युनिकोड ते साऊंडकोड –
लेख 40 –
नको लक्षात ठेवायला मोडीतील प्रत्येक अक्षराची ठेवण
संगणकाच शिकवली आहे मोडी-लिपीतली जडणघडण !!
देवनागरीत 'अ'ला काना दिला की त्याचा 'आ' बनतो.
मोडीत मात्र 'अ' पेक्षा 'आ' दुसर्याच रुपातून सजतो.
देवनागरीत 'क'चा 'का', 'ख'चा खा' काना देऊन होतो.
मोडीत 'क'पेक्षा 'का', 'ख'पेक्षा 'खा' अनोखाच असतो.
अरे बापरे, मग मला कसे जमेल मोडीतून टाईप करणे?
बरे झाले, पुर्वीच घडले, मराठीने मोडीला मोडीत काढणे!
पण भारताचा सारा इतिहास दडुन बसला आहे मोडीत
साहित्य, राज्यकारभार गतकाळातील सार्या घडामोडीत
पण आता आले आहे, अत्याधुनीक युग संगणकाचे
सहजसुलभपणे टायपिंगच्या 'जलद सोप्पी मराठी'चे
नको लक्षात ठेवायला मोडीतील प्रत्येक खुणान खुणा
एका चावीने सारे 'गमभन' बनतील अचुक 'गामाभाना'!
'खुल जा सीमसीम' या मंत्रासारखे एकच बटण परवलीचे
मोडीच्या जणु अंतरंगाला संगणकाने जाणले म्हणायचे!
'कखगघ,टठडढ . .' टाईप झाले की दाबा (^) एका चावीला
'काखागाघा, टाठाडाढा . .' साठी (^) शिफ्ट दाबुन 'सहा'ला
आहे ना?, मोडीचे टायपिंग सोप्पे सुटसुटीत समजायला
मग चला, टाइप करु ऐतिहासीक मोडीतील पानापानाला
आपला, शुभानन गांगल
मोबाइल – 9833102727
ईमेल – Shubhanan.gangal@gmail.com
No comments:
Post a Comment