बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Wednesday, 26 March 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 35 – संगीतासाठीचा युनीकोडचा फॉण्ट



युनिकोड ते साऊंडकोड लेख 35 –
संगीतासाठीचा युनीकोडचा फॉण्ट

(नावे सोडून बाकी लेखनासाठी एक-वेलांटी एक-उकार वापरला आहे)

इंग्रजांच्या काळापासुन भारतात शालेय शीक्षण सुरू झाले. तेव्हापासुन भाषा या वीषयात केवळ गद्य व पद्य असे दोनच भाग शीकवले जात आहेत. त्यातुन गद्य व पद्य यांची ओळख म्हणजेच त्यांचा 'कान' घडत होता. पण संगीत या वीषयाची मात्र आबाळ झाली. गद्य व पद्य शीक्षणातुन शीकवल्यामुळे आजवर परंपरेतुन मराठीत आलेल्या गद्य व पद्य यांचा आस्वाद नव्या पीढीतल्या मुलांना घेता येतो पण मराठी संगीताची संस्कृती मात्र नष्ट होत आहे. पुर्वी खेड्यातील घराघराच्या कानावर पहाटे जात्यावरच्या ओव्या ते सायंकाळच्या भजनांपर्यंत मराठी संगीताच्या संस्कृतीची ओळख होत असे, त्याचा 'कान' तयार होत असे. यातुन शास्त्रीय संगीतापर्यंतचा आस्वाद घेण्याची प्रवृत्ती जपली जात होती. ते आता घडत नाही.

ही सारी संगीताची मराठमोळी संस्कृती जपण्यासाठी 'संगीतासाठीचा युनीकोडचा फॉण्ट' महाराष्ट्राला अर्पण केला आहे. त्याबाबतच्या माहीतीच्या फाइल्स आणी  हा फॉण्ट पुढील लींक्स वरुन मोफत मीळवा आणी मराठमोळ्या संगीताला पुढील पीढीपर्यंत पोचवण्यात सहभागी व्हा.

1)       संगीतासाठीचा युनिकोडचा फॉण्ट हा 'जलद सोप्पी मराठी' या सॉफ्टवेअरशी संबंधीत आहे. 'जलद सोप्पी मराठी' हे सॉफ्टवेअर जगाला मोफत उपलब्ध केले आहे. 'जलद सोप्पी मराठी' बाबतच्या सर्व लींक्स पुढील फाइलमधुन (01 Jalad Soppi Marathi Software with Installation guide and keyboard) मीळतील. याची लींक पुढे देत आहे.


2)       पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन (02 Sangeeta sathee cha Unicode cha Font PIC) मधुन याची सर्व माहीती तुम्हाला व्यवस्थीत मीळण्याची सोय केली आहे. त्यासाठीची लींक पुढे दीली आहे.


3)       पीडीएफ फाईल (03 Sangeetasathicha Marathi Unicode Font) मधुन याची माहीती दीली आहे. त्याची लींक पुढे दीली आहे.


4)       पेटी (हार्मोनीयम) याच्यावर असणार्‍या चाव्यांची ओळख करुन देणारे चीत्र (04 Keys on Harmonium) पुढील लींकवरुन मिळेल.


5)       पेटी (हार्मोनीयम)च्या चाव्या हाताच्या बोटांनी वापरताना कोणत्या सप्त-स्वराच्या चावीसाठी, कोणत्या बोटांचा उपयोग करायचा ते सांगणारे चीत्र (05 Hands and Harmonium) पुढील लींकवर दीले आहे.


6)       'सा, रे, ग, म, प, ध, नि' या सप्त-स्वरांसह 'रे, ग, ध, नि' हे कोमल-स्वर आणी 'म' हा तीव्र स्वर 'संगीतासाठीचा युनीकोडचा फॉण्ट' यात कशा प्रकारे दाखवला आहे ते कळणे आवश्यक आहे. यातुन सप्तकातील बारा स्वर कळतील. तसेच मंद्र-सप्तक, मध्य-सप्तक व तार-सप्तक यातील हे बारा स्वर ओळखण्यासाठी कोणती चीन्हे दीली आहेत तेही कळणे गरजेचे आहे. याबाबतच्या चीत्र स्वरुपातील माहीतीची फाइल (06 Using Sangeet Font) पुढील लींकवरून मीळेल.


7)       मानवाला 85 ते 1100 एवढ्या फ्रीक्वेन्सीचा ध्वनी उच्चारता येतो म्हणुन गायकीसाठी मानवाला केवळ तीन सप्तके उपलब्ध होतात. पण मानवाला 20 ते 20000 फ्रीक्वेन्सीचा ध्वनी ऐकता येतो म्हणुन मानवाला वाद्यांच्या उपयोगातुन सात सप्तके उपलब्ध होतात. पीयानोत यामुळेच सात सप्तके असतात. वाद्यांच्या वापर करताना वापरली जाणारी सप्तके आणी भारतीय गायकीत वापरली जाणारी सप्तके यात थोडा फरक असतो. तो नीट कळावा यासाठी वाद्यासाठींची ठरवली गेलेली फ्रीक्वेन्सी दाखवणारा जगभर मान्यता मीळालेला तक्ता चीत्रमय स्वरुपात (07 Musical notes and Frequencies) पुढील लींकवर देत आहे.


8)       संगीतासाठीचा युनीकोडचा फॉण्ट (Gangal-Sangeet-001) पुढील लींकवरुन कॉपी करुन घेता येइल. त्यानंतर तो इन्स्टॉल कसा करावा ते वर दीलेल्या पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन मधुन जाणुन घ्या.


या फॉण्टमुळे आत्ताच्या शालेय शीक्षणाचा अब्यासक्रम मुळीच न बदलता केवळ त्यातील पद्य वीभागाला संगीतमय स्वरुप देणे शक्य होणार आहे. शाळाशाळांतुन घराघरातुन पेटी व बासरी सारख्या वाद्यांचा उपयोग करुन मराठमोळ्या संगीताचा आस्वाद घेण्याचे यातुन साधता येणार आहे. मराठमोळ्या भारतीय संगीताचे ज्ञान समाजाला देणार्‍या या सार्‍या गोष्टी मी मोफत उपलब्ध करत आहे.

याच्या प्रसार-प्रचारात आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा.

आपला, शुभानन गांगल
मोबाईल 9833102727   ईमेल call.gangal@gmail.com

No comments:

Post a Comment