बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Sunday, 23 February 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 25 – केवळ 30 मिनिटात संगणकसाक्षर बना



युनिकोड ते साऊंडकोड लेख 25 –

केवळ 30 मिनिटात संगणकसाक्षर बना
आधुनिक युगातील साक्षरतेची व्याख्या – संगणकसाक्षर
संगणकातून मराठी लेखन करता येणे म्हणजे संगणकसाक्षर होय.
मनातले बोटांना, बोटातले संगणकाला, कळते क्षणात सारे,
संगणकातून मराठी लेखन शिकून अत्याधुनिक होऊ सारे.

टप्पा 1 – बाराखडीचे संगणकीय लेखन
गुरूकिल्ली –
1) किबोर्डच्या एका चावीवर एकाच स्वराचे चिन्ह,
2) किबोर्डच्या प्रत्येक चावीचा कॅपिटल-स्मॉल असा वापर.
एकूण वापरल्या जाणार्‍या चाव्या – 8
मराठीची बाराखडी 'प,पा,पि,पी,पु,पू,पे,पै,पो,पौ,पॅ,पॉ' अशी बारा अक्षरांची आहे.
'पं' अनुस्वार आणि 'पः' विसर्ग बाराखडीतील प्रत्येक अक्षराला लावला जातो.
'प'च्या बाराखडीत प्रत्येकवेळी आधी 'प' टाईप करावाच लागतो.
बाराखडीचे शिक्षण 'प'चा वापर करून द्यावे. 'p' चावी दाबा 'प' टाईप होईल.


टप्पा 2 – जोडाक्षरांचे संगणकीय लेखन
गुरूकिल्ली – व्यंजनाचा पाय मोडायचे 'घाव घातल्यासारखे' चिन्ह.
एकूण वापरल्या जाणार्‍या चाव्या – जोडाक्षराचे लेखन करायला एकच चावी.



टप्पा 3 – व्यंजनांचे संगणकीय लेखन
गुरूकिल्ली – हवेवर ओठांनी लिहावे तसे कागदावरच्या शाईला बोलता यावे,
जिभेच्या टोकावर असलेले मराठी, संगणकात बोटांच्या टोकातून झिरपावे.
एका व्यंजनाला एकच चावी.

 'त, थ' साठी 'q,Q' आणि 'द, ध' साठी 'w,W' चाव्या दिल्या आहेत कारण त्यांना इंग्रजीत स्थान नाही.
तसेच 'ङ, ञ' ही फारशी वापरली न जाणारी व्यंजने, दहा बोटांच्या जलद टायपिंग आड येऊ नयेत,
यासाठी अनुक्रमे '<, \' यावर दिलेली आहेत. किबोर्ड लेआऊटचा तक्ता 'जलद सोप्पी मराठी'ने दिला आहे.
त्यामुळे जर चावी विसरली तर पटकन बघता येते.


टप्पा 4 – 'र' बाबतच्या जोडाक्षरांचे संगणकीय लेखन
गुरूकिल्ली – केवळ उच्चारानुसार टाईप करा, 'र' बाबतची सर्व चिन्हे आपोआप टाईप होतात.
केवळ स्मॉल 'r' या एकाच चावीवर 'प्र, ड्र, र्य, र्प्र' अशी 'र'ची चिन्हे उच्चारानुसार सहजपणे टाईप होतात.
'वार्‍यावर', 'तर्‍हा' यातील 'र'चे चिन्ह कॅपीटल 'r' या चावीतून टाईप होते.
म्हणजेच 'र' बाबतची सर्व चिन्हे केवळ स्मॉल 'r' व कॅपीटल 'R' मधून टाईप होतात.

 

टप्पा 5 – खास जोडाक्षरांचे उच्चारानुसार संगणकीय लेखन
गुरूकिल्ली – केवळ उच्चारानुसार क्रमवार व्यंजनांचा पाय तोडत टाईप करा.
ज्या जोडाक्षरी चिन्हांत असणार्‍या व्यंजनांचा थांगपत्ता केवळ डोळ्यांनी बघून लागत नाही,
त्यांना खास-जोडाक्षरे म्हणतात.
मराठीत 'द' व्यंजनाच्या वापरातली 'द्म, द्ध, द्व, द्य, द्द, ज्ञ' अशी सहा खास-जोडाक्षरे आहेत.
'श' व्यंजनाच्या वापरातली 'क्ष, श्च, श्र' अशी तीन खास-जोडाक्षरे आहेत.
'त' व्यंजनाच्या वापरातली 'त्त, त्र, क्त' अशी तीन खास-जोडाक्षरे आहेत.
अशी एकूण बारा खास-जोडाक्षरे मराठीत आहेत.


त्यांचे उच्चारानुसार, क्रमवार व्यंजनांचे पाय मोडून ( / चिन्ह वापरून) टायपिंग असे होते.
टप्पा 6  – खास जोडाक्षरांचे जलद संगणकीय लेखन
गुरूकिल्ली – एकाच चावीतून डीटीपी साठी जलद टाईप करा.
यात मराठीतील 'द' व्यंजनाच्या वापरातली 'द्म, द्ध, द्व, द्य, द्द, ज्ञ' अशी सहा खास-जोडाक्षरे आहेत.
'श' व्यंजनाच्या वापरातली 'क्ष, श्च, श्र' अशी तीन खास-जोडाक्षरे आहेत.
मराठीतील 'त' व्यंजनाच्या वापरातली 'त्त, त्र' अशी दोन खास-जोडाक्षरे आहेत.
याशिवाय 'ॐ' हे चिन्ह आणि 'ऋ, ॠ' ही चिन्हे सुद्धा उमटण्याची सोय युनिकोड फॉण्टमधून दिली आहे.

 


संपर्क – शुभानन गांगल
मोबाईल - 9833102727 ईमेल – gangal@gmx.com



No comments:

Post a Comment