टप्पा 2 :
‘वस्तु 1' आणि ‘वस्तु 2' यात आघात होतो. यावेळी हवा तेथे उपस्थित आहे. गतीतील उर्जेचे रूपांतर गतीफरकामुळे इतर उर्जेत होते. ह्या इतर उर्जेतील उष्णता व ध्वनी आपल्याला जाणवतात.
टप्पा 3 : गतीफरकातून निर्माण झालेली उर्जा ‘वस्तु 1', ‘वस्तु 2' आणि हवा यांना प्राप्त होते. ह्या टप्प्यात पुढील गोष्टी एकाच वेळी घडून येतात. 1] ‘वस्तु 1' मध्ये कंपने निर्माण होतात. 2] ‘वस्तु 2' मध्ये कंपने निर्माण होतात. 3] हवेत स्फोटध्वनी वाहू लागतो.
ध्वनीलहरी स्फोटातून व आघातातून निर्माण होतात. स्फोट किंवा आघाताच्या निर्मितीसाठी कमीतकमी दोन गोष्टी आवश्यक म्हणाव्या लागतील, एक स्फोट किंवा आघात करणारी व दुसरी स्फोट किंवा आघात झेलणारी. दोन गोष्टी एकमेकांवर आदळल्या असता, ध्वनी निर्माण होताना त्यातील, ‘स्फोट किंवा आघात करणारी कोणती व स्फोट किंवा आघात झेलणारी कोणती' याला अर्थ नसतो. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे, ‘आघात तितकाच प्रत्याघात होतो' त्यामुळेच निव्वळ स्फोट किंवा आघात एवढेच म्हणणे योग्य ठरते.
उदाहरण : लाकडी दरवाजावर बोटानी टकटक केली, त्याच लाकडी दरवाजावर हातातील अंगठीने टकटक केली, तर ध्वनीत फरक पडतो. लोखंडी तव्यावर बोटांनी टकटक केली, त्याच लोखंडी तव्यावर अंगठीने टकटक केली, तर ध्वनीत फरक पडतो. लाकूड, बोट, अंगठी व लोखंड या चार गोष्टींची अदलाबदल करून पाहीली तर प्रत्येकवेळी होणारा ध्वनी हा वेगळा असतो. म्हणजेच आघात करणारी अथवा आघात झेलणारी यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर ध्वनी अवलंबून नसतो. आघात करणार्या व आघात झेलणार्या दोन्ही गोष्टींच्या एकत्रितपणातून, त्यांच्या अंगभूत
गुणांचे जणू ध्वनीमधले प्रत्यंतर येते. या दोघांच्या एकत्रित भौतिक गुणांवर ध्वनीची पोत अवलंबून असते.
कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण
विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी सामिल व्हा.
आपला, शुभानन
गांगल मोबाईल – 9833102727 ईमेल – gangal@gmx.com वेबसाईट - www.gangals.com
No comments:
Post a Comment