बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Friday, 28 March 2014

मोडी-लीपीमधला भारतीय इतीहास, देवनागरी युनीकोडमध्ये आणण्याचा मार्ग मोकळा.



मोडी-लीपीमधला भारतीय इतीहास, देवनागरी युनीकोडमध्ये आणण्याचा मार्ग मोकळा.

'जलद सोप्पी मराठी'ने गाठलेले नवे भव्य द्वीव्य क्षीतीज.

मोडी लीपी ही केवळ मराठीची लीपी होती. अनेक शतके मराठीने गद्यासाठी मोडी लीपीचा वापर केला. भारताचा जवळजवळ 70 ते 80 टक्के इतीहास मोडीत लीहीला गेला आहे. ऐतीहासीक करोडो पाने मोडीत लीहीलेली असल्याने अजुन त्यातील मजकुराचा मराठीतील देवनागरीतुन उलगडा झालेला नाही. याचाच साधा अर्थ '''अजुन भारताचा संपुर्ण इतीहास मोडी लीपीच्या कागदातुन दडुन बसलेला आहे''' असा होतो.

देवनागरीत अ, ख, फ यांना केवळ काना दीला की त्याचे आ, खा, फा असे रुप होते. मोडीतील 'अ' व 'आ', 'ख' व 'खा', 'फ' व 'फा' यांची डोळ्यांना दीसणारी चीन्हेच जणु भीन्न असतात. त्यामुळे मोडीच्या फॉण्ट मधील अनेक चीन्हे लक्षात ठेवावी लागतात. मोडीचे टायपींग त्यामुळे कठीण बनले आहे.

आता मोडीच्या फॉण्टची गरज काय? आता कोणी मोडी लीपी लीहीणार आहे का? असे प्रश्न नीर्माण होतात. आता कोणीच मोडी-लीपी वापरत नाही आणी मराठीने यापुढे मराठी लीहीण्यासाठी मोडीचा वापर करण्याची गरज नाही असे माझे मत आहे.

पण भारताचा जास्तीतजास्त इतीहास केवळ मोडीत लीहीला गेला आहे आणी मोडी लीपी शीकता आली तरच ती करोडो ऐतीहासीक पाने वाचता येणार आहेत, ही वस्तुस्थीती आहे.

मोडीत लीहीलेली ऐतीहासीक पाने आजच्या मराठीच्या देवनागरी लीपीत येण्यासाठी काय करावे? याचा आपण थोडा वीचार करु.

यासाठीच्या शिक्षणाचे नक्की सुत्र आपल्याला, '''मोडी-लीपी बघून त्यातले मराठी वाचता आले पाहीजे''' असे मांडता येते. यालाच आपण '''मोडी-बघुन-मराठी-वाचायला-शीकणे''' असे नाव देउ.

पण मोडीतील 'आ' स्वर जोडलेल्या अक्षराचे चीन्ह पुर्ण बदललेले असते. तेही जर केवळ ठरावीक चावी 'आ' स्वर मिसळण्यासाठी नियुक्त करुन फॉण्टमधुन देता आले तर?

यातुन दोन गोष्टी पुर्ण होतील, 1) मराठीतल्या देवनागरी टायपींगच्या मानसीकतेशी मोडीच्या टायपिंगची सुत्रे जुळतील. 2) मोडीचे टायपींग सोपे होइल कारण चीन्हे लक्षात ठेवावी लागणार नाहीत.

असे घडवुन निर्माण केलेला मोडीसाठीचा युनीकोडचा फॉण्ट तयार आहे आणी तो काही व्यक्तींना देत आहे. मोडीही हस्त-लीखीतासाठी वापरली जात होती याचे भान ठेवुन त्यात असणार्‍या एकाच अक्षराच्या वेगवेगळ्या धाटणीला आणणे नंतर शक्य होणार आहे. आत्ता बनवीलेला हा मोडी-फॉण्ट मोडीतील काही अक्षरे, विशेषतः जोडाक्षरे यांच्या बाबतीत परीपुर्ण नाही. पण तसा घडवणे भवीष्यात शक्य होणार आहे.

टाइप केलेले मोडी-अक्षर मराठीतुन उच्चारण्यासाठी त्याचे देवनागरी-अक्षरात रुपांतर होणे साध्य झाले तर '''घरी बसल्याबसल्या महाराष्ट्रातील कोणालाही मोडी-लीपी बघुन मराठी वाचता येण्याची सोय झाली''' असे म्हणता येइल का?

आता मोडीच्या या फॉण्टबाबतची माहीती शब्दातुन सांगत बसण्यापेक्षा 'हा सुर्य हा जयद्रथ' या म्हणीनुसार तुम्हाला मोडीतील जवळजवळ सर्व अक्षरे फॉण्ट मधुन कशी दीसणार आहेत तेच येथे दाखवत आहे. मोडीत आणी देवनागरीत खुप खुप फरक आहे. मोडीतील चिन्हे फॉण्टमधुन आणणे अत्यंत कीचकट आहे. त्यांचे टायपींगसाठी सोप्यात सोपी पद्धत निर्माण करणे त्याहुनही कठीण ठरते. या सर्व रचनांना जास्तीतजास्त सहजसुलभपणे पुर्णत्व देण्यासाठी कीबोर्डची वेगळी आखणी केलेली आहे.

फेसबुकवरील ग्रुपमध्ये पोस्ट केलेल्या फाइलच्या तक्त्यातुन त्याची कल्पना येइल. 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकवरील ग्रुपला सामील व्हा.

मोडीच्या टायपींग मध्ये जास्तीतजास्त प्रमाणबद्धता आणणे आणी टायपिंगमधला क्लीष्टपणा जाऊन अधीकाधीक सहजपणा आणण्याचा यात प्रयत्न आहे. या खास रीतीच्या टायपींगमुळे मोडीतील प्रत्येक अक्षर व त्यासाठीचे बटण लक्षात ठेवावे लागणार नाही. 'जलद सोप्पी मराठी' या सॉफ्टवेअर मधुनच हा फॉण्ट व्यवस्थीत चालेल.




आपला, शुभानन गांगल
मोबाईल 9833102727

No comments:

Post a Comment