बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Friday, 11 April 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 42 – 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरचे डाउनलोड, इन्स्टॉलेशन, युनीकोड सेटींग व ऑन-ऑफ स्वीच




युनिकोड ते साऊंडकोड लेख 42 – 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरचे डाउनलोड, इन्स्टॉलेशन, युनीकोड सेटींग व ऑन-ऑफ स्वीच
(नावे सोडुन लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयमावली झीडकारली आहे)

'जलद सोप्पी मराठी' हे संगणकातुन सर्व ठीकाणी वापरता येणारे सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध केले आहे. संगणकात हे सॉफ्टवेअर डाउनलोड व इन्स्टॉलेशन करणे आणी युनीकोड सेटींग व ऑन-ऑफ स्वीच याची माहीती मीळवणे यासाठी पुढील चीत्रमय तक्ते पहा.

1) संगणकात 'जलद सोप्पी मराठी' हे सॉफ्टवेअर डाउनलोड व इन्स्टॉल करणे –

'जलद सोप्पी मराठी' हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठीची सोय 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकवरील ग्रुपवर उपलब्ध आहे.

आता पुढील वींडो सामोरी येइल.

यातील 'Download' यावर क्लीक करा. आता पुढील नवीन वींडो येइल.

यातील 'Download anyway' यावर क्लीक करा.
आता पुढील नवीन वींडो येइल.

येथे 'Save File' यावर क्लीक करा. तुमच्या संगणकातील 'Downloads' नावाच्या फोल्डर मध्ये 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअर डाउनलोड होइल. ते पुढे दीलेल्या चीत्राप्रमाणे दीसेल.

याची व्याप्ती 32.9 एमबी एवढी आहे. तुमच्या संगणकात डाउनलोड केलेले सॉफ्टवेअर तुम्हाला इतरांना देता-घेता येइल. याच्या पीवळ्या रंगाच्या लोगोवर क्लीक केल्यास ते संगणकात इन्स्टॉल होइल. इन्स्टॉल करण्याआधी त्यातील सर्व चीत्रमय टप्पे पहा. इन्स्टॉलेशन सुरु होताना प्रथम शेजारील वींडो दीसेल.
यातील 'Next>' वर क्लीक करा.
आता पुढील वींडो दीसेल.
येथे 'I accept the agreement' सीलेक्ट करा. त्यामुळे 'Next>' हे बटण नीट प्रकाशीत होइल. आता येथे 'Next>' वर क्लीक करा. आता पुढील वींडो दीसेल.
येथे 'Next>' वर क्लीक करा. आता पुढील वींडो दीसेल.

या वींडोत कोणताही बदल न करता त्यातील 'Next>' वर क्लीक करा. आता पुढील वींडो दीसेल.
येथे 'Install' वर क्लीक करा. नंतर काही गोष्टी तुमच्या संगणकात इन्स्टॉल होत असलेल्या
अशा बार मधुन कळतील. आत्तापर्यंत दिलेल्या गोष्टी घडुन पुर्ण व्हायला अंदाजे केवळ एक मीनीट लागते. यानंतर 'जलद सोप्पी मराठी' चे युनीकोडचे ड्रायव्हर डाउनलोड करण्याची वींडो पुढीलप्रमाणे येइल.
येथे 'Install Complex Script' यावर क्लीक करा.
जर तुमच्या संगणकात 'Complex Script' अगोदरच इन्स्टॉल झाले असेल तर पुढील विंडो दीसेल.
येथे 'जलद सोप्पी मराठी'ने दीलेले सुयोग्य ड्रायव्हर्स नीट इन्स्टॉल होण्यासाठी 'Yes' दाबा. येथे 'Yes' दाबुन योग्य ड्रायव्हर्स इन्स्टॉल करणे फार महत्त्वाचे आहे. ही 'reinstall it forcefully'ची वींडो 'XP' संगणकात तीन वेळा येइल. त्यानंतरच्या म्हणजे 'Win-7', 'Win-8', . . . वगैरे संगणकात 'कॉम्प्लेक्स क्रीप्ट आधीच भरले आहे' असे सुचीत करणारी वींडो येइल. यावेळी 'Complex Script'ची वींडो उजवीकडील वरच्या बाजुला असणारी फुली 'X' दाबुन बंद करा.

त्यानंतर इन्स्टॉलेशन पुर्ण झाल्याचे दर्शवणारी पुढील वींडो दीसेल.

वींडो 'XP' संगणकात त्यानंतर पुढील वींडो येइल.

येथे 'Yes' यावर क्लीक करा. 'Win-7', 'Win-8', . . . वगैरे संगणकात ही वींडो आली नाही तरी संगणकातील तळातल्या डाव्या बाजुला दीलेल्या 'Start' बटणावर जाउन संगणक 'Restart' करा. यातुन दीलेल्या सर्व नव्या गोष्टी कायमच्या नीटपणे प्रस्थापीत होतील.

2) संगणकात युनीकोड सेटींग पुर्ण करणे –
हे सेटींग का करावे लागते?, याचा संबंध 'युनीकोड' या शब्दाशी आहे. सर्वांना कळेल अशा सोप्या भाषेत येथे थोडक्यात सांगणे महत्त्वाचे ठरेल.
''''जगातले अनेक देश एकत्र आले आणी त्यांनी असे ठरवले की जगातील जास्तीतजास्त भाषेतील चीन्हे जगातल्या सर्व संगणकातुन आलीच पाहीजेत. म्हणुन त्यांनी युनीकोडचा स्वीकार केला. मायक्रोसॉफ्टसारख्या अनेक कंपन्या जगभर आहेत. त्यांनी याचा स्वीकार केला. मायक्रोसॉफ्टने 'XP' व त्यानंतरच्या संगणकातुन याचा स्वीकार केला. पण जगात खुप भाषा आहेत. प्रत्येक व्यक्ती सर्व भाषा वापरत नाही. त्यामुळे युनीकोडचा वापर संगणकातुन करताना, ठरावीक देशाने दिलेली ठरावीक भाषेसाठीची चीन्हे व्यक्तीगतपणे निवडावी लागतात. देवनागरी स्क्रीप प्रथम 'हिन्दी' भाषेच्या नावाखाली वावरु लागली होती. 'मराठी'साठीचा युनीकोडचा पर्याय नंतर आला. 'जलद सोप्पी मराठी'ने बर्‍याच काळापासुन हा उपक्रम राबवला आहे. 'जलद सोप्पी मराठी'ने बर्‍याच काळापासुन मराठीसाठीचा युनीकोडमधला अचुकपणा 'हिन्दी' भाषेच्या नावाखालीच उपलब्ध केला आहे. आता आपल्याला व्यक्तीगतपणे युनीकोडसाठीची 'हिन्दी' भाषा सीलेक्ट करायची आहे. हे सारे केवळ एकदाच करावे लागेल.''''
त्यासाठी पुढील सुचनांचा वापर करावा.
XP कॉम्प्युटरसाठीचे सेटींग –
  • हे घडवून आणण्यासाठी ‘‘‘Start’’’ वर क्लिक करा. तेथे ‘‘‘Control Panel’’’ वर क्लिक करा.

  • ‘‘‘Regional and Language Options’’’ वर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल. यातील ‘‘‘Language’’’ हा मधला सेक्शन निवडा.

  • तेथे ‘‘‘Details . . .’’’ वर क्लीक करा. त्यातल्या ‘‘‘Settings’’’ भागातील ‘‘‘Add’’’ वर क्लिक करा. येथे ‘‘‘Input language’’’ यातील छोट्या बाणावर क्लिक करून अनेक भाषांचे शटर ओपन करा आणी त्यात ‘‘‘Hindi’’’ ही भाषा निवडा.

  • भाषांचे शटर बंद होईल. आता तेथेल्या ‘‘‘OK’’’ वर क्लिक करा. आता ती विंडो बंद होऊन मागील विंडो दिसेल. तेथे आधी ‘‘‘Apply’’’ वर आणि नंतर ‘‘‘OK’’’ वर क्लिक करा. आता ती विंडो बंद होऊन मागील विंडो दिसेल. यातही आधी ‘‘‘Apply’’’ वर आणि नंतर ‘‘‘OK’’’ वर क्लिक करत बाहेर या.

  • यामुळे तळातल्या बारवर EN अशी इंग्रजीत अक्षरे दिसू लागतील. या EN वर जर माऊसचे लेफ्ट-क्लिक केलेत तर तेथे HI दिसेल. यातील काहीही सिलेक्ट न करता बाहेर या. तेथे HI दिसत आहे हे केवळ आपण तपासले. संगणकातुन मराठी टाइप करण्यासाठी या बटणांशी यानंतर हातही लावायची गरज भासणार नाही हे 'जलद सोप्पी मराठी'ने घडवले आहे. याची केवळ प्रतीष्ठापना करणे एवढेच घडवणे गरजेचे आहे.

  • बस्स् , आपले युनिकोडसाठीचे सेटींग कॉम्प्युटर मध्ये करण्याचे काम संपले.

Win-7 वा Win-8 कॉम्प्युटरसाठीचे सेटींग –
  • हे घडवून आणण्यासाठी ‘‘‘Start’’’ वर क्लिक करा. तेथे ‘‘‘Control Panel’’’ वर क्लिक करा.
  • तेथे ‘‘‘Clock, Language, and Region’’’ मधल्या ‘‘‘Region and Language’’’ सेक्शनमध्ये असलेल्या ‘‘‘Keyboards and Languages’’’ सेक्शनमध्ये जा.
  • तेथे ‘‘‘Change Keyboards’’’ वर क्लिक करा. आता ‘‘‘General’’’ सेक्शन मधल्या ‘‘‘Installed services’’’ मधल्या ‘‘‘Add’’’ वर क्लिक करा.
  • तेथे ‘‘‘+ Hindi (India)’’’ या हिन्दी-भाषेच्या आधी असलेल्या (+) चिन्हावर क्लिक करा.
  • नंतर ‘‘‘+ Keyboard’’’ च्या सुरवातीला असलेल्या (+) चिन्हावर क्लिक करा.
  • तेथे ‘‘‘Devnagari - INSCRIPT’’’ आणि ‘‘‘Hindi Traditional’’’ यांच्या चौकोनात टिकमार्क करा.
  • आता येणार्‍या विंडोजवर आधी ‘‘‘Apply’’’ आणि नंतर ‘‘‘OK’’’ बटणे दाबत बाहेर या.
  • बस्स्, आपले युनिकोडसाठीचे सेटींग कॉम्प्युटर मध्ये करण्याचे काम संपले.

3) 'जलद सोप्पी मराठी'च्या 'ऑन-ऑफ' स्वीचबाबतची माहीती  

प्रत्येक दिवशी तुम्ही संगणक सुरू केलात की डेस्कटॉपवर असलेल्या पुढील लोगोवर 
लेफ्ट-क्लिक करा.

त्यानंतर पुढील चित्र दिसेल.
या चित्राच्या गडद निळ्या भागात कुठेही लेफ्ट-क्लिक करा. त्यामुळे तळातल्या बारवर उजव्या बाजूला पुढील चित्र दिसेल.
हे आहे, संगणकात जेथे कर्सर न्याल तेथे मराठी टायपिंग करता येणारे ‘ऑन-ऑफ’चे स्विच.

ऑन ऑफ चे बटण नेहमी दीसण्यासाठी –
जर तळातील बार मध्ये 'जलद सोप्पी मराठी'चे 'ऑन-ऑफ' चे स्वीच दीसत नसेल तर . . .
'Start' बटणाच्या ओळीत असलेल्या, 'तळातील बार' वरील उजवीकडच्या भागात असलेल्या
या चीन्हावर माउसचा कर्सर नेऊन राइट क्लीक करा. आता पुढील वींडो दीसेल.
यातील 'Customize Notification' वर क्लीक करा. आता पुढील वींडो दीसेल.
येथे दीसणार्‍या

यातील छोट्या बाणावर क्लीक करा.
आता दिसणार्‍या
या वींडो मध्ये

'Always Show' हे नीवडा.
'XP' नंतरच्या संगणकात, म्हणजे 'Win-7', 'Win-8', . . . वगैरे मध्ये 'Show Icon and Notification' हे नीवडा.

जर 'ऑन-ऑफ' च्या स्वीचवर लाल फुली असेल
तर 'मराठी ऑफ' असेल. जर 'ऑन-ऑफ' च्या स्वीचवर लाल फुली नसेल
तर 'मराठी ऑन' असेल.

कोणतीही फाइल उघडली तर संगणकातुन तुम्हाला नेहमीसारखे इंग्रजी वापरता येइल. त्यासाठी 'ऑन-ऑफ' च्या स्वीचवर लाल फुली असलेली दीसेल. जर तुम्ही मनात आणलेत की तुम्हाला संगणकात मराठी वापरायचे आहे तर 'ऑन-ऑफ' च्या स्वीचवर माउस नेउन लेफ्ट-क्लीक करा. यामुळे 'ऑन-ऑफ' च्या स्वीचवरील लाल फुली नीघुन जाइल व स्वीच 'ऑन' होइल.
संगणकात असलेल्या '' या बटणातुनही हे 'ऑन-ऑफ'चे स्वीच सुरु वाबंद होण्याची सोय दीली आहे.

या स्वीचमधुन संगणकात सर्व ठीकाणी म्हणजे, 'फेसबुक, ऑर्कुट, वेबसाइट, इमेल, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, पेन्ट, . . . वगैरे सर्व ठीकाणी युनीकोड फॉण्ट (सात खास युनीकोडचे फॉण्ट 'जलद सोप्पी मराठी'तुन तुम्हाला आपोआप मीळतात) व टीटीएफ फॉण्ट (चौदा खास टीटीएफचे फॉण्ट 'जलद सोप्पी मराठी'तुन तुम्हाला आपोआप मीळतात) मधुन मराठी वापरता येते. शीवाय युनीकोडचे फॉण्ट ज्यांमधुन चालत नाहीत अशा 'कोरल, पेजमोकर, फोटोशॉप, . . . वगैरे ठीकाणी तुम्ही तेथे चालणारे, आम्ही दीलेले चौदा टीटीएफ फॉण्ट वापरु शकता.

'जलद सोप्पी मराठी'तुन तुम्ही वर्तमानपत्र, मासीक, पुस्तके, . . . काहीही निर्माण करु शकता.

मी व माझ्या पत्नीने एक घोषवाक्य घेतले आहे, '''प्रत्येक मराठी व्यक्तीला त्याचा संगणक मराठीतुन वापरता येणे हा त्यांचा जन्मसीद्ध हक्क आहे आणी एक संशोधक या नात्याने आमच्या आयुष्याचे ते काम घेतले आहे'''.

आम्ही हे सारे मोफत उपलब्ध करत आहोत. अर्थात त्यासाठी प्रचंड आर्थीक व्याप सांभाळावा लागत आहे. या सामाजीक कार्यासाठी आर्थीक मदतीची नीतांत आवश्यकता आहे. देणगी देउ इच्छीणार्‍यांनी पुढील बँकेत परस्पर रक्कम भरावी.

अकौंटचे नाव – GANGALS
बँकेचे नाव – HDFC
बँक अकौंट नंबर – 12052000000406
RTGS/NEFT IFSC : HDFC0001205
बॅंकेचा पत्ता – Saket, Plot No. 120, Juhu, Gulmohar Road, JVPD Scheme, Mumbai 400049.

तुम्ही देणग्यांची रक्कम चेकने 'GANGALS' या नावाने पुढील पत्त्यावर पाठवु शकता.
श्री. शुभानन गांगल
फ्लॅट नंबर 19-20, तीसरा मजला, आयडीयल अपार्टमेंटस,
गुलमोहर रोड, जुहु-वीलेपार्ले-डेव्हलपींग-स्कीम, जेव्हीपीडी बस स्टॉप,
व्होल्व्हो शो रुम समोर, जुहु, मुंबई 400049

ज्यांना याबाबत अधीक माहीती हवी असेल त्यांनी जरुर मोबाइलवर संपर्क साधावा.

मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र कार्य करण्यासाठी फेसबुकच्या 'सर्वसमावेशक मराठी' ग्रुपवर सामिल व्हा.
https://www.facebook.com/groups/togangal/

आपला, शुभानन गांगल

मोबाइल 9833102727   इमेल shubhanan.gangal@gmx.com   वेबसाइट - www.gangals.com

No comments:

Post a Comment