपीचे क्लास घेणारे शिक्षक सुद्धा त्यांना
अडलेले प्रश्न दुसर्यांना फोनवर बोलुन सोडवु शकत नाहीत कारण अडलेले चीन्ह केवळ
वर्णन करुन सांगणे अशक्य असते.
|
|
मुद्या क्रमांक - 8
|
मोडीलीपी शिकलेल्या वीद्यार्थ्यांना त्यानंतर येणार्या अडचणी
|
||
1
|
बर्याच दीवसांपुर्वी क्लासला जाउन मोडी शीकलो. पण त्याचा
वापर व उपयोग कुठे करायचा ते कळले नाही. काही दीवसानंतर जेव्हा मोडीच्या काही
पानांचे लीप्यंतरण करण्याचे काम आले तेव्हा मला त्यात खुप अडचणी आल्या. त्या
सोडवण्यासाठी पुन्हा शिक्षकांच्या वेळेनुसार क्लासला जाणे मला प्रत्येक वेळी
शक्य होणार नसल्याने मी आता मोडीचा नाद सोडला आहे. काही शिक्षकांनी तर मी ती
पाने करुन देतो पण त्याचा खर्च द्यावा लागेल असे सांगीतले. मग प्रश्न पडतो की
माझे मलाच जर लीप्यंतरण करता येत नसेल तर मी मोडी शिकलोच कशाला? यावर आजवर उत्तर
मीळाले नाही.
|
मोडीलीपीतील हस्त-लीखीते वाचुन त्याचे लीप्यंतरण करताना
अनेक अडचणी येतात. अहो, कोणत्याही ''मानवाचे हस्ताक्षर दुसर्यासारखे नसते'' या
तत्वावर तर बँकेतील आर्थीक धोरणात आपली सही वापरता येते! अगदी मान्यवर मोडी
जाणकार सुद्धा मोडी-हस्तलीखीतांचे लीप्यंतरण कसे करतात? याला साध्या भाषेत
'कोड-डीकोड प्रक्रीया' असे म्हणता येते. 'र'चे अनेक प्रकारचे फरांटे, वळणदार
म्हणुन काढलेल्या मोडी हस्ता-अक्षरात आपल्याला भासणारी अबोधता, या सार्या
'क्लासमधल्या शीक्षणापेक्षा' आधी मोडीलीपीच्या 'साधारण प्रमाणीत ठरणार्या
हस्ताक्षराची' डोळ्यांना सवय करुन घेणे, योग्य ठरते.
|
|
2
|
'क्लास पुर्ण झाला आणी मग हळुहळु मोडीशी असलेला संबंध
तुटला', असे बहुतेक वीद्यार्थ्यांच्या बाबतीत घडते. कारण त्यानंतर फोनवरुन
क्लासमधल्या व्यक्तींशी बोलुन अडलेल्या गोष्टी सोडवता येत नाहीत. मोडीलीपीतील
अडचणींवर वेळ काढुन व्यक्तिगत भेट घ्यावी एवढा काही मोडीलीपी हा वीषय निकडीचा,
तातडीचा व गंभीर वीषय ठरत नाही. यामुळे मोडीलीपीत आलेल्या अडचणी सोडवल्या न जाता
बहुतेक वेळा वीसरल्याच जातात! याचे महत्त्वाचे कारण आहे मोडीलीपी क्लासेस मधुन
शिकवणार्या बहुतेक शीक्षकांना व वीद्यार्थ्यांना संगणकाची फारशी माहीती नसते.
संगणकाची माहीती थोडीफार माहीती असली तरी आलेली अडचण सोडवण्याचे काम ईमेलने
करण्याची क्षमता कोणातच नसते.
|
'फॉण्टच्या माध्यमातुन मोडी शिकणे' या उपक्रमातुन मोडीचे
शीक्षण घेणार्या वीद्यार्थ्यांना इमेल द्वारे एकमेकांशी संबंध राखुन आलेल्या
अडचणींवर चर्चा करता येणार आहे. अशा ''आलेल्या अडचणींवरील तोडगा'' याचा एकत्रीत
संग्रह होउन तो इंटरनेटवरुन सर्वांना मोफत देता-घेता येणार आहे. 'सर्वसमावेशक
मराठी' या फेसबुकवरील ग्रुपवर अशा अडचणींची चर्चा होइल व तोडगे सुचवले जातील.
त्यांचा संग्रह होउन मोडीलीपीबाबतची अनोखी जागृतता निर्माण होइल. 'ज्ञान दीले की
वाढते' याच तत्त्वाचा येथे वापर होणार आहे. मुक्तपणे मोडीलीपीबाबतची माहीती
सर्वांना मनसोक्तपणे वाचता व वापरता येणार आहे. Modeeleepee-Gangal-001 फॉण्ट ही या नव्या प्रवाहाच्या वाटचालीची केवळ सुरवात
ठरणार आहे.
|
|
मुद्या क्रमांक - 9
|
मोडीलीपी क्लासमधल्या शिक्षकांची सर्वसामान्य वीचारधारा
|
||
1
|
'मोडीलीपीचे टायपींग शिकुन यापुढे कोण मराठीत लीहीणार
आहे?, त्यामुळे मोडीचे टायपिंग शीकणे हा केवळ मुर्खपणा आहे. मोडी वाचुन पुन्हा
मोडीतच ते टायपींग करायचे असेल तर त्याचे देवनागरी मराठीत लीप्यंतरण कोण करणार?
यापेक्षा क्लास मध्ये मोडीलीपी शीकुन मग त्याचे देवनागरी मराठीत टायपिंग केले तर
योग्य ठरेल', असे मोडीलीपीचे क्लासेस घेणार्या जवळजवळ सर्वांचे वा अशाच
प्रकारचे मत आहे असे म्हणता येते.
|
Modeeleepee-Gangal-001 फॉण्ट हा 'केवळ डोळ्यांना मोडीलीपीची अक्षरे
ओळखण्याचे शीक्षण देणे' याच कारणाने बनवला असल्याचे त्यांना कळत नाही. फॉण्ट
म्हटला म्हणजे ''त्यातुन केवळ टायपिंग करणे एवढेच साधले जाते'' ही झाली
सर्वसामान्य वीचारसरणी. पण इंग्रजीच्या 'स्मॉल k' वरच मोडीतला 'क' उमटतो व
'जलद सोप्पी मराठी'तुन होणार्या मराठी-देवनागरी टायपिंग मध्येही असेच घडते आणी
यातुन मोडीलीपीच्या अक्षराची मराठमोळी ओळख यातुन होते.
|
|
2
|
मोडीतील 'क' आणी 'का' यांची चीन्हे भीन्न असतात. 'क' ला
केवळ काना दीला की देवनागरीत त्याचा 'का' होतो, तसे मोडीत नसते. त्यामुळे 'क' व
'का' हाताने लीहुन त्याची वळणे नीट लक्षात राहतात. यासाठी मोडीलीपीच्या क्लासचीच
गरज असते.
|
आपल्याला साधायचे आहे ते म्हणजे 'डोळ्यांना मोडी अक्षर
चीन्हांची ओळख करुन देणे' होय. 'लीहुन मग डोळ्यांना शीकवणे' व 'टाइप करुन
डोळ्यांना शीकवणे' या शिक्षणात जरी फरक असला तरी साध्य गाठता येते हे महत्त्वाचे
आहे.
|
|
मुद्या क्रमांक - 9
|
मोडीलीपी क्लासमधल्या शिक्षकांची 'अ'कारान्त, 'आ'कारान्त व 'उ'कारान्त
अक्षरे शिकवण्याची वीचारधारा
|
||
1
|
'क' लीहुन मग 'का' लीहीला गेला तर त्या दोघांतील परस्पर
संबंध लक्षात राहतो. त्यामुळे वहीवर हाताने आधी 'क' व मग 'का' लीहुन लीहुन
दोन्ही चीन्हांची डोळ्यांना सवय होते. 'क' लीहुन मग 'का' लीहीताना जर चुक झाली
तर झेरॉक्स मधुन दीलेल्या नोंदीतुन वा पुस्तकातुन 'का' बरोबर आहे का? हे पडताळुन
बघता येते. घरी सुद्धा हा अभ्यास करता येतो.
|
Modeeleepee-Gangal-001 फॉण्टने सुद्धा हेच साधले आहे. आधी प्रत्येकवेळी
'स्मॉल k' दाबुन 'क' उमटवावा लागतो.
तो डोळ्यांना दीसतो. त्यानंतर '^' हे बटण दाबले की त्याचा आपोआप मोडीतील 'का' होतो. तोही
डोळ्यांना दिसतो. संगणक चुक न करता अचुकपणे 'का' टाइप करतो. संगणक हा मोडीलीपी
शिकवणारा जणु शिक्षकच ठरतो.
|
|
2
|
'क'ला वेलांटी दीली की 'कि' उमटते. 'क, का, की, . .' अशा
बाराखडीतील प्रत्येक अक्षरात 'क' हा पुर्णपणे दीसतो व त्यामुळे देवनागरीतील
अक्षरांची ओळख पटकन होते. तसे मोडीत नाही. मोडीतील 'उ'कारान्त अक्षरे तर
प्रचंडपणे भीन्न आहेत. त्यांची नीट ओळख
होण्यासाठी बाराखडी हाताने लीहुन शिकाव्याच लागतात. यातुन बाराखडीतील 'क, का,
कु' यांची क्रमवार ओळख होते व ती अक्षरे कायमची लक्षात राहतात. याला दुसरा
कोणताही पर्याय नाही. मोडी फॉण्ट मधुनचे टायपींग म्हणजे मोडीतील प्रत्येक चीन्ह
कोणत्या बटणावर पोस्ट केले आहे याची माहीती नीट लक्षात ठेवावी लागणार. मग आधी
चीन्ह लक्षात राहीले तरच फॉण्टचा वापर करता येइल ना?
|
'मोडी फॉण्ट मधुनचे टायपींग म्हणजे मोडीतील प्रत्येक
चीन्ह कोणत्या बटणावर पोस्ट केले आहे व याची माहीती नीट लक्षात ठेवावी लागणार',
असे गृहीत धरले जाते. यालाच Modeeleepee-Gangal-001 फॉण्टने आश्चर्याचा धक्का दीला आहे. केवळ 'क' लक्षात
ठेवला की त्यानंतर ठरावीक परवलीचे बटण ठरणारी योजना 'जलद सोप्पी मराठी'च्या
सॉफ्टवेअर मधुन आखली जाते. 'क' नंतर '^' हे बटण दाबले की 'का' तयार होतो. त्यानंतर '/ \' ही बटणे दाबली की 'कु' टाइप करण्याचे काम व मार्गदर्शन
संगणक टाइप करता करताच तुम्हाला देतो. मोडीलीपी संगणकातुन शिकणे म्हणजे जणु एक
आनंददायी खेळ बनला आहे.
|
|
मुद्या क्रमांक - 10
|
मोडीलीपी क्लासेस मधुन शिकवणार्या शिक्षकांची संगणकाबाबतची अनास्था
|
||
1
|
तुम्ही दीलेला Modeeleepee-Gangal-001 फॉण्ट हा 'जलद सोप्पी मराठी' या सॉफ्टवेअर मधुनच
चालतो असे तुम्ही सांगता. म्हणजे यातुन तुम्ही तुमच्या 'जलद सोप्पी मराठी' या
सॉफ्टवेअरची जाहीरात करण्यासाठीच हा उपक्रम सुरु केला असावा, असे मानले तर काय
चुकले?
|
Modeeleepee-Gangal-001 फॉण्ट 'जलद सोप्पी मराठी' या सॉफ्टवेअर मधुनच चालतो. यातुनच
मोडी ते देवनागरी असे आपोआप लीप्यंतरण करण्याचे सुद्धा साधलेले आहे. मी या सर्व
गोष्टी मुक्त मोफत देत आहे. मग याला 'जाहीरात' म्हणावे की हे 'प्रसार-प्रचार' म्हणावे?,
हे ज्याचे त्याने ठरवावे.
|
|
2
|
आम्ही मोडीलीपीचे क्लासेस मराठीच्या प्रेमापोटी चालवतो. यातुन
आर्थीक फायदा न घेता उलट बर्याच वेळा पदरमोड करुन क्लासेस सुरळीत ठेवण्याचा
प्रयत्न करतो. यापुढे मोडीचे क्लासेस चालुच नयेत असे तुम्हाला वाटते का?
|
मोडीलीपीचे क्लासेस अक्षरशः केवळ मराठीच्या प्रेमापोटीच
तग धरुन आहेत. त्यांचा गौरव झाला पाहीजे असे मला वाटते. मोडीलीपीच्या
प्रसारासाठी संगणकासारखी अत्याधुनीक माध्यमे वापरली तर ध्येय गाठायला मदत होइल
असे मला वाटते.
|
|
मुद्या क्रमांक - 11
|
मोडीलीपी क्लासेस मधुन शिकवणार्या शिक्षकांची मनोधारणा
|
||
1
|
मोडीतल्या हस्त-लीखीत करोडो-करोडो पानापानात दडलेल्या
इतीहासाला प्रकाशीत करण्यासाठी 'मोडीचे क्लासेस' हाच उपाय आहे. त्याऐवजी तुम्ही
तुमच्या फॉण्टची जाहीरात करत आहात. अशी जाहीरात करण्यामागे तुमचा मुळ उद्देश
कोणता आहे? मागे अशीच काहीशी संकल्पना घेउन माननीय कंपनीच्या व्यक्ती आम्हाला
भेटुन गेल्या. त्यांना सुद्धा 'हा वीषय संगणकीय माध्यमातुन हाताळता येणारा
नाही', असे आम्ही सांगीतले.
|
'मोडीचे क्लासेस' यातुन काय, कसे व कीती साधले जाते याचा
जमेल तसा अभ्यास काही वर्षे केला. त्यातील अडचणी तपासल्या. त्यावरती नीव्वळ
प्रचलीत पद्धतीचा फॉण्ट अयोग्य ठरेल याची जाणीव झाली. 'डोळ्यांना मोडी-चीन्हांची
सवय लावणे' हे उद्दीष्ट समोर ठेउन Modeeleepee-Gangal-001 फॉण्ट बनवला आहे. याला फॉण्ट म्हणण्यापेक्षा मोडी
टायपिंग शिक्षणाचा 'स्वयंपुर्ण गाइड' म्हणता येइल, असा आहे.
|
|
2
|
इतर सामान्य फॉण्टप्रमाणे तो संगणकात वापरता येइल का?
'जलद सोप्पी मराठी' या सॉफ्टवेअरचा आधार न घेता वापरता येइल असा का बनवला नाही?
|
'डोळ्यांना मोडी-चीन्हांची सवय लावणे' हे उद्दीष्ट समोर
ठेउन बनवलेला फॉण्ट हा ''सामान्य फॉण्ट प्रमाणे चालणारा नसणार'' हे लक्षात घेणे
गरजेचे आहे.
|
|
मुद्या क्रमांक - 12
|
युनीकोडबाबत थोडीशीच माहीती असणार्या व्यक्तींचा आरोप
|
||
1
|
तुम्ही तो युनीकोडचा आहे म्हणता तर तुम्ही प्रसारीत
केलेला Modeeleepee-Gangal-001 फॉण्ट फेसबुक वगैरे ठीकाणी चालेल का? त्यातुन तेथे
मोडी उमटेल का? 'जलद सोप्पी मराठी' शी Modeeleepee-Gangal-001 फॉण्ट याचा काय व कसा संबंध आहे? त्याचा फायदा काय?
याची सवीस्तर माहीती सर्वांना घेण्याची गरज किती? युनीकोड म्हणजे काय याची
माहीती वीद्यार्थ्यांना द्यावी लागेल का? आधीच मोडीलीपी शिकायची म्हणजे कठीण
त्यात आता संगणक नावाच्या यंत्रातील युनीकोडचे अत्याधुनीक तंत्रज्ञान शिकायचे
म्हणजे कोण जाइल मोडीच्या वाटेला? (!) असे वाटते.
|
यातुन फेसबुक वगैरे ठीकाणी मोडी दीसणार नाही. तुमच्या
संगणकातील मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये Modeeleepee-Gangal-001 फॉण्टमधे मोडीत टाइप केलेला मजकुर जर फेसबुकवर पोस्ट
केलात तर तो देवनागरीत उमटलेला दीसेल ! समजा फेसबुकवर मराठी दीसणारा मजकुर
तुम्ही जर तुम्ही कॉपी करुन वर्ड मध्ये पोस्ट केलात आणी त्या मजकुराचा फॉण्ट
बदलुन तो साध्या शब्दात व गमतीने सांगायचे
तर फेसबुकने Modeeleepee-Gangal-001 हा फॉण्ट स्वीकारला तर तुम्हाला त्यातील अक्षरे मोडीत
दीसतील ! टायपिंग करणार्याला युनीकोडची सवीस्तर माहीती करुन घेण्याची गरज नाही.
मारुती-कार चालवणार्याला त्याचे इंजीन कसे बनवले आहे? याची माहीती करुन घ्यायची
गरज असतेच का? अगदी तसेच येथे आहे!
|
|
मोडीसाठीच्या युनीकोडच्या फॉण्टचे गुपीत –
तुमच्या संगणकातील मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये Modeeleepee-Gangal-001 फॉण्टमधे मोडीत टाइप केलेला मजकुर जर फेसबुकवर पोस्ट
केलात तर तो देवनागरीत उमटलेला दीसेल !
समजा फेसबुकवर मराठी दीसणारा मजकुर तुम्ही जर तुम्ही कॉपी
करुन वर्ड मध्ये पोस्ट केलात आणी त्या संपुर्ण मजकुराचा फॉण्ट बदलुन तो Modeeleepee-Gangal-001 असा केलात तर ते सर्व मराठी मोडीत परीवर्तीत झालेले
दीसेल.
अर्थात आत्ताच्या प्रसीद्ध केलेल्या Modeeleepee-Gangal-001 फॉण्ट मध्ये जोडाक्षराच्या चुका मुद्याम शील्लक ठेवल्या
आहेत. वीवीध चर्चा करुन त्यासाठीची मोडीलीपीला योग्य ठरतील अशी सुयोग्य चीन्हे
नीश्चीत करण्याचे काम सुरु आहे. क्रमाक्रमाने तेही एका ठरावीक टप्प्यावर पोचले की
बदल केलेला Modeeleepee-Gangal-001 फॉण्ट 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर प्रसीद्ध केला जाइल.
क्रमाक्रमाने घडवत असलेल्या या स्थीत्यंतरामुळे Modeeleepee-Gangal-001 फॉण्ट केवळ 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवरच प्रसीद्ध केला जाइल.
याबाबतचे उदाहरण चीत्रमय
स्वरुपातुन पुढे देत आहे.
वरील वीवेचनातुन आपण 1) धोरणात्मक वीचारसरणी, 2) साधनसामुग्रीची
आवश्यकता, 3) मोडीलीपीच्या क्लास मधल्या शीक्षणात व्यतीत होणारा वेळ व परीश्रम, 4)
काही कारणांनी ठरावीक दीवस क्लासला जाता न आल्याने होणारा परीणाम, 5) मोडीलीपी
शीकण्यात भाग घेउ शकणार्या वयस्कर व महीला व्यक्तींच्या गरजा, 6) मोडीलीपी
शीकण्यात भाग घेतलेल्या बहुतेक वीद्यार्थ्यांचे मनोगत, 7) मोडीलीपी शीकणार्या वीद्यार्थ्यांच्या
शिक्षकांकडुन असलेल्या अपेक्षा, 8) मोडीलीपी शिकलेल्या वीद्यार्थ्यांना त्यानंतर
येणार्या अडचणी, 9) मोडीलीपी क्लासमधल्या शिक्षकांची 'अ'कारान्त, 'आ'कारान्त व
'उ'कारान्त अक्षरे शिकवण्याची वीचारधारा, 10) मोडीलीपी क्लासेस मधुन शिकवणार्या शिक्षकांची
संगणकाबाबतची अनास्था, 11) मोडीलीपी क्लासेस मधुन शिकवणार्या शिक्षकांची मनोधारणा,
12) युनीकोडबाबत थोडीशीच माहीती असणार्या व्यक्तींचा आरोप, अशा बारा वीषयांवर चर्चा
केली. यातुन अपेक्षा-उपेक्षा, गरजा-साधने, क्लीष्टता-सोपेपणा, परंपरा-आधुनीकपणा,
मंदगती-जलदगती, क्लासेस-घरगुती, अशा जणु परस्पर वीरोधी भासणार्या गोष्टींवर ही
चर्चा होती, असे लक्षात येइल. कोणत्याही नव्या रीतीला पद्धतीला तावलुन-सुखवुन
स्वीकारावे हे योग्यच आहे. पण याचा अर्थ त्याची शहानीशा न करताच ते बाद ठरवणे ही
अयोग्य ठरेल. मोडीलीपीच्या Modeeleepee-Gangal-001 या
फॉण्टकडेही नव्या युगाचा उमेदवार असे बघावे आणी त्याची योग्यता तपासावीत ही वीनंती.
मोडीलीपीत दडलेला इतीहास
जलद गतीने देवनागरीतुन प्रकाशीत करण्याच्या उपाययोजनेचा आराखडा तयार आहे.
त्यात प्राथमीक स्वरुपात
1) भारतभरच्या इतीहास संशोधक
मंडळांसाठीचा नवा उपक्रम व त्यासाठीचे त्यांचे आधुनीकीकरण,
2) संगणकीय माध्यमातुन
मोडीचे शिक्षण देण्याची सोय,
3) घराघरातुन मोडी लीपीच्या
आधुनीक शीक्षणाची आणता येणारी नवी पद्धत,
अशा तीन स्थरावर
माझ्याकडुन ताबडतोब मदत मीळु शकेल.
वरील कोणत्याही मुद्या-क्रमांकाचा संदर्भ देत चर्चा करता येइल. योग्य-अयोग्य,
चांगले-वाइट, खरे-चुकीचे, याची नीश्चीतता केवळ चर्चेतुनच कळु शकेल.
'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर 'अवघा मराठी तीतुका मेळवावा, मराठमोळा इतीहास जगाला
कळवावा' यासाठी सामील व्हा.
आपला, शुभानन गांगल
No comments:
Post a Comment