भाषांच्या जागतिकीकरणाचीच जणू
सुरवात म्हणून मानवाने युनिकोड घडवले. यातून मानवाने नक्की काय साध्य केले? विविध
मानवी भाषांच्या चिन्हांना जगातल्या सर्व संगणकात स्थान मिळण्याची सोय उपलब्ध केली.
जास्तीतजास्त मानवी भाषांच्या चिन्हांना एकत्र करून त्यांचा संच (युनिकोड) बनवला
गेला आणि तो सर्व संगणकातून प्रदर्शित होण्याची संधी त्या चिन्हांच्या वापरातून
निर्माण केल्या गेलेल्या फॉंण्टना मिळाली.
निसर्गाने मानवाला भाषा दिली
असती तर असा उपद्व्याप करण्याची गरज मानवावर आलीच नसती! पण भाषा मानवाला निर्माण
कराव्या लागल्या. त्यामुळे असंख्य चुकांच्या गुंतवळ्यातून जसा जमेल तसा मार्ग
प्रत्येक भाषेने काढला. जोपर्यंत मानवाला केवळ स्वतःच्या समुदायाचीच भाषा येत होती
तेव्हा तिच भाषा त्याच्या दृष्टीने मानवाची भाषा ठरत होती. प्रवासाचा वेळ गतीमान
झाला आणि कोसाकोसावर बदलणार्या मानवाच्या भाषांना ‘भाषावार प्रांतरचना’ येथपर्यंत
झेप घेता आली.
‘जो जिंकला तो सिकंदर’ या
म्हणीप्रमाणे ‘संगणकाच्या अंतरंगात जी भाषा वावरते तिचे जगावर वर्चस्व’ ही म्हण
प्रत्यक्षात आली. इंग्रजांचे जगावरील शासकीय सार्वभौमत्व संपले आणि इंग्रजीचे व्यावहारीक
संगणकीय वर्चस्व सुरू झाले. नव्या युगाचा हा कालखंड अजून सुरू आहे. संगणकातील
इंग्रजीच्या वावरावर असलेल्या मर्यादा आता जगाच्या लक्षात येऊ लागल्या आहेत. आता
यानंतरच्या भविष्यातील नव्या युगाची सुरवात होणार आहे. हे नवे युग संगणकाचे असणार
नाही. ते असणार आहे ‘जाणीवजनक’ या नव्या तंत्रज्ञानाचे. ‘संगणकाच्या अंतरंगात जी
भाषा वावरते तिचे जगावर वर्चस्व’ या म्हणी ऐवजी नवी म्हण ठरणार आहे, ‘‘‘निसर्गाने
मानवाला दिलेल्या मेंदूतील भाषा केंद्रांवर ज्या भाषेचे वर्चस्व ती जगावर सार्वभौमत्व
गाजवणार आहे’’’.
हे घडून यायला ‘भाषा’ तेवढी
सक्षम असणे गरजेचे ठरते. मायमराठी नक्कीच तशी सक्षम आहे. तीस वर्षांपासून ‘शोध
मराठीचा’ संशोधनातून याचाच ध्यास घेतला आहे. मराठीवरच्या प्रेमापोटी हे संशोधन
निर्माण झाले नाही. पुढे येणार्या युगात संगणक या यंत्राची जागा जी टेक्नॉलॉजी
घेणार आहे तिचे नाव आहे ‘जाणीवजनक’ (Perceptor).
मानवाच्या मेंदूत भाषा-स्वरूपातून जी उर्जा वाहते त्यातुन अनुभव, स्मृती, बुद्धी,
विचार, भावना, मन यांच्यात देवाण-घेवाण घडते. अगदी त्यालाच समांतरपणे वावरू शकणारी
मानवाची भाषा असेल ‘‘‘उर्जा-स्वरूपी भाषा’’’ (ध्वनी-स्वरूपी नव्हे) आणि ती भाषा मानवाचे
बाह्यांग ठरणार्या ज्या यंत्रातून साकारणार आहे त्याचे नाव ठेवले आहे ‘जाणीवजनक’ (Perceptor).
मानवाच्या स्वरयंत्र ते ओठ या
उच्चारांच्या प्रयोगशाळेतूनच भाषेला वावरावे लागते. जग बैलगाडीचे होते तेव्हाही,
आत्ताच्या संगणकीय युगातही आणि नंतर येणार्या ‘जाणीवजनक युगात’ ही या
प्रयोगशाळेचा वापर मानवाला करावा लागणार आहे. आता जगावर राज्य करणारी राजकीय-प्रवृत्ती
तलवार, बंदूका, क्षेपणास्त्र या हत्यारांपासून काढुन घेतली जाणार आहे. पुढील
‘जाणीवजनक’ युगाचे राज्य करण्याच्या प्रवृत्तीचे हत्यार असणार आहे ‘सर्वसमावेशक
भाषा’. यात मराठीचा दर्जा तिच्या उपजत मूलभूत वृत्तीमुळे सर्वात वरचा ठरणार आहे.
‘शोध मराठीचा’ संशोधनाने गेल्या बर्याच वर्षांच्या अथक प्रयत्नातून मोठा टप्पा
गाठला आहे. आजवर गाठलेल्या पल्याची आटोपशीर, (म्हणजे प्रांजळपणे खरे सांगायचे तर
बराच महत्त्वाचा भाग लपवून), थोडक्यात माहिती या लेखात देत आहे.
‘जाणीवजनक’ युगाची सुरवात
‘साऊंडकोड’ पासून सुरू होणार आहे. आधुनिक युगात मानवी भाषेला ध्वनी, कागद आणि
संगणक या तिन्ही माध्यमातून वावरावे लागणार आहे. ‘भाषा प्रथम मौखिक असते’ हे सुत्र
मानवासाठी त्रिकालाबाधीत सत्य ठरते. संगणकातील फॉण्टसाठी, कागदावरील चिन्हांचा
उपयोग करून मानवाने भाषांच्या जागतिकीकरणासाठी ‘युनिकोड’ आणले. ‘ध्वनी’ हे मानवी
भाषांचे स्वयंभू माध्यम ठरते. या माध्यमातून सर्व भाषांना एकत्रीत आणणे म्हणजे
‘साऊंडकोड’ (Soundcode) होय. अर्थात जगासाठी हा नवा
शब्द आहे पण तो इंग्रजीपासून जगातील सर्व भाषांना आजपासून स्विकारावा, शिकावा
लागणार आहे. होय, मराठीतून जन्म घेतलेल्या ‘शोध मराठीच्या’ संशोधनाची ताकद व
क्षमता नक्कीच तेवढी ठरणार आहे.
यापुढे मराठीने हे असे जगावर
सार्वभौमत्त्व गाजवण्याचे भव्यदिव्य स्वप्न गाठण्यासाठी सर्वकष प्रयत्न करायला
हवेत. संस्कृत या बंदिस्त आणि आधुनिक युगात कुचकामी ठरणार्या भाषेसोबतचे सर्व बंध
सोडून, स्वतःचे खरेखुरे सर्वसमावेशक असणारे आणि ‘सुक्ष्मतेतून भव्यतेकडे
झेपावणारे’ रूप ओळखण्याची मराठीला नितांत गरज आहे. संस्कार, परंपरा, भक्ति वगैरेत
गुरफटलेल्या आपल्या भाव-भावना जोपासण्यासाठी संस्कृतला देवघरात जरूर स्थान देऊया,
पण पुढील युगातील बुद्धीच्या गगनभेदी झेपेसाठी संस्कृतचे सर्व पाश दूर करणे व
बंधनांचे सर्व दोर कापले जाणे महत्त्वाचे आहे. मराठीत माफक व योग्य बदल घडवून
आणल्यास केवळ काही वर्षात ती जगावर राज्य करेल यात संशय नाही. पण आजतरी आपल्या
मायमराठीच्या रथाचे चाक संस्कृतप्रचूर व्याकरण-शुद्धलेखन यांच्या दलदलीत अडकलेले
आहे. त्यातून बाहेर पडल्याखेरीज मराठीच्या ‘मराठमोळी’ लिपीला अनंताचे क्षितीज
गाठणे शक्य होणार नाही. नाहीतर मराठीचीच उपजत मूलभूत शास्त्रीयता वेगळ्याच नावाने कॉपीराईट
बनून भलतीच भाषा स्वतःच्या नावाने जगासमोर आणेल.
ध्वनीच्या विविध गुणधर्मांना
बायनरीच्या संयोगातून जुळवत भाषांचे जागतिकीकरण ‘साऊंडकोड’ (Soundcode) द्वारे करणे शक्य आहे. ‘उच्चार, अक्षर, चिन्ह,
लेखन, अर्थ’ हे त्याचे महत्त्वाचे फिल्टर ठरतात. ध्वनीतून साकार होणार्या गद्य-पद्य-संगीत
यांचा अविष्कार ‘साऊंडकोड’ (Soundcode) मधून वैयक्तिक पातळीवर
आस्वाद घेऊ लागेल. ‘शब्दांच्या पलीकडले’ याऐवजी ‘भाषांच्या पलीकडले’ हा परवलीचा
शब्द ठरेल.
‘युनिकोड ते साऊंडकोड’ येथे
देत असलेले लेख जरी आटोपशीर असले तरी ती मानवाच्या नव्या युगाच्या भविष्याची नांदी
ठरणार आहे. आजवरच्या अनेक गृहीतांना येथे धक्का पोचेल, असे म्हणण्यापेक्षा ती
गृहीते नष्ट होतील, असेच म्हणणे योग्य ठरेल. मायमराठीचे उज्वल भवितव्य तुमच्या
सहकार्याशिवाय गाठले जाणार नाही. ‘साऊंडकोड’ (Soundcode)
आणि ‘जाणीवजनक’ (Perceptor) या नव्या मराठमोळ्या मराठी
आणि इंग्रजी शब्दांची तुटपुंजी ओळख करून देणारा हा लेख इथेच संपवतो. यातून
मराठीच्या उपजत मूलभूत वृत्तीकडे आणि नैसर्गिक शास्त्रीयतेकडे बघायची आधुनिक वेगळी
दृष्टी सर्वांना लाभेल असे वाटते.
कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या
फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण
विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी सामिल व्हा.
आपला, शुभानन गांगल मोबाईल –
9833102727 ईमेल –
gangal@gmx.com वेबसाईट - www.gangals.com
आपला अभिप्राय येथे लिहा
ReplyDelete