बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Monday, 31 March 2014

युनीकोड ते साउंडकोड – लेख 38 – मोडीच्या करोडो करोडो पानापानातुन दडलेल्या भारताच्या इतीहासाला संजीवनी देणारे संशोधन




युनीकोड ते साउंडकोड लेख 38 –
मोडीच्या करोडो करोडो पानापानातुन दडलेल्या भारताच्या इतीहासाला संजीवनी देणारे संशोधन

(नावे सोडुन लेखनातील अक्षरांत एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयम झीडकारले आहेत)

उद्देश –
मोडीच्या करोडो करोडो पानापानातुन दडलेल्या भारताच्या इतीहासाला देवनागरीतुन प्रकाशीत करणे.

स्पष्टीकरणासह गृहीते –
1) मोडी-लीपीतुन लीहीलेल्या करोडो करोडो पानांत दडलेला अर्थ भारताला अजुनही प्रकाशीत करता आला नाही.
2) मोडी-लीपी वाचता येणार्‍या व्यक्तींची संख्या आत्ताच्या एकुण भारतीय लोकसंख्येच्या व्यापात ''कच्छच्या वाळवंटात बादलीभर पाणी'' एवढी ठरते!
3) इतीहासाच्या करोडो करोडो पानोपानी दडलेले संपुर्ण मोडीतील साहीत्य व पत्रव्यवहार, मोडी वाचता येणार्‍या तुरकळ व्यक्तींच्या हातुन, देवनागरी-मराठीत आणणे हा पुढील दोन-हजार वर्षांचा कालावधी ठरु शकेल ! ! म्हणजे भुतकाळात घडलेल्या इतिहासापेक्षा दुप्पट वेळ तो प्रकाशीत करण्यात लागेल ! ! !
4) कदाचीत आजपर्यंत संग्रह केलेली, जपुन ठेवलेली ही करोडो करोडो मोडी-लीपीतील ऐतीहासीक पाने तोपर्यंत वाळवीने खालेल्ली असतील, कचर्‍यात टाकुन दीली जातील, वा नष्ट होतील.
5) आजही भारताच्या पातळीवर अत्यंत जलद गतीने मोडी-लीपीत दडलेल्या करोडो करोडो पानांना प्रकाशीत करण्याचे सुत्र कोणालाही गवसलेले नाही.

आजच्या मोडी-लीपीबाबतच्या शीक्षणाचे चुकीचे धोरण –

मोडीच्या शिक्षणाचे क्लासेस भारतात काही ठीकाणी घेतले जातात. भारतभरच्या शाळांच्या संख्येच्या तुलनेत ते नगण्य ठरतात. यात शीक्षण घेणार्‍या वीद्यार्थ्यांना मोडी-लीपीच्या ऐतीहासीक पानांचे मराठीतील देवनागरी लेखनात परीवर्तन करण्याचे काम मीळते व त्यातुन त्यांच्या कौटुंबीक आर्थीक गरजा भागवल्या जातात. मोडी-लीपी शिकल्याने त्यांना कोणत्याही बँकेत, कारखान्यात, दुकानात, व्यवसायात, . . . वगैरे नोकरी मीळत नाही, मीळणार नाही.

वयस्कर व नोकरीतुन नीवृत्त झालेल्या व्यक्ती मायमराठीच्या प्रेमापोटी मोडी-शिकायला येतात. यांच्या वयस्कर आयुष्यात शरीर म्हणावे तेवढे साथ देत नाही, त्यामुळे दिवसाकाठीच काय पण आठवठ्यात एखाद दुसरे मोडीतील पान ते मराठीत आणतात. मनात मायमराठीची प्रचंड आस्था व आपुलकी असणे ही एक गोष्ट झाली आणी मोडी-लीपीत दडलेला भारताचा इतीहास लवकरात लवकर प्रकाशीत करणे ही दुसरी गोष्ट झाली.

'मोडी-लीपीत दडलेला भारताचा इतीहास देवनागरीतुन प्रकाशीत करणे' यासाठीची सुरवात 'मोडी-शीक्षणाच्या क्लासेस' मधुन होते असे म्हटले जाते. हे क्लासेस अतीशय तुरळक आहेत व ते आठवड्यातुन एखाद-दुसरा दीवस घेतले जातात. एकुण मोडी-लीपीच्या शीक्षणाला काही महीने लागतात. यातुन जे शिक्षण मीळते त्यातुन तयार झालेल्या विद्यार्थ्यांना त्यानंतर पुन्हा मोडीतील ऐतीहासीक पाने वाचणे, त्यातील मराठी उच्चार ओळखणे यात असंख्य अडचणी येतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा क्लासेस मध्ये जाऊन ती अडचण वीचारणे यात पुन्हा काही दीवस जातात. घरी बसुन या अडचणी सोडवता येतील अशी रामबाण योजना अजुन तरी आखता आलेली नाही. जसे 'दातात जरी शुल्लक काही अडकले तरी आपण जसे कासावीस होतो आणी दातातुन ते काढुन टाकल्या शीवाय चैन पडत नाही', तसे अशा मामुली अडचणींमुळे एकुण कार्यात बाधा येते.

मोडी-लीपीतुन लीहीलेला ऐतीहासीक कागद म्हणजे दुर्मीळ अमुल्य ठेवा ठरतो. त्याचे देवनागरीतुन मराठीकरण करताना 'ध'चा 'मा' होऊ नये ही काळजी घ्यावी लागते. सामान्य स्वैर लीप्यंतरणासारखे हे काम नसते, हे इथे लक्षात घेणे गरजेचे आहे.

'आधी मोडी-लीपी कागदावर लीहायला शीका. कागदावर मोडी लीहायला शिकताना अनेकवेळा जेव्हा अक्षरे कागदावर गीरटवली जातात तेव्हा त्यातील उच्चाराची ओळख शीका', हा आजच्या मोडी-लीपी शिक्षणाचा मुलमंत्र ठरतो. यामुळे बर्‍याच व्यक्ती मायमराठीच्या प्रेमापोटी क्लासेस जॉइन करतात पण काही दीवसातच ते अनुपस्थीत राहु लागतात. कॉलेजात असताना श्रमदान करायला गेलेल्या मुलामुलींचा उत्साह जसा पहीले तास - दोन तास उत्तम टीकतो आणी मग दमले भागलेले तरुण जीव उरलेला दीवस झाडाच्या सावलीत गप्पाटप्पा करण्यात घालवतात तसाच हा प्रकार म्हणता येतो! म्हणजेच 'मोडी-लीपीच्या शीक्षणात आमुलाग्र बदल करण्याची वेळ आली आहे', असे म्हणता येते का?

गेल्या अंदाजे पंधरा वर्षांपासुन मोडी शीकणार्‍या वीद्यार्थ्यांशी आणी याचे क्लासेस घेणार्‍या माननीय व्यक्तींशी संबंध आला. यातील एखाद दुसरी व्यक्ती सोडली तर बाकी सर्वजण कागद-पेनाच्याच घोड्यावर स्वार असलेले दीसतात. अत्याधुनीक युगाचा वापर करुन 'मोडी-लीपीचे सर्व शीक्षण संगणकातुन देण्याचा उपक्रम हाताळणे', हे या क्लासेसना शक्य झाले नाही. काही फॉण्टही तयार केले गेले पण त्यांचा वापर केल्याने एकुण कागदावरील कार्याच्या वहीवाटीतल्या बैलगाडी-वेगाला, संगणकीय माध्यमाची जेटची-वेगवान-गती जोपासता आली नाही.

मोडी-लीपीबाबतच्या शीक्षणाच्या अत्याधुनीक पद्धतीचे बीजावरोपण –


आजमीतीस मोडी-लीपीच्या शीक्षणात कार्यरत असणार्‍या व्यक्तींना दोष देण्यापेक्षा त्यांचे हात आधुनीकीकरणातुन सक्षम करता येतील का? हा वीचार मनात घोंघावत होता. बर्‍याच जणांच्या यासाठी भेटी घेतल्या, फोनवरुन चर्चा केल्या.

'मोडी-लीपी कागदावर हातांनी गीरवुन शीकण्याचे धोरण' पुर्णपणे बदलुन त्याऐवजी 'संगणकात केवळ मोडी-टायपींग शिकवण्याचा नावीन्यपुर्ण अभ्यासक्रम तयार करण्यात' यश प्राप्त केले.

आपल्याला नक्की काय घडवायचे आहे? हे नक्की करता आले की त्यावरचा उपाय नीर्माण करता येतो.

आपल्याला घडवायचे आहे ते, 'ऐतीहासीक करोडो करोडो कागदपत्रात दडलेल्या मोडी-लीपीतील लेखनाला देवनागरी-मराठीत आणायचे आहे', हे नक्की झाले. याला आपण 'मोडीचे देवनागरी लीप्यंतरण' असे सुटसुटीत नाव देउ.

मग त्यासाठी कागदावर अक्षरे गीरवत मोडी-लीपी शिकण्याची गरजच काय? त्यासाठी जर मी घडवलेल्या 'जलद सोप्पी मराठी' या सॉफ्टवेअरमधुन जसे देवनागरी-मराठी सहजसुलभपणे टाइप होते, तसेच इंग्रजीच्या क्वेर्टी-कीबोर्डशी समांतरपणे म्हणजे फोनेटीकली टाइप करुन मोडी-लीपीतील चीन्हे उमटली तर सगळेच प्रश्न नेस्तनाबुत होतात.

अर्थात यासाठी मोडी-लीपीच्या अंतरंगात दडलेल्या मायमराठीचा 'उच्चार, अक्षर, चीन्ह, लेखन, अर्थ' असा सुक्ष्म अभ्यास करावा लागला. आता सांगड घालायची होती, '''मायक्रोसॉफ्टच्या इंग्रजी-मर्यादेतुन होणारा संगणकाचा वावर, क्वेर्टी-कीबोर्डचा मोडीसाठीचा वापर, मोडी-लीपीत दडलेल्या सर्व व्यंजन, स्वर, अक्षरे व जोडाक्षरे यांच्या चीन्हांचा फॉण्ट मधला यथायोग्य अवीष्कार, 'व्यक्ती तीतक्या प्रकृती' या म्हणीप्रमाणे कागदावर अवतरलेल्या भारतभरच्या मोडी हस्तलीखीतांना सुयोग्यपणे प्रमाणबद्ध करणारी फॉण्टची चीन्हे, मोडीतील ज्या अक्षरांत कमालीचे साम्य आहे अशा चिन्हांना त्यांच्या खास वेगळेपणातुन उमटवत त्यातील तटस्थ व भीन्न ओळख प्रस्थापीत करण्याचे कौशल्य, शीरोरेषेतुन साधले जाणारे मोडीचे अनोखेपण, आजच्या देवनागरी-लीपीमुळे मराठी शब्द बघायला लागलेल्या डोळ्यांच्या सवयींची मोडी-लीपीशी नीर्माण केलेली जवळकी, मोडीतुन भाषीक अर्थनीर्मीती देवनागरीतुन आणण्यासाठी योग्य ठरणारी मोडीतील आवश्यक चिन्हे तसेच आजच्या काळासाठी मोडीतील टाळता येणारी चिन्हे (उदाहरण – वीवीध मायन्यासाठीची चीन्हे, 'र' सारख्या चीन्हांतील फर्राटेदारपणातुन साजरे होणारे देखणेपण, . . . वगैरे), अत्याधुनीक युनीकोड पद्धतीचा फॉण्ट तयार करण्यातील साधने व मर्यादा, . . . . अशा असंख्य गोष्टींवर उपाय शोधण्यात गेली पंधरा वर्षे खर्च झाली. पण आता 'संगणकातुन मोडीचे देवनागरी लीप्यंतरण' करण्याची योजना कार्यान्वयीत करण्या इतपत त्याची झेप पुर्ण झाली आहे असे म्हणता येते. कोणताच प्रकल्प शंभर टक्के पुर्ण होत नसतो याची जाणीव ठेऊन, यात काम करणार्‍या व्यक्तींना व इतरांना यातील चांगुलपणा व तृटी सांगता व मांडता येतील आणी त्यातुन याचेच पुढील अधीक आदर्श नमुनेदार प्रकल्पात रुपांतर करता येइल.

'संगणकातुन मोडीचे देवनागरी लीप्यंतरण' –

आत्ता कार्यान्वयीत करत असलेला 'संगणकातुन मोडीचे देवनागरी लीप्यंतरण' याच्याशी संलग्न असले महत्त्वाचे दोन भाग आहेत.
1) संगणकातील मायक्रोसॉफ्टमध्ये वापरता येणारा 'मोडी-लीपीचा युनीकोडचा फॉण्ट'.
2) 'मोडी-लीपीच्या युनीकोड फॉण्टमधुन टाइप केलेल्या मजकुराचा केवळ फॉण्ट बदलला की त्याचे देवनागरी-मराठी-युनीकोड मध्ये आपोआप होणारे लीप्यंतरण.
हे दोन्ही भाग गेली सहा महीने वीवीधतेने तपासुन झाले आहेत.

या दोन भागांपैकी प्रथम सादर करत आहे पहीला भाग 'मोडी-लीपीचा युनीकोडचा फॉण्ट'.

केवळ काही तासात दीलेल्या तक्त्यात बघुन बघुन; मोडीतील स्वर-अक्षरे, व्यंजन-अक्षरे (बाराखडी) आणी जोडाक्षरे; संगणकातुन घर-बसल्या शीकण्याची सोय यातुन मीळते.

या मोडी-लीपीच्या टायपींग शीक्षणाच्या प्रकल्पाचे सहा टप्पे तयार केले आहेत. या टप्पातुन मोडी-लीपीतील चीन्हांच्या फरकाची आखणी उच्चारानुसार लक्षात येते. मोडी-लीपीतुन टाइप करायला, मोडी-लीपीतील त्या त्या अक्षराला दीलेले चीन्ह यात लक्षात ठेवायची मुळीच गरज नाही. आधी मराठीचा उच्चार करा, उच्चाराला टाइप करण्यासाठीच्या अचुक उपाय योजनेचे चार नीयम लक्षात ठेवले की मोडी-लीपी टाईप करता येणार आहे. काय आहे की नाही अत्याधुनीक अभीनव प्रकल्प?

त्यासाठीचे बनवलेले सहा टप्पे पुढीलप्रमाणे आहेत –
1)     मोडीतील स्वर अक्षरे
2)     मोडीतील स्वरांसह व्यंजन अक्षरे
3)     मोडीतील स्वरांसह व्यंजन अक्षरे
4)     मोडीतील उकार अक्षरे
5)     मोडीतील बाराखडी
6)     मोडीतील जोडाक्षरे

यातील मोडी-लीपीच्या संगणकीय शीक्षणाचे पहीले दोन टप्पे 'सर्वसमावेशक मराठी' https://www.facebook.com/groups/togangal/ या फेसबुकवरच्या ग्रुपवर त्यासाठीच्या युनीकोडच्या फॉण्टसह (Modeeleepee-Gangal-001) मोफत प्रकाशीत केले आहेत.

सामान्य शाळेतुन मोडीचे शीक्षण देणारा अभ्यासक्रम कोणत्याही वीद्यापीठाने वा सरकारने स्वीकारलेला नाही. अभ्यासक्रमात कोणत्याही वीद्यापीठातुन वा शाळेतुन राबवता येणारे हे प्रकल्प ठरतात. भारतभरची इतीहास संशोधन केंद्रे, मोडी-लीपीचे शिक्षण देणार्‍या संस्था आणी इतीहासकार यांना हा अभीनव मोफत उपलब्ध केलेला अत्याधुनीक प्रकल्प उपयुक्त ठरे असा वीश्वास वाटतो.

ज्यांना याबाबत अधीक माहीती हवी असेल त्यांनी प्रथम मोबाइलवर संपर्क साधावा ही वीनंती.




आपला, शुभानन गांगल

मोबाइल 9833102727   इमेल Shubhanan.gangal@gmx.com   वेबसाइट - www.gangals.com

No comments:

Post a Comment