बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Sunday, 16 March 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 33 – 'एक-वेलांटी एक-उकार' - उपजत मुलभुत मराठी लेखनाचा अत्याधुनिक शास्त्रीय सहजसोपा प्रस्ताव.



युनिकोड ते साऊंडकोड लेख 33 –
'एक-वेलांटी एक-उकार' - उपजत मुलभुत मराठी लेखनाचा अत्याधुनिक शास्त्रीय सहजसोपा प्रस्ताव.
(नावे सोडून बाकी लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरला आहे.)

शिवाजी-पेशवे यांचा कालावधी हा मराठी भाषेचा सुवर्णकाळ होता. मराठी भाषा मुक्त मनसोक्तपणे समाजात बोली व लेखनातुन वावरत होती. त्यावेळी मराठी व्याकरणाचे शिक्षण देणार्‍या शाळा वा व्याकरणाची पुस्तके नव्हती. रामदास, तुकाराम, बहीणाबाई अशा अनेक संतांनी शाळेत जाउन मराठीचे शीक्षण घेतल्याची नोंद नाही पण मौजीबंधनानंतर संस्कृतचे शिक्षण घेण्याची प्रथा भारतभर होती हे जगजाहीर आहे. यातून सहजपणे एक लक्षात येते मराठीचे खास वेगळे शीक्षण घेण्याची गरज कोणाला पडली नाही. घराघराने मराठीचे शिक्षण पुढील पीढीला कुटुंबातच दीले.

प्रत्येक भाषेला व्याकरण असते. मराठीलाही आहे. पण मराठीला पुस्तकी व्याकरणाची गरज कधीच भासली नाही, कारण ती नैसर्गिक व शास्त्रीय आहे. अनैसर्गीक भाषेला, भाषेचे नियम लेखनातुन स्पष्ट करुन मांडावे लागतात. त्याशीवाय ती मुळीच वावरु शकत नाही, तसे मराठीचे नाही.

मराठीच्या पुस्तकी व्याकरणाची गरज प्रथम अत्यावश्यक वाटली ती इंग्रजांना! ज्या प्रदेशावर राज्य करायचे आहे, त्या प्रजेच्या भाषेतुन त्यांच्यावर सत्ता गाजवावी लागते. त्यासाठी इंग्रजी सरकारचे आदेश, करार, नीयम, जाहीरनामे वगैरे समाजाला जसेच्यातसे कळवीण्यात कुठेही कमतरता येउ नये म्हणुन मराठी-भाषा इंग्रजी सरकार चालवणार्‍या अधीकार्‍यांना अवगत होणे गरजेचे होते.

इंग्रजांच्या मराठी भाषा शिकण्याच्या गरजा मराठी व्यक्तीपेक्षा भीन्न होत्या. मराठी कुटुंबात जन्म झालेली व्यक्ती लहानपणापासुन मराठी भाषा सहजतेने अवगत करते. मराठी भाषेतील अक्षर ओळख लहान मुलांना बोबडे बोलायला यायच्या आधीच होउ लागते. कारण मराठी अक्षराची प्रतीष्ठापना मेंदुतील भाषा केंद्रात लहानपणीच होते. व्यक्ती, वस्तु व प्राणी यांच्याकडे बोटे दाखवुन 'दादा, बाबा, भुभु, दुदु' असे शब्द उच्चारुन आपण लहान मुलांना उच्चारीत ध्वनीचा संबंध अर्थाशी जोडायचे शिकवतो. असे छोटे शब्द शिकवताना मराठी अक्षर मेंदुतील भाषा-केंद्रात रुजते. उदाहरण – बोबडे बोलायला यायच्या आधीच लहान मुलांसमोर 'भुभु' म्हणा. ते बाळ 'भुभु' उच्चार करता येत नसला तरी, भीरभीरत्या डोळ्यांनी आजुबाजुला 'भुभु' शोधु लागते. कुटुंबातील मराठी भाषेची सवय बाळाला ऐकुन होते. थोड्याच दीवसात थोडे मोठे झालेले बाळ, अजुनही नीट बोलता येत नसले तरी, 'दादा आली' वा 'काकु आला' यातील चुकीच्या व्याकरणाला 'कुरकुरत' नाके मुरडताना दीसतो. पुस्तकी व्याकरण शिकायच्या आधीच मुलांना घराघरातुन मराठीचे व्याकरण त्या त्या बोलीतुन शिकवले जाते.

मराठी या जगातील एकमेव भाषेला 'उच्चार, अक्षर, चीन्ह, लेखन व अर्थ' यांचा संगम तीच्या लीपीत करता आला. मराठी जो ध्वनी-एकक उच्चारते ते अक्षर ठरते. संस्कृत वा जगातील इतर कोणत्याही भाषेपेक्षा मराठीने अक्षरात वापरलेले व्यंजन व स्वर सर्वात सुक्ष्म ठरतात. याच अक्षराला चीन्ह दिलेले असते. लेखनात वापरलेल्या चीन्हाला ध्वनीचा उच्चार हेच नाव असते. चीन्हाच्या नावानेच लेखनातुन अक्षर कागदावर वावरते. मराठी अक्षरातुन जगातील सर्व भाषांचे उच्चार कळतील असे उच्चारता येतात. मराठी भाषा कितीही नवे शब्द स्वीकारु शकते. कोणत्याही भाषेतील शब्दांचा स्वीकार मराठीला मराठी व्याकरणाच्या अनुषंगाने करता येतो. संस्कृतलाही हे साध्य करता आलेले नाही.

आपण बोलतो त्यातच मराठीचे व्याकरण असते. हे आहे मराठीचे खरेखुरे उपजत मुलभुत व्याकरण. पण जेव्हा इंग्रजांना मराठीच्या पुस्तकी व्याकरणाची गरज भासली तेव्हा त्यांची गरज बोली-भाषेतुन मराठी व्याकरण शिकायची नव्हती. त्यांची गरज होती लीखीत पद्धतीतुन इंग्रजीप्रमाणे कागदावर प्रींट केलेल्या मराठी व्याकरणाची. मग त्यांनी मराठी भाषा पंडीतांना हाताशी धरले. हे त्याकाळचे म्हणजे सन 1805 च्या दरम्यानचे भाषा-पंडीत होते. त्याकाळी 'भाषा-पंडीत = संस्कृत व्याकरणाचे जाणकार' असे समीकरण होते. कारण भारतात लीखीत स्वरुपात केवळ संस्कृतच्या पाणिनींचे व्याकरण उपलब्ध होते. संस्कृतच्या पाणिनी व्याकरणाची ख्याती जगभर पसरलेली व मान्यता पावलेली होती.

त्यावेळच्या मराठीच्या व्याकरणात भाग घेणार्‍या व्यक्ती आणी त्यांची वैचारीक बैठक यांचा वीचार करता पुढील गोष्टी निदर्शनास येतात –

1)   मराठीचे पुस्तकी व्याकरण उपलब्ध नव्हते.
2)   मराठीचे पुस्तकी व्याकरण निर्माण करुन त्याचे प्रींटीग करण्याची क्षमता कोणाही भारतीयाकडे नव्हती.
3)   मराठी व्याकरणाचे पुस्तक निर्माण करण्यात इंग्रजांना भारतातील जाणकार भाषा-पंडीतांचा वापर करावा लागला.
4)   ज्या जाणकार भाषा-पंडीतांचा वापर मराठीच्या पुस्तकी व्याकरणासाठी केला गेला त्यातल्या कोणीही स्वतः कधीही मराठीचे व्याकरण हस्त-लीखीतातही निर्माण केलेले नव्हते, वा असलेच तर त्याबाबत कोणतेही उल्लेख उपलब्ध नाहीत.
5)   पुस्तक रुपात मराठीचे व्याकरण आणण्यासाठी आधीच हस्त-लीखीतातुन मांडल्या गेलेल्या मराठी-व्याकरणालाच पुस्तकी स्वरुप देण्याची ती योजना नव्हती.
6)   मराठीचे व्याकरण प्रथमच लीहुन तेच पुस्तक रुपातुन आणण्याचा हा प्रयत्न होता.

इंग्रजांनी प्रसीद्ध केलेल्या मराठी-पुस्तकी-व्याकरणाकडे बघण्याची त्या काळापासुन आजपर्यंतची समाजाची मनोवृत्ती –

1)   मायबाप इंग्रज सरकारने मराठीसाठी केलेले हे उपकार मानले गेले.
2)   इंग्रजांनी मराठी व्याकरणीय पुस्तकाच्या रचनेत भाषा-पंडीतांना वाव दील्यामुळे त्याच्या प्रसाराची मानसीकता जणु समाजावरच सोपली गेली.
3)   व्याकरणात काय, कुठे, किती, कसे लीहीले आहे याच्याशी सामान्य प्रजेचा सुतराम संबंध कधीही आला नाही.
4)   पाणिनींच्या संस्कृत व्याकरणावरच मराठीचे नवे पुस्तकी व्याकरण आधारलेले असल्याने त्यावर ताशेरे ओढायची हिम्मत कोणाचीच नव्हती.
5)   त्याकाळचा उच्चभ्रु समाज म्हणजे संस्कृतचे अध्ययन करणारा गट होता आणि त्यांना संस्कृतशी मराठीचे नाते जोडल्याचा आनंदच झाला.
6)   बोली-व्याकरणालाच मराठी-पुस्तकी-व्याकरणाचे स्वरुप द्यावे असे वाटले नाही, असा वीचारच झाला नाही.
7)   त्याकाळच्या भाषा-पंडीतांपैकी कोणातही, 'मराठीचा मराठीसाठी मराठीकरीता मराठीपणातुन मराठीपुरताच वीचार करुन बोली-व्याकरणाला पुस्तकी व्याकरणाचे स्वरुप द्यावे', असा वीचारच सुचला नाही कारण त्यांच्यात तेवढी बौद्धीक क्षमताच नव्हती वा 'तसे करणे म्हणजे संस्कृतच्या पाणिनींना आव्हान दील्यासारखे होइल', असे त्यांना वाटले असेल.
8)   'संस्कृत ही देव भाषा आहे', 'संस्कृतातच सगळे ज्ञान आहे', 'संस्कृत ही भाषांची जननी आहे' अशा घोष-वाक्यांनी भारावलेल्या संस्कृत-पंडीतांची बुद्धी संस्कृतची गुलाम बनलेली होती.
9)   गोरा कुंभार (जन्म 1267), संत नामदेवांनी (जन्म 1269), ज्ञानेश्वरांनी (जन्म 1275) अशा संतांनी 1300 सालात संस्कृतपासून मराठीला जणु विभक्त करुन मराठीची थोरवी समाजात स्पष्टपणे मांडली. सन 1300 पासुनचा मराठीचा इतीहास वाखाणणारा ठरतो. छत्रपती शिवाजी महाराज (जन्म 1630) यांनी निर्माण केलेली मराठी सत्ता आणि त्यानंतर 'पेशवाई'चा कालखंड (बाळजी विश्वनाथ यांच्या 1720 सालापासुन ते 1818 साली पेशवाईच्या समाप्तीपर्यंत) हा अंदाजे पाचशे वर्षांचा मराठीचा वैभवाचा कालखंड ठरतो. याकाळात राजकारणातील सर्व व्यवहारात मराठीने मोडी-लीपीचा वापर केला. त्याकाळी मराठी मोडीतुन वावरत असल्याने मराठीला पुस्तकी-लेखन-नियमांची कधी गरजच भासली नाही. जे गद्य-लेखन केले जात होते ते त्यातुन सहजपणे व आपोआप 'उच्चार, अक्षर, चीन्ह, लेखन व अर्थ' एकजुटीने प्रदर्शीत होत होते कारण मोडीत केवळ एक-वेलांटी एक-उकार होते. सर्व मराठी लेखन त्यामुळे आपोआप प्रमाणबद्ध होत होते. 'मोडीतील जडणघडण हाच मराठीच्या व्याकरणाचा अविभाव्य घटक होता आणी हाच मराठीचा उपजत मुलभुत स्वभाव आहे' हे देवनागरीचा मराठीसाठी स्वीकार करताना सर्वजण विसरले!
10)   पुस्तकी व्याकरण कसेही असले तरी आम्हाला काय फरक पडतो? असा विचार सामान्य जनतेचा होता. त्यामुळे त्यांनी या पुस्तकी व्याकरणाला कधी 'डोळेही लावले' नाहीत.
11)   मराठीतुन आपली पुस्तके प्रींटीग होउन येत आहेत, आपल्याला मान्यता मीळत आहे, या उत्सवात व आनंदात झींगलेल्या विद्वांनांनी मराठी भाषेत 'संस्कृतचे शब्द जसेच्या तसे' म्हणजे दोन्ही-वेलांट्या व दोन्ही-उकार यातुन आणायचा चंग बांधला. त्यामुळे संस्कृत-प्रचुर पंडीतांना मान्यता मीळत गेली. शाळा-कॉलेज यातुन मराठी शीक्षणाची सोय झाली आणी मराठी-भाषा संस्कृत व इंग्रजी भाषेसारखी पुस्तकी-व्याकरणातुन शीकवली जाउ लागली.
12)   शालेय शिक्षणाचा प्रसार सुरु झाला. 'ज्याला लीहीता वाचता येते तो साक्षर', हा वीचार गतीमान झाला. अशा साक्षरतेचे प्रमाण वाढले. या मराठी साक्षर व्यक्तींच्या डोळ्यांवर, देवनागरीतुन संस्कृत धाटणीच्या शब्दांमधील, लीखीत अक्षरांतील दोन-वेलांट्या दोन-उकार यांचा संस्कार होत गेला. काहीही व्याकरणीय कारण नसताना मराठीने गद्य-लेखनात दोन-वेलांट्या दोन-उकार स्वीकारल्याचे मनामनावर ठसले.
13)   नव्याने लेखन करुन लेखन बनणार्‍या व्यक्ती बरेच शब्द मनाला योग्य वाटतील अशा वेलांट्या व उकारात लीहु लागले. त्यांना मराठी व्याकरणाचा कोणताही सयुक्तीक आधार देण्याचे स्पष्टीकरण देता येत नसल्याने, 'संस्कृतमधले बरेच शब्द मराठीत जसेच्या तसे आले आहेत' या एकमेव तत्वावर त्यानंतरच्या मराठी व्याकरणाची पुस्तकांची रचना केली गेली गेली.
14)   1951 साली मराठीने मोडी-लीपीला मोडीत काढुन देवनागरी स्वीकारल्याचे खेर मंत्रीमंडळाने घोषीत केले. इंग्रजांनी संस्कृत-प्रचुर मराठी व्याकरणाची सुरवात केली आणी त्याला मराठी सरकारने मान्यता देऊन पुरस्कार केल्याचे शिक्कामोर्तब पुर्ण झाले.
15)   मराठीत निर्माण झालेल्या चुकीच्या व अयोग्य पुस्तकी व्याकरणामुळे नीर्माण झालेल्या अनागोंदी व्यवस्थेला सांभाळण्यासाठी मराठीत लेखन-नीयम आणायची गरज व्यक्त केली गेली. मराठी साहीत्य-सम्मेलनाने यात पुढाकार घेतला. 1960 साला नंतर याबाबतचे धोरण नीश्चीत करण्यात आले. लेखन-नीयमांना 'शुद्धलेखन नियमावली' (!) असे नाव देण्यात आले. या 'शुद्धलेखन नियमावली'च्या पुन्हा पुन्हा 'अती-शुद्ध' आवृत्त्या आणाव्या लागल्या!
16)   साहीत्य सम्मेलनाने घडवले, सरकारने मान्यता दिली, यामुळे मराठीचे पुस्तकी-व्याकरण जरी कीतीही अयोग्य व चुकचे असले तरी तेच पाळण्याची सक्ती समाजावर लादली गेली.
17)   'आम्हाला व्याकरण फारसे कळत नाही' ही बिरुदावली साहीत्य सम्मेलनातील अध्यक्ष, माननीय लेखक, गाजलेल्या वर्तमानपत्रांचे संपादक, मराठी शिकवणारे तज्ञ शीक्षक व प्रोफेसर यांनी आयुष्यभर जपली पण कोणीही त्यावीरुद्ध ब्र काढला नाही. कारण मराठीचे चुकीचे अगम्य क्लिष्ट पुस्तकी व्याकरण समाजाच्या जीवनाचे अंग बनला होता.
18)   स्वतः शीक्षकांनाच मराठीच्या पुस्तकी व्याकरणाने मांडलेल्या वीचारांना पुष्टी देता येत नसल्याने, 'संस्कृत शीका म्हणजे मराठी व्याकरण कळेल' असे सांगण्यात त्यांनी भुषण मानले! आजही हेच घडत आहे.
19)   'शुद्धलेखन नियमावली' आणताना, '''मराठीतील कोणते शब्द संस्कृतमधून आले? हे पुढील पीढ्यांना कळणार कसे?'''. असे साधे प्रश्न व्याकरणकारांना, प्रतीष्ठीतांना, सन्माननीय व्यक्तींना, साहीत्य सम्मेलनाला, पत्रकारांना कधी पडलाच नाही. जरी पडला तरी 'मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?' अशा ''उंदरी'' स्वरुपाचे धोरण त्यांनी अवलंबले!
20)  सन 1960 ते 1990 या तीन दशकांचा उल्लेख 'दोन-वेलांट्या दोन-उकारांची मराठी वाचन संस्कृती' असा करता येतो. यात त्या पिढीतील जे पालक वावरले त्यांना संस्कृत आणी मराठी दोन्ही भाषा कमी-अधीक प्रमाणात माहीत होत्या. कोणीही काहीही कुरकुर मराठी गद्यातल्या 'दोन-वेलांट्या दोन-उकारां'बाबत केली नाही. कुरकुर झाली ती त्याच 'दोन-वेलांट्या दोन-उकारांचा वापर करुन लेखनाचे प्रमाणीकरण करण्यासाठी! 'दोन-वेलांट्या दोन-उकारांचा वापर केल्याने हे सारे मराठीत घडत आहे याची थोडीही जाणीव मान्यवरांना झाली नाही की त्यांनी त्याकडे मुद्दाम पाठ फीरवली?. काहीही म्हणा, 'दोन-वेलांट्या दोन-उकारांच्या गद्य-मराठीवर जणु कायमचे शीक्कामोर्तब झाले.
21)   जर कुठे याची वाच्यता झालीच तर संस्कृत-प्रचुर दाखले देत, मराठी माणसाच्या पापभिरुपणाचा फायदा घेत, पाणिनी विद्वत्ता मराठीला लावून, 'जे पुस्तकी व्याकरणात दीले आहे तेच योग्य' असे अट्टाहासाने सांगीतले जाते, हे मी अनुभवले आहे. आजच्या मराठी पुस्तकी व्याकरणातील पानापानाला, वाक्यावाक्याला संस्कृत-भाषेच्याच वीचारांची वाळवी लागलेली आहे. त्याची काही उदाहरणे देत आहे.
    
1.    मराठीच्या चुकीच्या पुस्तकी व्याकरणाची सुरवात, 'भाषा' हा शब्द 'भाष्' या संस्कृत धातुवरुन आला असुन त्याचा अर्थ 'बोलणे' कींवा 'बोलण्याचा व्यवहार करणे' असा आहे, या वाक्यापासुन होते! मराठी भाषेला 'भाषा' हा शब्द व त्याचा अर्थ नक्की कळतो. तो संस्कृत मधुन जाणुन घ्यायची गरज का बरे व्याकरणकारांना पडली? कारण त्यांचे अध्ययन संस्कृत-प्रचुर आहे म्हणुन. संस्कृतच्या गुलामगीरीच्या वैचारीक लाचारीची सुरवात अशी पहील्या पानापासुन सुरु होते!

2.    '''ज्या सांकेतीक खुणा ठरवील्या आहेत त्या खुणांनी आपण आपले लेखन करतो, त्याला लीपी असे म्हणतात, व यांतील प्रत्येक खुणेला 'अक्षर' असे म्हणतात, असे 'लीपी' व 'अक्षर' यांचे अत्यंत चुकीचे वर्णन मराठीसाठी केले गेले आहे. संस्कृतला जे आणी जेवढे कळले त्यापेक्षा अधीक सुक्ष्म, शास्त्रीयतेने व नैसर्गिकपणातुन मराठीला कळले असण्याची शक्यताच आजवर कोणाच्या मनाला शीवली नाही. सर्व मान्यवर संस्कृतच्या भक्तीने भलत्याच अयोग्य दीशेने वीचार करत राहीले. मराठीसाठीची 'लिपी' व 'अक्षर' यांची मांडणी संस्कृतपेक्षा अगदी भीन्न आहे.
    
     मराठी शब्दात अक्षर असते व अक्षरात व्यंजन-स्वर असतात. व्यंजनाचा उच्चार स्वराशीवाय करता येत नाही, हा निसर्गाने मानवावर लादलेला नीयम आहे. स्वराचा उच्चार तटस्थपणे करता येतो म्हणुन 'स्वर' हे 'अक्षर' ठरते, मग ते उच्चारीत वा लीखीत कोणतेही असो. मराठीतील व्यंजनातुन बनलेले 'अक्षर' व्यंजनाला शेवटी स्वर लावून बनते. संस्कृतमध्ये असे नसते. संस्कृतचे 'अक्षर' व मराठीतील 'अक्षर' यात प्रचंड फरक आहे. आजच्या चुकीच्या पुस्तकी व्याकरणाला हे अजीबात कळलेले नाही. मराठीत बाराखडीतुन व्यंजनातुन निर्माण होणारे अक्षर शिकवले जाते. मराठी शीकताना 'अक्षर' या संकल्पनेची प्रतीष्ठापना मेंदुत होते. स्वरयंत्र ते ओठ या अवयवांतुन या मराठी 'अक्षरा'चा उच्चार केला जातो. कागदावरती हेच अक्षर व्यंजन व स्वर यांच्या चिन्हांच्या वापरातून साकारते. त्यातुन पुढे जोडाक्षरे व खास-जोडाक्षरे येतात. मराठीचे असे उपजत मुलभुत व्याकरण शिक्षणात आणणे गरजेचे आहे. त्यामुळे बोलीतील व्याकरण आणी पुस्तकी व्याकरण एकरुप होणार आहे. मराठी क्लीष्ट, कीचकट न ठरता सहजसोपी ठरणार आहे.

     मराठी सहजसुलभ व्हावी हा यामागे प्रयत्न नाही. मराठीने उपजत मुलभुत व्याकरणाचा स्वीकार केला तर ती आपोआपच सहजसुलभ व सोपी होणार आहे.

3.    शब्द हा वर्णाचा बनलेला असतो हे मराठीच्या चुकीच्या पुस्तकी व्याकरणाचे पुढचे वाक्य आहे. संस्कृतला व्यंजन व स्वर यांची निर्णायक व्याख्या स्वरुपातुन मांडणी कशी करावी? हे सांगता, मांडता आले नसल्याने सर्व उच्चारीत भाषा ध्वनींना, '''आपल्या तोंडावाटे नीघणार्‍या मुलध्वनींना आपण 'वर्ण' असे म्हणतो''', असे संस्कृतच्या आदर्शानुसार मराठीच्या चुकीच्या पुस्तकी व्याकरणाने सांगीतले आहे.

4.    प्रत्येक स्वराच्या उच्चाराला सुरवात शेवट व मधला प्रवास असतो. 'ए' स्वराच्या उच्चारात सुरवातीपासुन शेवटपर्यंत केवळ एकच स्वर 'ए' ऐकु येतो. मग आजच्या मराठी-पुस्तकी-व्याकरणात दिलेले 'ए' हा संयुक्त-स्वर असुन तो 'अ + इ' कींवा 'अ +  ई' कींवा 'आ + इ' कींवा 'आ + ई' असा बनतो. असे चुकीचे मुलांना का शीकवावे? शीक्षकांनी याचे कोणते स्पष्टीकरण द्यावे?

5.    जर संस्कृतच्या 'चाणक्य' मधल्या 'च' चिन्हाचा उच्चार 'च्य' होतो, यात 'चमचा' मधील 'च' हे मराठी व्यंजन सुरवातीला आणी 'ययाती' मधले 'य' व्यंजन शेवटी येते तर संस्कृतला व्यंजनाच्या सुक्ष्मतेची व्याख्या कळली नाही, हे खरे आहे ना? '''जीभ वा ओठ यांच्या एकाच आघातातुन मुखात निर्माण झालेला जो ध्वनी कानांना एकच नाद म्हणुन ऐकु येतो, त्याला मराठीने व्यंजन मानले आहे.''', अशी खर्‍या मराठीची अस्मीता व सुक्ष्मता दर्शवीणारी व्याख्या मुलांना शीकवायच्या ऐवजी संस्कृत-प्रचुर पाणिनींनी स्वीकारलेली व्याख्या का बरे मराठीतुन शीकवली जात आहे? त्यामुळे संस्कृतच्या 'चाणक्य' मधला 'च' बरोबर व मराठीतला 'चमचा' मधला 'च' चुकीचा असा समज समाजात पसरला आहे. आता तर 'चमचा' मधला 'च' ही मराठीची अस्मीता व सुक्ष्मता ठरत नसुन मराठीतला दोष मानण्यापर्यंत वैचारीक बैठक तयार होत आहे. अर्धवट ज्ञानाने मराठीच्या मानसन्मानाचे असे वाटोळे लागत आहे.

6.    शब्दातील धातु शोधुन त्याचा अर्थ शोधणे ही संस्कृत भाषेची उपजत मुलभुत प्रवृत्ती आहे, मराठीची नाही. 'संधी नीयम' हा आजच्या चुकीच्या मराठी व्याकरणातील भाग संस्कृतच्या दलदलीचा प्रदेश ठरतो. संस्कृत मधील दोन धातुंची उजळणी करत, तीलाच मराठी मानत, संस्कृतच्या संधी-नीयमांची तंतोतंत नक्कल ती सारी मराठीत घुडण्यात मराठीच्या चुकीच्या पुस्तकी व्याकरणाची अनेक पानेच्या पाने खर्च झाली आहेत. अशा शब्दांची फोड करून त्यातील अर्थ मराठीला जाणता येतो पण नेहमीच तो तसा घेतला जात नाही. मराठी भाषा दुसर्‍या भाषेतील शब्द अर्थासकट स्वीकारते पण स्वतःच्या बोली-व्याकरणातुन. संस्कृतच्या संधी नीयमानुसार 'परकर' म्हणजे दुसर्‍याचा हात', 'अनवाणी' म्हणजे 'ज्याला बोलता येत नाही तो' असा अर्थ मराठीत असता! तसेच 'आमलेट' म्हणजे 'उशीरा आलेला आंबा' ठरले असते! 'ब्रेकफास्ट' म्हणजे 'जलद गतीने केलेली तोडमोड' ठरली असती! मराठीला 'सदाचार' शब्दाचा अर्थ 'चांगला वागणारा' कळतो पण त्यासाठी तो शब्द 'सत् + आचार' असा संस्कृतच्या संधी-नीयमांनुसार तो बनला आहे असे जाणुन घेण्याची गरज नसते.

7.    संस्कृतमधील प्रत्येक शब्द हा धातुला विकरण व गण लावुन बनलेला असतो. संस्कृतच्या पाणिनी व्याकरणाने 2115 धातुंचा पुरस्कार केला आहे. त्यात प्रथम, चतुर्थ, षष्ठ व दशमगणाचे मीळुन 1876 धातु आहेत आणी अन्य गणांचे मीळुन 239 धातु आहेत. म्हणजेच संस्कृतमधील सर्व शब्द केवळ 2115 धातुंपासुन बनतात. विवीध अर्थासाटीचे शब्द संस्कृतमध्ये आणण्यासाठी संस्कृतला संधी-नीयमांची आवश्यकता भासते. असलेल्या 2115 धातुशिवाय, नवीन कोणताही शब्द संस्कृतच्या व्याकरणाला अधीकृतपणे स्वीकारता येत नाही. 'जॉर्ज' शब्द स्वीकारायचा संस्कृतने ठरवले तर 'ऑ' स्वर संस्कृत अधीकृतपणे स्वीकारु शकेल का? असे संस्कृतला मान्य होइल.

8.    'रामा', 'ओसामा', 'गोविंदा' ही नावे संस्कृतच्या दृष्टीने 'आ'ने शेवट होणारी असल्याने स्त्री-लींगी ठरतात हे कीती जणांना माहीत आहे? मग अशी नावे आकारान्त स्त्री-लींगी 'शाला' शब्दासारखी संस्कृतमधुन 'ओसामा ओसामे ओसामाः ' अशी चालवावी की कशी? 'जॉर्ज' शब्द स्वीकारायचा संस्कृतने ठरवले तर 'ऑ' स्वर संस्कृत अधीकृतपणे स्वीकारु शकेल का? असे संस्कृतला मान्य होइल का?

थोडक्यात म्हणजे संस्कृतचा मराठी व्याकरणात पुरस्कार करुन मराठीचे वाटोळे करण्याशिवाय काहीही साधले गेलेले नाही. ना त्यातुन संस्कृतच्या व्याकरणाला सामभाळले जाते ना मराठीची परंपरा जपली जाते.

22)  गेल्या तीन पीढ्यांना या चुकीच्या व्याकरणाची सवय झाली की '''जे आहे तेच पुस्तकी व्याकरण मराठीचे आहे आणी आहे तेच व तसेच म्हणजे मराठीचे खरे व्याकरण''', असे ते मानु लागले आहेत. मराठी ऐवजी इंग्रजीतुन लेखन करण्याचा मार्ग बर्‍याच माननीय इंजीनीअर, डॉक्टर, वैज्ञानीक, कलाकार, मंत्री, कारखानदार, व्यापारी अवलंबत आहेत. आपण मीळवलेला मानसन्मान 'अशुद्ध मराठी लेखन केल्याने' नेस्तनाबुत होउन नामुष्की पदरात पडेल अशी त्यांना खात्री वाटते. 'भीक नको पण कुत्रा आवर' म्हणी प्रमाणे 'मराठी नको पण शुद्धलेखन आवर' अशी त्यांची मनोवृत्ती झाली आहे. फेसबुकवरच्या काही मीत्रांना मात्र 'अहो आता हजारो व्यक्ती बर्‍याच शुद्धतेने लीहीत आहेत' यातच मराठीने खुप कमावल्यासारखे वाटते. जर मराठीला नीट सरळ चालता येत असताना तीने शुद्धलेखनाच्या खेकड्याच्या चालीने का चालावे? आता आम्हाला खेकड्याच्या चालीने चालता येते यात धन्यता का बाळगावी? मराठीने मराठी बाण्यातुन वागायला व वावरायला काय हरकत आहे? पण आजच्या समाजाची मनोवृत्ती 'आता मराठीचे कीती दीवस शील्लक आहेत?' अशा वीचारांची बनली आहे.

23)  व्यक्तींना शुद्ध-मराठी व्याकरण व शुद्धलेखनाच्या नीयमानुसार लीहीता येत नाही ना? चला त्यांना 'स्पेल-चेकर' देऊ अशी मनोभुमीका मराठीला स्वतंत्र करण्याची नसुन मराठीला कायमचे संस्कृतच्या गुलामगीरीत अडकवून ठेवण्याची आहे. 'स्पेल-चेकर'मुळे क्लीष्ट व कठीण भासणारे मराठी सहजसोपे ठरेल पण हा मराठीला कायमचा संस्कृतचा पांगुळगाडा जोडल्यासारखे होणार आहे. मराठीला खरच अशा पांगुळगाड्याची गरज नसुन, एक-वेलांटी एक-उकार स्वीकारुन स्वतःची अस्मीता सिद्ध करण्याची वेळ आली आहे.

'एक-वेलांटी एक-उकार' मराठी गद्य-लेखनातुन स्वीकारण्याबाबतचा प्रस्ताव व टप्पे –
पुढील टप्प्यातुन मराठीची उपजत मुलभुत प्रवृत्ती सहजपणे रुळावर आणता येणार आहे.

मराठीने 'एक-वेलांटी एक-उकार' स्वीकारायचे टप्पे, त्याच्या नीयम स्वरुप धोरणाची माहीती आणी कारणमिमांसा
टप्पा
नीयम स्वरुप धोरणाची माहीती
कारणमिमांसा
1
मराठी गद्यातुन देवनागरी चीन्हांचा वापर करुन एक-वेलांटी एक-उकार वापरायला अधीकृत मान्यता देणे.
मराठीने यापुढे देवनागरी चीन्हांचाच वापर करणे हीताचे आहे, कारण प्रींटीग, फॉण्ट-मेकींग यातुन अक्षराची तटस्थता सांभाळली जाते व 'अक्षरांना क्रमाने लावणे व शब्दांचा चढत्या-उतरत्या क्रमाने शोध घेणे यातुन सहज शक्य आहे.
2
ज्यांना गद्यातुन दोन-वेलांट्या दोन-उकार यातुन गद्य-लेखन करायचे आहे त्यांना तशी मुभा असेल. मात्र त्यासाठी शब्दातील कोणते अक्षर कोणत्या वेलांटी वा उकारात असावेत याबाबत मराठीत कोणतेही नीयम असणार नाहीत.
ज्यांना गेल्या काही वर्षांच्या लेखनातुन शब्दांतील वेलांट्या व उकार लीहीण्याची वैशीष्ट्यपुर्ण सवय 'शुद्धलेखन नीयामावली' मुळे लागलेली असेल त्यांनी ती मुद्याम ठरवुन बदलण्याची गरज नाही. पण त्यांनाही एक-वेलांटी एक-उकार वापरायला मुभा मीळते.
3
पद्य लेखनात लयतालवीचाराला योग्यता देणार्‍या वेलांट्या व उकार स्वीकारावेत.
यामुळे पद्य लेखनातील उच्चाराला लागणारा वेळ अक्षर-स्वरुपी ध्वनीतुन प्रगट होतो व पारंपारीक रचनेतील वृत्त-जाती-छंद यांतील शास्त्रीयता उमगण्यास योग्य ठरते.


बस्स, केवळ तीन टप्प्यातुन मराठीने 'एक-वेलांटी एक-उकार' स्वीकारावेत. शालेय अभ्यासक्रमातुन हे धोरण नीयम बनुन आले की पुढील पीढीला मराठीतुन सहजतेने हसतखेळत लेखन करता येणार आहे.

यातुन काय काय घडेल?

1)             मराठी लेखन सहजसुलभ व सोपे बनेल.
2)             शुद्धलेखन नीयम जणु शुन्य बनतील.
3)             मुलांचे नीबंधातील मार्क कापले जाणार नाहीत व त्यांना निबंधातील त्यांच्या विचार, भावना व लेखन कौशल्याला मार्क मीळतील.
4)             वर्तमानपत्रे, प्रकाशने, मासिके, यातुन मराठीचा वापर करताना 'शुद्धलेखन-नीयम जाणकार व्यक्तींची' गरज भासणार नाही.
5)             कोणत्याही मराठी व्यक्तीने लिहीलेला कोणताही शब्द निर्विवादपणे शुद्धच ठरेल.
6)             इंजीनीअर, डॉक्टर, वैज्ञानीक, कलाकार, मंत्री, कारखानदार, व्यापारी, शेतकरी, कामगार, नोकरदार, मालक, संस्थाचालक, गृहीणी, आजी-आजोबा, लहानमुले, तरुण-तरुणी, . . . अशा समाजातील सर्व व्यक्तींना आपापले अनुभव मुक्त मनसोक्तपणे लेखनातुन मांडण्याचे मुबलक स्वातंत्र्य मीळेल.
7)             मराठीतील बोलींना त्या त्या खास शब्दांतुन लीहीताना शुद्धलेखन नीयमांचे जोखड पायात, नव्हे हातात (!), अडलेले राहणार नाही. भाषेतील शब्द भांडार आपोआप समाजाकडून वाढेल.
8)             कोणत्याही एका बोलीकडे प्रमाण-भाषा म्हणुन बघायची व त्यातील मराठी पुन्हा नव्याने शिकायची गरज उरणार नाही. पुर्वी भाषा कोसाकोसावर बदलत होत्या. त्यानंतर इंग्रजांच्या काळातील प्रवासाच्या जलद गतीने होणार्‍या सरमीसळीमुळे भारतात भाषावार प्रांत रचना आली. आता नव्या युगात जेट-स्पीडने मराठीतील बोलींचे आदानप्रदान प्रचंड वाढले आहे, वाढणार आहे. त्यातुन बोलीतल्या सर्व मराठी शब्दांना टिकवण्यासाठी प्रत्येक नागरीकाच्या हाती मुक्त लेखन करण्याचे सामर्थ्य 'एक-वेलांटी एक-उकार' या प्रस्तावातुन समाजाला मीळणार आहे.

'एक-वेलांटी एक-उकार' प्रस्तावावर येणारे अपेक्षीत आरोप –

1)             दोन-वेलांट्या दोन-उकार यातुन शब्दांचे लीखीत सौंदर्य वाढते, ते एक-वेलांटी एक-उकार यातुन कमी होइल –
उत्तर –
जर आपण आयुष्यातील बरीच वर्षे 'विनोबा' शब्दातील 'वि' र्‍हस्व बघत असलो तर त्याची सवय होते व 'विनोबा' शब्दातील 'वि' र्‍हस्वच असलेली सुंदर भासते. पण 'विनोबा भावे' यांनी त्यांच्या लेखनात व सहीत सुद्धा 'वीनोबा' अशी दीर्घ 'वी' वापरली होती. समजा 'आई' हा शब्द लहानपनापासुन आपण 'आइ' असा लीहीला, वाचला व मनात घोळवला असेल तर त्याच शब्दातुन आपल्याला 'आइ' शब्दातील माया, ममता, आपुलकी, समजली असती, कळली असती, जाणता आली असती.
ज्यांना 'आई' शब्द 'आई' वा 'आइ' लीहायचा आहे तसा त्यांना लीहीण्याचा अधीकार यातुन मिळतो. 'आई' हा शब्द उच्चारताना प्रत्येकवेळी त्यातील 'इ' आपण 'ई' अशी दीर्घ उच्चारतोच असे नाही. तेव्हा डोळ्यांना लागलेली सवय यापेक्षा 'आई' शब्द तसाच लीहीण्यामागे दुसरा अर्थ नसतो.

2)             एक-वेलांटी एक-उकार वापरल्याने शब्दातील अर्थच बदलुन जातो –
उत्तर – गेल्या बर्‍याच वर्षांच्या अनुभवातुन वेलांटी व उकार यांच्या फरकातुन अर्थ बदलणारे असे आजच्या समाजातील बर्‍याच व्यक्तींना केवळ काही शब्दच माहीत असल्याचे कळुन आले आहे. (1) दिन (दिवस) – दीन (गरीब), (2) सुर (देव) – सूर (आवाज वा नाद). (3) सुत (मुलगा) – सूत (धागा), (4) शिर (डोके) – शीर (रक्तवाहीनी), (5) मिलन (भेट) – मीलन (मिटणे), (6) सलिल (पाणी) – सलील (लीलेने) असे शब्द माहीत होते. याचे कारण यांचा उल्लेख मराठी व्याकरणाच्या पुस्तकातुन झाला आहे!
हे शब्द जेव्हा वाक्यातुन वावरतात तेव्हा ते जरी कसेही लीहीले तरी त्यातील योग्य मतीतार्थ संवादातुन नक्की कळतो. 'आजचा दिन उशीरा उगवला' वा 'आजचा दीन उशीरा उगवला', यातुन अर्थ कळण्यास अडथळा येत नाही. तसेच 'अरे तू गाण्यात जरा वरचा सुर घ्यायला हवा होतास' वा 'अरे तू गाण्यात जरा वरचा सूर घ्यायला हवा होतास', यातुन अर्थ कळण्यास अडथळा येत नाही. तसेच बाकी सर्व शब्दांचे होते.

अहो. 'वाट दाखवली' आणी 'वाट लावली' या दोन वाक्यातुन आपण मराठीत 'वाट' शब्दाचीच जणु 'वाट' लावत असतो. 'मराठीत शब्द वाकवावा तसा वाकतो', हे संस्कृतला त्याज्य ठरते. संस्कृतमधील वेलांटी आणी उकारातुन बनलेल्या प्रत्येक शब्दाला नीश्चीत नेमका आणि तोच ठरावीक अर्थ असतो आणी ही व्यवस्था संस्कृतच्या वाक्यावाक्यातील शब्दाशब्दात भिनलेली आहे.

मराठीतील शब्दाचा अर्थ वेलांटी आणी उकार जरी र्‍हस्व वा दीर्घ लीहीले तरी नक्की कळतो. संस्कृतच्या बाबतीत मात्र भलतेच घडते. वेलांटी आणी उकार असलेल्या संस्कृत शब्दातील ती वेलांटी वा उकार र्‍हस्व वा दीर्घ असला तर भीन्न अर्थ होतो. वाक्यातील अभीप्रेत अर्थापर्यंत पोचायला संस्कृतला तो शब्द योग्य वेलांटी आणी उकारातच लीहावा लागतो. त्यासाठीची पुढील काही उदाहरणे पहा.

संस्कृतच्या 'वारिणी' वा 'वारिणि' या शब्दातील 'णी' वा 'णि' मुळे होणारा अर्थ बदल
वारिणी
प्रथमेचे द्वीवचन कींवा द्वीतीयेचे द्वीवचन कींवा सप्तमीचे एकवचन वा संबोधनाचे द्वीवचन
वारीणि
प्रथमेचे बहुवचन कींवा द्वीतीयेचे बहुवचन कींवा संबोधनाचे बहुवचन
तसेच हे लक्षात घ्यावे लागते की संस्कृतमध्ये 'वारिणि' वा 'वारिणी' या शब्दांना कोणताही अर्थ नाही.

संस्कृतच्या 'मधुनी' वा 'मधूनि' या शब्दातील उकार व वेलांट्यां मुळे होणारा अर्थ बदल
मधुनी
प्रथमेचे द्वीवचन कींवा द्वीतीयेचे द्वीवचन कींवा संबोधनाचे द्वीवचन
मधूनि
प्रथमेचे बहुवचन कींवा द्वीतीयेचे बहुवचन कींवा संबोधनाचे बहुवचन
मधुनि
सप्तमीचे एकवचन
तसेच हे लक्षात घ्यावे लागते की संस्कृतमध्ये 'मधूनी' या शब्दाला कोणताही अर्थ नाही.

संस्कृतच्या 'जगती' वा 'जगति' या शब्दातील 'ति' वा 'ती' मुळे होणारा अर्थ बदल
जगती
प्रथमेचे द्वीवचन कींवा द्वीतीयेचे द्वीवचन कींवा संबोधनाचे द्वीवचन
जगति
सप्तमीचे एकवचन

संस्कृतच्या 'गुणिनी' वा 'गुणीनि' या शब्दातील 'ति' वा 'ती' मुळे होणारा अर्थ बदल
गुणिनी
प्रथमेचे द्वीवचन कींवा द्वीतीयेचे द्वीवचन कींवा सप्तमीचे एकवचन
गुणीनि
प्रथमेचे बहुवचन कींवा द्वीतीयेचे बहुवचन
गुणिनी कींवा गुणीनि
संबोधनाचे बहुवचन म्हणुन दोघांपैकी एक शब्द वापरता येतो.
तसेच हे लक्षात घ्यावे लागते की संस्कृतमध्ये 'गुणिनि' वा 'गुणीनी' या शब्दांना कोणताही अर्थ नाही.




3)             आता बहुतेक लोक बर्‍याच योग्य प्रकारे शुद्धलेखनाचे नीयम पाळुन लीहीत आहेत मग एक-वेलांटी एक-उकार हवाच कशाला?
उत्तर - तुमच्या मीत्राचे नाव 'दिनकर' वा 'दीपक' असेल तर त्याला हाक मारताना प्रत्येक वेळी त्यातील 'दि' वा 'दी' योग्य प्रकारे उच्चारता का? याचे उत्तर नाही असेच मीळते. तसेच लीहीतानाही 'दीनकर' वा 'दिपक' लीहीलेत तरी अर्थ बदलतो का? पण तुमच्या डोळ्यांना 'दिनकर' वा 'दीपक' हे शब्द असेच बघायची सवय लागलेली असते. एकदा ही अशी सवय डोळ्यांना लागली की 'दीनकर' वा 'दिपक' असेच शब्द योग्य वाटतात. र्‍हस्व व दीर्घ उकार यांतल्या ध्वनीचा ऐकु येणारा नाद एकच व समान असतो. 'दि' व 'दी' अशा लेखनातुन आपण व्यक्त करत असतो ते केवळ त्याच्या मौखीक उच्चाराने घ्यायचा वेळ. मराठी गद्यातील लेखनात उकार व वेलांटी यातील र्‍हस्व व दीर्घपणा ओळखण्याची मुळीच गरज नसते. लेखनातील उकार व वेलांटी यातील र्‍हस्व व दीर्घपणा ओळखण्याची गरज असते ती पद्यातील लयतालवीचारांना योग्यता देण्यासाठी होय. मराठी गद्यात ज्याची गरज नाही त्याचे उगीचच अनावश्यक ओझे बाळगणे व ते आत्मसात करण्यासाठी मुद्याम तसा प्रत्येक शब्द शीकणे याची मराठीला मुळीच गरज नाही. ज्यांना आता बर्‍याच योग्य प्रकारे शुद्धलेखनाचे नीयम पाळुन लीहीता येत आहे त्या व्यक्ती गरज नसताना हेच धोरण पाळण्याची सक्ती पुढील पीढीवर करत आहेत. आधीच समाजाचा ओढा इंग्रजीकडे वळला आहे, त्यात भर म्हणुन मराठी भाषा 'शुद्धलेखनाच्या अशा अनावश्यक नियमांनी क्लिष्ट व कठीण का बनवावी? मराठीचे उपजत मुलभुत धोरण गद्यातुन एक-वेलांटी एक-उकार यातुन साकार होत असताना उगाचच द्रावीडी प्राणायाम कशाला?

4)             मराठीच्या भल्यासाठी एक-वेलांटी एक-उकार यापेक्षा मराठीतील शब्द सामर्थ्य वाढवणे गरजेचे आहे.
उत्तर – मराठीतील शब्द सामर्थ्य वाढवीण्यासाठी समाजाला लेखन करण्यास अधीक प्रोत्साहीत करण्याचाच 'एक-वेलांटी एक-उकार' हा एक भाग ठरतो. 'एक-वेलांटी एक-उकार' यातुन लेखन करताना शुद्धलेखनाची नियमावली पाळण्याची सक्ती कोणावरही केली जाणार नाही. ज्या व्यक्ती 'शुद्धलेखनाची नियमावली'नुसार लेखन करता येत नाही त्याही मराठी लेखनात 'एक-वेलांटी एक-उकार' प्रस्तावातुन सामील होतील. नव्या पिढीला तर यातुन अपुर्व संधी लाभल्यासारखे होणार आहे. मराठीची अवहेलना, कुचंबणा यातुन कायमची नष्ट होणार आहे आणी मराठीचे लीहीते हात कीतीतरी पटीने वाढणार आहेत, म्हणजेच मराठीचे शब्द सामर्थ्य समृद्ध होण्यास 'एक-वेलांटी एक-उकार' हा प्रस्ताव उपयोगी ठरणार आहे.

5)             हे तुम्ही लोकांना सांगण्यापेक्षा सरकार, साहीत्य सम्मेलने व व्याकरणकार यांना सांगावे.
उत्तर – भाषेसाठीच्या कोणत्याही प्रस्तावाला लोकाश्रय व राजाश्रय दोन्ही मीळणे आवश्यक ठरते. 'सरकार, साहीत्य सम्मेलने व व्याकरणकार' यांच्याशी संबंधीत असलेल्या असंख्य व्यक्तींशी माझा संवाद झाला आहे व होत आहे. त्यामची मनोधारणा पुढीलप्रमाणे मांडता येते.

सरकार – मंत्री वा त्यांचे अधिकारी यांची धारणा - 'एक-वेलांटी एक-उकार' हा प्रस्ताव वैयक्तीक पातळीवर योग्य वाटला तरी तो खरच लोकांना हवा आहे का? तो योग्य आहे का? याचे उत्तर आम्हाला माहीत नाही. थोडक्यात म्हणजे मंत्री व त्यांचे अधीकारी यांच्या सामान्य कक्षेत हा वीषय येत नाही. सरकारने नेमलेल्या 'कोर्टातील मराठी', 'सांस्कृतीक वीभागातील नीयुक्त मंडळ', 'भाषा सल्लागार समिती' यांतील काही व्यक्तींसमोर याचा प्रस्ताव मांडला आहे. बघुया काय होते ते!

साहीत्य सम्मेलने व व्याकरणकार – त्यातील सभासद, अधिकारी, जाणकार व अध्यक्ष – 'शुद्धलेखनाचे नीयम शुन्य असावेत' ही पुस्तीका नीर्माण करुन अनेकांना सादर करुन, अनेक वर्षे झाली आहेत. http://www.gangals.com/ या माझ्या वेबवरुन http://www.gangals.com/downloadable-files/Files-to-post/Shuddha-Lekhanache-Niyam-Shunya-Asawet.pdf या लिंकवरुन ते इ-बुक म्हणुन प्रसीद्धही केले आहे. अजुनही त्यावर चर्चा झाल्याची नोंद माझ्यापर्यंत पोचली नाही!

याबाबतीत अनेक वर्षे नोकरी नीमीत्त भारताबाहेर असल्याने पाठपुरावा करता आला नाही. आता लोकाश्रयातुन राजाश्रय आणी राजाश्रयातुन लोकश्रय अशा दोन्ही मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न जमेल तसा सुरु आहे.

आपण जर यात प्रसार-प्रचारात मदत करणार असाल तर जरुर कळवा.

6)             तुम्ही हे समाजाला बरीच वर्षे सांगत आहात पण त्याचा समाजावर व मराठीवर काय परीणाम झाला?
उत्तर – याची वाच्यता काही माननीय मीत्रांसमवेत सरकार दफ्तरी व संस्थांमध्ये झाली आहे व होत आहे. त्यातुन हा वीचार असून कोणालाच का सुचला नाही? अशीच विचारणा होते! 'एक-वेलांटी एक-उकार' हा प्रस्ताव मराठीसाठी अनेक प्रकारे योग्य ठरतो अशी मते वैयक्तीक पातळीवर दीली जात आहेत. जगात जास्त बोलल्या जाणार्‍या पंधराव्या भाषेसाठी काम करत असल्याची जाणीव लक्षात घेऊन, काम अखंडपणे सुरु ठेवणे एवढेच माझ्याकडुन मी आवर्जुन घडवत आहे.

7)             तुम्ही सदोदीत एक-वेलांटी एक-उकार प्रस्ताव मांडताना संस्कृतवर ताशेरे का ओढता?
उत्तर – मराठीच्या व्याकरणात फ्रेन्च, जपानी, चीनी भाषांचा उल्लेख येउन, मराठीच्या भाषीक अंतरंगात त्यांनी ढवळाढवळ केलेली नाही. मराठीच्या व्याकरणात उल्लेख व ढवळाढवळ भारतीय भाषांपैकी गुजराती, हिन्दी वा बंगाली भाषांचाही झालेली नाही. मराटी व्याकरणाची सुरवातच मुळी संस्कृत-भाषेच्या ओळखीने करुन दीली जाते. त्यातुन निर्माण झालेल्या चुकीच्या पुस्तकी व्याकरणामुळे 'शुद्धलेखन नीयमावली'चा जन्म झाला. मराठीच्या व्याकरणात व 'शुद्धलेखन नीयमावली'तुन मराठीची मराठीतच 'तत्सम' (संस्कृतमधुन मराठीत आलेले शब्द) व 'तत्भव' (मराठीचे देशी शब्द) अशी फाळणी केली गेली. कोणतीही भाषा दुसर्‍या भाषेत कधीही ढवळाढवळ करत नाही. ढवळाढवळ केली जाते ती माणसांकडुन होय. मराठी व्याकरणकारांनी संस्कृतच्या पाणिनी व्याकरणावर मराठीचे व्याकरण रचल्याने संस्कृत भाषेच्या या ढवळढवळीला योग्य उत्तर देणे गरजेचे ठरते. शुद्धलेखन नीयमावलीच्या एकूण अठरा नीयमात 'तत्सम' व 'संस्कृत' हे शब्द बत्तीस वेळा आलेले आहेत! हे आपल्याला त्याचा अभ्यास केल्यावर कळेल. यातून मराठीला संस्कृतच्या व्याकरणाची वाळवी लागल्याचे स्पष्ट होते. अजुनपर्यंत कोणीही याबाबत साधा आवाजही उठवला नाही. मी यातील बारकावे शोधुन अथक परीश्रमातुन अनेक वर्षांच्या संशोधनातुन आजचे मराठी व्याकरण पुर्णतः चुकीचे असल्याचे सीद्ध केले आहे. यात प्रमुख आरोपी 'संस्कृत भाषेची मराठीतील ढवळाढवळ' ठरते. त्यामुळे आणी तेवढ्यापुरतेच संस्कृत-भाषेवर ताशेरे ओढणे क्रमपात्र आहे. संस्कत-भाषा भारतीयांची महान परंपरा आहे, पण याचा अर्थ तीला मराठीवर असे भाषीक आक्रमाण करण्याची परवानगी मीळते असा होत नाही. जर कोणाला 'संस्कृतला तशी परवानगी आहे' असे वाटत असेल तर त्यांनी सरळ मराठीचा पक्ष सोडून संस्कृतची भलावण व प्रसार करावा.

8)             तुम्ही संस्कृतचे द्वेष करणारे आहात का?
उत्तर – मी कोणाचाही द्वेष करत नाही. मी मराठीला मराठीचा मराठीपणातुन मराठीसाठी व मराठीपुरताच वीचार करण्याची नवी दीशा देत आहे. यातील मार्गात जर संस्कृत भाषा आड येणार असेल तर या वीषयापुरते तरी संस्कृत भाषेला विरुद्ध गटातील म्हणुन ओळखणे योग्य ठरते. मराठीला स्वतंत्रता, स्वावलंबन, स्वाभीमानी बनवीण्यात जे अडथळे असतील ते मराठीला पार करावे व नेस्तनाबुत करावे लागणार आहेत, यात मला कोणताही संदेह नाही. मराठी व संस्कृत मधील भिन्नता दाखवुन, मराठी-भाषा संस्कृतपेक्षा अधीक शास्त्रीय व नैसर्गिक आहे, हे दाखवणे म्हणजे जर 'संस्कृतचा द्वेष करणे असेल', तर मला तेही मान्य आहे.

'एक-वेलांटी एक-उकार' प्रस्तावाशी संबंधीत प्रश्न –

शुद्धलेखन म्हणजे नक्की काय?
आज शाळेतल्या मुलांचे नीबंधात मार्क कापले जातात यासाठी जर शीक्षकांकडे पालक गेले तर बर्‍याच वेळा, 'अहो, निबंधातील मुलाचे वीचार व भावना उत्तम आहेत पण शुद्धलेखनातील असंख्य चुकांमुळे त्याचे मार्क कापायला लागले' असे शिक्षकांना सांगावे लागते. कारण अभ्यासक्रमाच्या नीयमांनुसार शिक्षकांना घालुन दीलेले नीयम पाळावे लागतात.

यातुन शीक्षकांनाही नीबंधातील मुलाचे वीचार व भावना कळल्याचे उमगते. अहो, म्हणजेच विचार व भावनांचा कोणताही संबंध शुद्धलेखनाशी नसतो हेच तर शाळाशाळात सीद्ध झालेले आहे.

यातुन नक्की काय कळते? शुद्धलेखन म्हणजे 'लेखनातुन डोळ्यांना लावलेली गेलेली, शब्दांकडे पाहण्याची संस्कृत-धार्जीणी सवय' होय.

केवळ वेलांट्या आणी उकारच केवळ प्रत्येकी दोन का असतात? र्‍हस्व व दीर्घ म्हणजे नक्की काय?

'अ' आणी 'आ' स्वरांचा कोणत्याही मानवाने कमीतकमी वेळेत केलेल्या उच्चारात, 'अ' स्वराला लागणारा वेळ हा 'आ' स्वराच्या उच्चारवेळेच्या निम्मा असतो. मानवी भाषांतील उच्चारात 'दोन-वेलांट्या दोन-उकार आणी र्‍हस्व-दीर्घ' हे भाग येतात तरी कशामुळे? याचे उत्तर मराठीला अचुकतेने मांडता व सीद्ध करता आले आहे. मानवाच्या उच्चार-वेळेचे गणीत केवळ मराठीला चुकतेने भाषेतुन वापरता आलेले आहे. याबाबतचे मराठी-भाषेचे पहीले दहा सीद्धांत 'मराठी भाषेचा मुलभुत वीचार' या पुस्तकातुन http://www.gangals.com/downloadable-files/Files-to-post/Marathi-Bhashechaa-Mulabhut-Vichar.pdf या लींकवर उपलब्ध केलेले आहेत. केवळ वेलांट्या आणी उकारच केवळ प्रत्येकी दोन का असतात? याचे पुरेसे उत्तर त्यातुन मिळेल. अधीक माहीतीसाठी माझ्याशी संपर्क साधा.

याशिवाय पुढीलसारख्या अनेक प्रश्नांची सवीस्तर उत्तरे www.gangals.com या वेबवरुन मीळवा.

1               गद्यात एक-वेलांटी एक-उकार व पद्यात मात्र दोन-वेलांट्या दोन-उकार कशासाठी हवेत?
2               मराठी 'अक्षर' उच्चाराचे अचुकतेने कालमापन करणारे प्रमाण कोणते?
3               ध्वनीतील कोणते गुणधर्म मराठी गद्य, पद्य व संगीत यात वापरले जातात?
4               मानवी भाषांच्या जागतीकीकरणाशी एक-वेलांटी एक-उकार याचा संबंध कसा येतो?
5               एक-वेलांटी एक-उकार याचा संबंध मराठी व्याकरणाशी कोणता व कसा येतो?

पुढील वेबसाइटला भेट द्या




वेबसाइटवरील सर्च इंजीन भेट द्या आणी शुभानन गांगल यांची इ-पुस्तके मीळवा.




थोडक्यात सांगायचा निकष म्हणजे . . .




शुद्धलेखन नीयमावली आणी चुकीच्या व्याकरणी पुस्तका,
आता जाळुनी कींवा पुरुनी टाका,
उपजत मुलभुत मराठीची स्वीकारत अत्याधुनीक भुमीका,
घ्या 'मराठमोळी'च्या आणाभाका.


‘युनिकोड ते साऊंडकोड’ याबाबतचे लेख http://soundcode.blogspot.in/ या ब्लॉगवर वाचा.
कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी सामिल व्हा.

आपला, शुभानन गांगल    मोबाईल – 9833102727   ईमेल – gangal@gmx.com   वेबसाईट - www.gangals.com

6 comments:

  1. हास्यास्पद!
    संस्कृतमध्ये मधु, वारि या दोन्ही शब्दांच्या सर्व रूपांना अर्थ आहेत.

    मधुनी = दोन मध
    मधूनि = अनेक मध
    मधुनि = मधात

    ReplyDelete
  2. हास्यास्पद!
    संस्कृतमध्ये मधु, वारि या दोन्ही शब्दांच्या सर्व रूपांना अर्थ आहेत.

    मधुनी = दोन मध
    मधूनि = अनेक मध
    मधुनि = मधात

    ReplyDelete
  3. च आणि च्य यांचे उच्चार वेगवेगळे आहेत.

    ReplyDelete
  4. च आणि च्य यांचे उच्चार वेगवेगळे आहेत.

    ReplyDelete