युनिकोड ते साऊंडकोड –
लेख 27 – उबंटु मधून (लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मधून) 'जलद सोप्पी मराठी' हे मायक्रोसॉफ्ट मध्ये चालणारे सॉफ्टवेअर (.exe) वापरण्यासाठी
'जलद सोप्पी मराठी' हे मायक्रोसॉफ्ट मध्ये चालणारे सॉफ्टवेअर (.exe) आहे. जर हे सॉफ्टवेअर उबंटु मधून (लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मधून) वापरायचे असेल तर? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. त्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती इथे देत आहे. आपणास जर या माहितीचा उपयोग करून 'जलद सोप्पी मराठी' उबंटु मधून (लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मधून) वापरता येते का ते तपासून बघता येईल. अर्थात ते तुम्हाला करायचे की नाही हे तुमच्या जबाबदारीवर तुम्ही ठरवायचे आहे.
विशेष नोंद – येथे दिलेल्या माहितीचा वापर जाणकार संगणक तज्ञाचा सल्ला घेऊनच करावा. तुमच्या संगणकातील ऑपरेटींग सिस्टीमच्या योग्यतेला अनुसरून, अनेक गोष्टींचा तारतम्य ठेऊन विचार करून, वेगळे पार्टीशन वगैरे करण्याची आवश्यकता भासेल.
विंडोज मध्ये चालणारे प्रोग्रॅम्स उबंटु मधून (लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मधून) कसे चालवायचे?
विंडोज-प्रोग्रॅम्स उबंटु मधून वापरण्यासाठी तुम्हाला वाईन (Wine) या अॅप्लीकेशनची गरज आहे. तुम्हाला ते इंस्टॉल करण्याची सोय इंटरनेटवरून मोफत उपलब्ध आहे. विंडो मधल्या प्रोग्रॅम्स ना अशा प्रकारे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मधून चालवणे ही जणू नव्या संगणकीय 'ओपन-सोर्स' युगाची सुरवात ठरत आहे. डाऊनलोड करण्यासाठी http://www.ubuntu.com/download यासारख्या साईटवरून त्याची माहिती मिळेल.
याबाबतचे टप्पे -
टप्पा 1 - Go
to Applications > Ubuntu Software Center हा भाग Main
menu येथे आहे.
टप्पा 2 – जेव्हा तुम्ही Ubuntu
Software Center उघडता तेव्हा वरच्या बाजूच्या उजवीकडच्या कोपर्यातील search
function मध्ये 'wine' टाईप करून Enter दाबा.
टप्पा 3 – तेथे 'Wine
Microsoft Windows Compatibility Layer' हे पॅकेज निवडा.
टप्पा 4 – आता 'Install' बटणावर क्लिक करा. तेथे जेव्हा पासवर्ड विचारला जाईल तेव्हा तो टाईप करून 'Authenticate'
वरती क्लिक करा वा Enter दाबा.
टप्पा 5 – इंस्टॉलेशन करत असताना मध्येच तुम्हाला EULA
license terms ची विंडो दिसेल. त्याला मान्यता देण्यासाठी तेथल्या चौकोनात टिकमार्क करा आणि 'Forward' बटण दाबा.
टप्पा 6 – तुमच्याकडे Wine इंस्टॉल झाल्यावर Applications
> Wine येथे जा. तेथे Wine सापडेल. त्याची थोडी जास्त माहिती मिळविण्यासाठी ते explore करून त्यातील काही भागांच्या कार्याची जाणकारी घ्या.
टप्पा 7 – 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअर तुम्हाला www.gangals.com या आमच्या वेबवरून डाऊनलोड करता येते. अथवा तुम्ही तुमचा ईमेल श्री. गांगल यांना पाठवलात तर त्याची गुगल ड्राइव्हची लिंक तुम्हाला पाठविण्याची सोय केली आहे. आता तुमच्या संगणकात तुम्ही आधीच डाऊनलोड केलेले 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरचे पिवळ्या रंगाचा 'म' असलेले, (32.9 MB चे) सेटअप निवडा आणि mouse ला right क्लिक करा.
टप्पा 8 – तेथे असलेल्या 'Permissions' या सेक्शनवर जा. या ठिकाणी Execute च्या समोर असलेल्या 'Allow executing file
as program' चौकोनावर क्लिक करा. नंतर 'Close' बटणावर क्लिक करा.
टप्पा 9 – आता 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरच्या पिवळ्या रंगाचा 'म' (32.9 MB चे) या सेटअप वर क्लिक केल्यास ते run होईल.
हे सारे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे त्यामुळे या माहितीचा उपयोग आणि वापर, जाणकार संगणक तज्ञाचा सल्ला घेऊनच करावा. तुमच्या संगणकातील ऑपरेटींग सिस्टीमच्या योग्यतेला अनुसरून, अनेक गोष्टींचा तारतम्य ठेऊन विचार करून, वेगळे पार्टीशन वगैरे करण्याची आवश्यकता भासेल. लिनक्सची यथोचीत माहिती नसणार्या व्यक्तिंनी केवळ स्वतःच्या अनुभवातून हे करू नये.
आपला, शुभानन
गांगल
I am calling you sir
ReplyDelete