बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Saturday, 29 March 2014

ज्ञानेश्वरांच्या मायमराठीच्या स्वप्नांना वैश्वीक स्वरुप प्राप्त करुन देऊया.



युनिकोड ते साऊंडकोड लेख 37 –
ज्ञानेश्वरांच्या मायमराठीच्या स्वप्नांना वैश्वीक स्वरुप प्राप्त करुन देऊया.

(नावे सोडुन बाकी लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरला आहे)

भाषा कशाला शीकायची? संवाद साधायला. ध्वनी माध्यमातुन आपण मराठी बोलतो. हवेवर ओठांनी लीहीताना (म्हणजे बोलताना) भाषेला कागदी अक्षर-चीन्हांची गरज नसते. जेव्हा भाषेला कागदावर ध्वनी खुणांत उमटावयाचे असते तेव्हा भाषेला अक्षर-चिन्हे स्वीकारावीच लागतात.

मराठी म्हणुन जे जे पुरातन व जुने लेखन अस्तीत्वात आहे ते सारे आहे मोडी-लीपीच्या चीन्हांतुन कागदावर साकारलेले. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आणी त्यांनी भारतात स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याला जाणतो. त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य केवळ नीव्वळ व फक्त मोडी-लीपीचा वापर संपुर्ण राज्यकारभारात करत होते.

मराठ्यांचे राज्य भारतात वीस्तृतप्रमाणात पसरले होतो. त्यामुळे भारतातील इतर सर्व राजेरजवाड्यांनीही त्यांच्या कारभारात, व्यवहारात मोडी-लीपीचा वापर केला. आज भारताच्या शेकडो वर्षांच्या इतीहासाची करोडो करोडो ऐतीहासीक पाने मोडीत धुळ खात आणि वाळवींचे भक्ष बनत पडून आहेत. आपल्या भारताचा इतीहास आपल्यालाच माहीत नाही ही आजची परीस्थीती आहे.

इंग्रजांनी प्रींटींग टेक्नॉलॉजी आणली भारतात आणली. भारतात राज्यकारभार सुरु करताना, भारतात आपले पाय रोवताना इंग्रजांना मोडी-लीपीचाच आधार घ्यावा लागला होता. पण प्रींटींगसाठीचे मोडी-लीपीचे ठसे नीर्माण करणे अत्यंत कठीण व कटकटीचे असल्याचे लक्षात आले. त्याचवेळी मराठी भाषा कागदी लेखनातुन देवनागरी लीपीतुनही ओळखली व वाचली जाते हे लक्षात आले. देवनागरीचे प्रींटींगसाठीचे ठसे बनवणे अगदी सोपे होते. प्रींटींग केलेल्या मराठी पुस्तकांची सुनामी 1800 ते 1900 साली आली आणी कागदी-देवनागरीची-जगबुडी भारतात घडली. मराठीची शेकडो वर्षांची मोडी परंपरा काही दशकात इतीहास जमा झाली.

त्यातच भर म्हणुन भारतात सुरळीत राज्यकारभार करण्यासाठी इंग्रजी अधीकार्‍यांना मराठी शीकवीण्यासाठी 'पुस्तकी मराठी व्याकरणाची' गरज इंग्रजांना भासली. त्यांनी मराठीतल्या संस्कृत-पंडीतांना बोलावुन मराठीचे पुस्तकी व्याकरण लीहीले. एका बाजुला संस्कृतच्या पाणिनींचे व्याकरण आणी दुसर्‍या बाजुला इंग्रजी व्याकरण घेऊन मराठीच्या व्याकरणाची नीर्मीती करण्यात आली. यात इंग्रजांनी मराठी ही जगातील एकमेव भाषा अशी आहे की की जी गद्यासाठी मोडी-लीपी आणी पद्यासाठी बाळबोध लीपी वापरत आहे, याचा वीचारही केला नाही. त्याहुनही लाजीरवाणे व लांच्छनास्पद म्हणजे ज्या मराठीतल्या संस्कृत-पंडीतांनी मराठीचे पुस्तकी व्याकरण लीहीण्यात भाग घेतला त्यांनीसुद्धा हा वीचार केला नाही. ज्ञानेश्वरांनी मराठीला संस्कृतपासुन अलीप्त असणारी 'सुक्ष्मतेतुन भव्यतेकडे जाणारी', 'अमृताचाया पैजा जींकणारी' असे घोषीत केले आणी इंग्रजांच्या काळात मराठीतल्या संस्कृत-पंडीतांनी चुकीच्या-पुस्तकी-व्याकरणाचे आसुड उगारत, मायमराठीला संस्कृतच्या गोठ्यात पुन्हा एकदा कैद केले. यातुन काय घडले? 'शुद्धलेखन नीयमावलींचे जोखड' नसलेली मराठी-भाषा मोडीतुन शेकडो वर्षे मनसोक्त मुक्त स्वच्छंद नीर्वेधपणे वावरत होती. संस्कृतप्रचुर मराठी व्याकरणकारांनी मराठीला संस्कृतच्या व्याकरणाचे कातडे पांघरले आणी त्यानंतर ओघाने आले 'शुद्धलेखन नीयमावलीचे' संस्कृतच्या कैदखान्यातील नीयम. मराठी या स्वतंत्र, स्वावलंबी, स्वाभीमानी भाषेला बनवले गेले संस्कृतचे गुलाम.

कायहो, घेताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपुलकीने आत्मीयतेने? मग का नाही थोडा वीचार करत मोडीतुन शेकडो वर्षे वावरणार्‍या 'शुद्धलेखन नियामांच्या वाळवीने न पोखरलेल्या' अशा स्वच्छ, नीतळ, सुदृढ, ठणठणीत, मराठमोळीच्या उपजत मुलभुत स्वभावाचा? भारतभरच्या अनेक भाषांना मोडीने हस्त-लेखनाची सहजसुलभता दीली. कोणत्याही भाषेतील कोणीही यावे खुशाल मोडीतुन लीहावे ही आहे मोडीची उज्वल शास्त्रीय बांधणी. हा आहे मराठीचा खराखुरा आत्मसन्मान. त्याऐवजी आपण चुकीच्या पुस्तकी व्याकरणातुन काय साधले? मराठीची मराठीतच केली गेलेली 'तत्सम' व 'तत्भव' अशी फाळणी! आता तरी मराठी म्हणुन मानाने सन्मानाने मराठीला जगवायचे असेल तर प्रत्येक मराठी व्यक्तीने मराठीचे अद्वितीय शास्त्रीय अनोखे देखणेपण जाणावे. मराठी व्याकरण लीहीण्याची सुरवात मराठीच्या गद्यासाठी शेकडो वर्षे वापरल्या गेलेल्या मोडी-लीपी आणी पद्यासाठी शेकडो वर्षे वापरल्या गेलेल्या बालबोध-लीपीतुन होते. का बरे मराठी ही जगातील एकमेव भाषा गद्यासाठी मोडी-लीपी व पद्यासाठी बालबोध-लीपी वापरत होती?, याचा गंधही नसलेल्या व्यक्तींच्या हाती आपण मुर्खपणाने मराठी-व्याकरणाचे हक्क दीले आहेत. आता तरी मराठी समाजाचे डोळे उघडणार का?
मोडी आणी बालबोध यांच्या अभ्यासातुन मराठीचे उपजत मुलभुत अंतरंग सहजतेने कळुन येते आणी नव्या आधुनीक युगातील मराठी भाषेचे खरेखुरे अचुक सुयोग्य व शास्त्रीय व्याकरण घडते.

होय, मराठीला संस्कृत, इंग्रजी वा इतर भाषांसारख्या व्याकरणाची गरज नाही. मराठी लीपीचे अंतरंग 'उच्चार, अक्षर, चिन्हे, लेखन व अर्थ' या पाच गोष्टींच्या संलग्नपणातुन साकारते. याचे शीक्षण घेण्यासाठी 'जडणघडण, व्यवस्थापन आणी व्याकरण' असे तीन टप्पे पाडले आहेत.

मराठीची जडणघडण व मराठीचे व्यवस्थापन असेच का? याची अतीसुक्ष्म शास्त्रीयता जाणण्यासाठी 'व्याकरण' असेल. हे मराठीचे 'व्याकरण', मानवी भाषांच्या जागतीकीकरणात इतर भाषांना फीजीक्स मधल्या साउंडपासुन मानवी भाषेच्या अक्षराची नैसर्गीक नीर्मीतीपर्यंत सहजतेने घेउन जाइल.

'सुक्ष्मतेतुन भव्यतेकडे जाणारी', 'अमृताच्या पैजा जींकणारी' असा ज्ञानेश्वरांनी केलेल्या मायमराठीच्या उल्लेखाचा अनोखा नवा परीचय, प्रत्यय, आदर्श व साक्षात्कार आधुनीक संगणकीय पद्धतीतुन मराठी समाजाला व जगाला कळवुया. ज्ञानेश्वरांच्या मायमराठीच्या स्वप्नांना वैश्वीक स्वरुप प्राप्त करुन देऊया.

त्यासाठी मला हवे आहे तुमचे जमेल-तसे, जमेल-तेवढे योगदान, वैचारीक, आर्थीक व प्रसार-प्रचारात्मक.

तयार असाल तर जरुर संपर्क साधा, मी तुमचाच आहे. लोभ आहेच पण तो संपर्काने वृद्धींगत व्हावा.

‘युनिकोड ते साऊंडकोड’ याबाबतचे लेख http://soundcode.blogspot.in/ या ब्लॉगवर वाचा. कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी सामिल व्हा.




आपला, शुभानन गांगल    मोबाईल – 9833102727   ईमेल – shubhanan.gangal@gmail.com   वेबसाईट - www.gangals.com

No comments:

Post a Comment